जावेद अख्तर म्हणतायत त्याप्रमाणे ‘बुल्ली बाई’ची मास्टरमाईंड श्वेताला माफ करण्यात यावं का ?

आपल्या भारताभूमीला महान संस्कृती लाभली आहे. या महान संस्कृती मध्येच परस्त्रीला मातेसमान मानलं जायचं! अहो मानलं जायचं कुठे. अजूनही तसंच मानलं जातं. पण चांगल्या गोष्टींना काही अपवाद असतात. म्हणजे बघा हं.. त्याकाळी सत्तेच्या मदमस्त नशेत कौरवांनी द्रौपदीच चीर – हरण केलं.

पुढं महाभारत लिहिलं गेलं आणि त्यात साहजिकच कौरवांना दूषणं दिली गेली. आणि त्यांची जागा व्हिलन करेक्टर्सनी घेतली. आज सुद्धा कौरवांसारखे काही व्हिलन्स अस्तित्वात आहेत. 

Web Photo Editor.jpg?compress=true&quality=80&w=900&dpr=1
ही अशी….

होय तुम्ही वाचताय ऑनलाईनच्या जमानातल्या कौरवांबद्दल….बुली बाई अ‍ॅप  

मुस्लिम महिलांची सौदेबाजी करुन चीर- हरण करणार हे अ‍ॅप २१ व्या शतकातलं ऑनलाईनच्या जमान्यातलं कौरव बनलंय. याच अ‍ॅपचं नाव आहे बुली बाई अ‍ॅप (Bulli Bai App). या अ‍ॅपवर मुस्लिम महिलांना टार्गेट केलं जात होतं. हे बुली बाई अ‍ॅप मुस्लिम महिलांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन त्यांचे फोटो डाऊनलोड करुन लिलावासाठी पोस्ट करत होतं. 

या प्रकरणात Github या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मुस्लिम महिलांचे फोटो उपलोड होत होते. त्या फोटोंच्या खाली त्या महिलांची किंमत लिहिली जात होती. घाणरेड्या भाषेत मजकूर लिहून या महिलांचे ऑनलाईन सौदे केले जात होते. काही महिलांच्या हा प्रकार निदर्शनात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार देखील केली होती. आता तुम्ही विचार कराल की, महिलांच्या अशा ऑनलाईन सौदेबाजी मध्ये कोणत्यातरी मास्टरमाईंड कुख्यात पुरुषाचा हात असेल ? तर नाहीं..या प्रकरणामागे १८ वर्षांची एक मुलगी आहे. 

बुली बाई या प्रकरणात मुंबई पोलिसांनी बंगळुरुमधून २१ वर्षाच्या विशाल कुमार झा ला ताब्यात घेत अटक केली. यानंतर पोलिसांनी उत्तराखंड इथून १८ वर्षांच्या श्वेता अनंत सिंगला ताब्यात घेतलय. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोघे आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांची विचारसरणी जुळली आणि त्याच्यात मैत्री झाली, या दोघांनी मिळून हे बुल्ली बाई अ‍ॅप प्रकरण चालू केल. त्या दोघांनी मिळून मुस्लिम महिलांच्या फोटोचा लिलाव करणारी वेबपेजेस सुरू केली. श्वेता सिंग JattKhalsa07 नावाचे बनावट ट्विटर हँडलचा वापर करत होती आणि या हँडलवरून घृणास्पद पोस्ट आणि आक्षेपार्ह फोटो टाकत होती. तिचा साथीदार असलेल्या विशालने सांगितले की,

तो श्वेताच्या संपर्कात होता आणि श्वेता बुल्लीबाई अ‍ॅप संबंधित सर्व ऍक्टिव्हिटी करणाऱ्या लोकांच्या संपर्कात होती. तो नेपाळमध्ये बसलेल्या कोणाकडून तरी सूचना घेत होती.

या गोष्टीत विशेष काय असेल तर ? 

ही मुख्य आरोपी श्वेता सिंग हि अनाथ आहे. २०११ मध्ये तिच्या आईचा कॅन्सरने मृत्यू झाला आहे.  त्याचवेळी २०२१ मध्ये तिच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. वडील गेल्यानंतर श्वेता तिच्या तीन भावंडांसोबत रुद्रपूरला राहत होती.

आर्थिक परिस्थिती खालावली असल्यामुळे श्वेताने बारावीपर्यंतच शिक्षण घेतले, त्यानंतर तिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला नाही. तिला एक मोठी बहीण आहे जी वाणिज्य शाखेत पदवीधर आहे, तर तिला एक लहान बहीण आणि भाऊ आहे जे सध्या शाळेत शिकत आहेत. श्वेता स्वतः इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होती.

घरची परिस्थिती हलाखीची आणि त्यात जबाबदारी घेणार कोणी नाही म्हणून शेवंताने हे पाऊल उचललं असल्याचं म्हंटल जात होतं. 

म्हणूच बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर यांनी याप्रकरणी ट्वीट केलं असून १८ वर्षाच्या तरुणीला माफ केलं जावं असं म्हटलं. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की,

“जर बुली बाई हे खरोखरच १८ वर्षाच्या मुलीचं मास्टरमाइंड असेल जिने कॅन्सर आणि करोनामुळे आपले पालक गमावले आहेत तर काही महिला किंवा इतरांनी तिची भेट घेऊन वडिलधाऱ्यांप्रमाणे तिने जे केलं आहे ते चुकीचं असल्याचं समजावून सांगितलं पाहिजे. दया दाखवत तिला माफ केलं पाहिजे”.

पण मग जावेद अख्तर म्हणतायत त्याप्रमाणे श्वेताला माफ करण्यात यावं का ? 

तर उत्तराखंडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा हवाला देत एका रिपोर्ट मध्ये म्हंटल गेलंय की, 

श्वेता मुस्लिमांच्या विरोधात असलेल्या विचारसरणीशी संबंधित असल्याचे म्हटले होते. ती अनेकदा सोशल मीडियावर अशा पोस्ट देखील करत असते. अटकेनंतर श्वेताला मंगळवारी ट्रान्झिट रिमांडसाठी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे तिला रिमांडवर मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जेंव्हा मुंबई पोलिसांनी श्वेता सिंगची चौकशी केली तेव्हा,

तिने केलेल्या कृत्याबद्दल तिने कोणताही पश्चाताप व्यक्त केला नाही. 

(तुम्हाला काय वाटत जावेद अख्तर म्हणतायत त्याप्रमाणे श्वेताला माफ करण्यात यावं का ? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा )

 

Leave A Reply

Your email address will not be published.