आपल्या तीन नवऱ्यांना मारून दिल्लीच्या रेड लाईटवर राज्य करणारी खऱ्या आयुष्यातील “सोनू पंजाबन.”

फुकरे आठवतोय का?

दूसरावाला नाही पहिलावाला. फुकरेचा सिक्वेल मध्ये आला होता पण मराठी माणसाने त्याचा फुक रे केला. असो तर पहिलावाला जो फुकरे  सिनेमा होता त्यात एक अजरामर पात्र होतं, भोली पंजाबन. पिक्चरमध्ये जो कोणी धुमाकूळ घातला असेल तो भोली पंजाबन हिनेच. त्यानंतर चुचा नावाच्या पात्राचा नंबर लागतो.

आत्ता ज्यांनी सिनेमा पाहिला नाही त्यांच्यासाठी सांगतो. 

फुकरे सिनेमात चार मित्र असतात. एकाला भविष्य दिसतं आणि दूसरा त्या भविष्यावरुन आकडा लावतं असतो. यातून ते जिंकत असतात. एकदिवस मोठ्ठा डाव खेळायचा म्हणून लेडी डॉन असणाऱ्या भोली पंजाबनकडे ते पैसै मागतात आणि हारतात. त्यानंतर भोली पंजाबन आणि हे तीन पोरं असा ड्रामा सुरू होतो. 

असो तर मुळ मुद्दा हे पात्र ज्या खऱ्या लेडी डॉनवर बेतलं आहे तिचं नाव सोनू पंजाबन. सोनू पंजाबन ही दिल्लीच्या रेड लाईटवर राज्य करणारी पोरगी. हा खरतर पोरगीच कारण तिचा जन्म १९८० चा. आणि आजच तिचं करियर सांगायचं झालं तर ती कधी आत असते तर कधी बाहेर. पण वयाच्या २५ व्या वर्षीच तिने आपल्या ओरीजनला नावाऐवजी दहशत निर्माण करणार सोनू पंजाबन हे नाव जोडून घेतलं आहे. 

गीता अरोराची कशी झाली सोनू पंजाबन. 

गीता अरोरा मुळची पंजाबची. दिसायला सुंदर असणाऱ्या गिता अरोराच लग्न विजय नावाच्या एका व्यक्तीसोबत झालं. तेव्हा गीताच वय अवघं १७ वर्ष होतं. विजय तिला घेवून दिल्लीत आला. दिल्लीमध्ये आल्यानंतर तिला समजलं की विजय हा साधासुधा माणूस नाही तर तो गॅंगस्टर आहे. अस सांगितलं जातं की तिच्या पहिल्या नवऱ्यानेच तिला गुन्हेगारी विश्वातले सगळे खाचखळगे सांगितले होते. विजय आणि तिच्या संसार व्यवस्थित चालू होता. अशातच गॅंगस्टर विजय हा एका पोलिस एन्काउंटर मध्ये मारला गेला. 

विजयच्या नंतर एकटी पडलेल्या गीताला दिल्लीसारख्या शहरात राहणं कठिण झालं होतं. एन्काऊंटर नंतर विजयची खरी परस्थितीसमजल्यामुळे गिताच्या कुटूंबियांनी देखील तिच्यासोबत संबध तोडले होते. 

याच काळात तिने देहविक्रीच्या व्यवसायात पाऊल टाकलं. देहविक्रीच्या मार्गाला लागल्यानंतर ती प्रेमात पडली ती हेमंत आणि दिपक या दोन भावांच्या. या दोन भावांची तेव्हा दिल्ली परिसरात मोठ्ठी दहशत होती. दोन्ही भावांना तुती या एकाच नावाने ओळखलं जायचं. गिताने या दोघांसोबत एकाचवेळी लग्न केलं. 

पुढे या दोन्ही भावांना देखील एका चकमकीत मारण्यात आलं. पुढे आपल्या या मारलेल्या दोन नवऱ्यांच्या संपत्तीचा आणि दहशतीच्या जोरावर गिता अरोरा हिने नवीन नाव घेतलं ते म्हणजे सोनू पंजाबन. अस सांगितलं जात की सोनू पंजाबन हिनेच आपल्या दोन्ही नवऱ्यांना पोलिसांच्या मदतीने मारलं होतं. 

त्यानंतर मात्र दिल्लीमध्ये देहविक्रीच्या व्यवसायात फक्त एकच नाव गाजू लागलं ते म्हणजे सोनू पंजाबन. विशेष म्हणजे तिने घेतलेलं या नव्या नावातलं सोनू हे नाव आपल्या तीन नवऱ्यांपैकी एका नवऱ्याचं टोपणनाव होतं. 

२००८ साली पहिल्यांदा सोनू पंजाबनला अटक करण्यात आली. 

२००८ साली तिला अटक करुन तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलं तेव्हा पोलिस अधिकाऱ्यांपासून ते नेते आणि उद्योगपतींच धाब दणाणलं होतं. त्याला कारण देखील तसच होतं. सोनू पंजाबनचे देहविक्रीच्या व्यवसायात मोठ्ठे लागेबांधे निर्माण झाले होते. VIP लोकं तिचे गिऱ्हाईक असायचे. पण पोलिस अधिकारी जसपाल सिंह यांनी तिच्यावर कारवाई केली होती.

तिला अटक करुन तिच्या घरातून बाहेर येण्यापुर्वीच तिथे लिगल अॅडवाईज देण्यासाठी वकिलांची टिम हजर झाली होती. सोनू पंजाबन ला अटक करण्याची हि पहिली वेळ होती. त्यानंतर सोनू पंजाबन पून्हा जामिनावर बाहेर आली. तितक्याच मस्तीने तिने आपला व्यवसाय चालू ठेवला. आज ती काय करते तर तिच्यासोबत काम करणारे सांगतात तिच्याकडे जादू आहे.

एक महिला असून देखील ती भल्याभल्यांकडून आपलं काम काढून घेण्यात माहिर आहे. तिनेच तिच्या नवऱ्यांचा खून घडवून आणला होता. पण या सगळ्या आरोपांना कोर्टात पुरावे लागलात. आज चाळीशी पार केलेल्या भोली पंजाबच्या विरोधात असे कोणतेच आरोप मात्र कोर्टात टिकू शकले नाहीत. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.