या वर्षात येणारे हे ६ पिक्चर साऊथ इंडियन सिनेमांचे रिमेक असणार आहेत..

बॉलिवूडला मी परवडणार नाही, अस महेश बाबू बोल्ला. बॉलिवूड मनातल्या मनात म्हणलं, चलेग्गा. आम्हाला तर कुठं तू पाहीजेस. आम्हाला पाहीजे ती तूझी स्टोरी. तुझा पोकीरी घेवून आम्ही वॉन्टेड हिट केला…

कसय आजवर साऊथ इंडियन सिनेमाचे बॉलिवुडवाल्यांनी पोत्यानं रिमेक केलेत. अगदी हिंदीत हिट झालेले हेरा फेरी, भुलभुल्लैया, अंधाधुंद, RHTDM, वॉन्टेड, कबीर सिंग अशी ढिगानं नाव लगेच लक्षात येतील. पण आत्ता झालय अस की बाहुबली, पुष्पा, RRR, KGF अशा सिनेमांनी हिंदीत डब करून धुमाकूळ घालायला सुरवात केलीय.  त्यामुळं रिमेकचं गणित जरा गंडू लागलय. अशाही स्थितीत बॉलिवुडने साऊथचा रिमेक करणं मात्र सोडलेलं नाही.

जे सिनेमे तिकडे चालले पण हिंदीत डब झाले नाहीत असे धरून येत्या वर्षात बॉलिवुडमध्ये फिल्म रिलीज होणार आहेत. यातल्या कोणत्या महत्वाच्या फिल्म आहेत याच यादीवर एक नजर मारू..

पहिला सिनेमा आहे तो जर्सी.. 

जर्सी रिलीज झाला. पण म्हणावी तशी हवा या सिनेमाने केली नाही. हा मुळ सिनेमा तेलगू भाषेतला. २०१९ मध्ये तो रिलीज झाला. नानी नावाच्या हिरोने यात प्रमुख भूमिका केलेली. स्पोर्टस् या विषयावर हा सिनेमा आहे.

तामिळमधल्या सिनेमाचं बजेट होतं २५ कोटी आणि या सिनेमानं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलेलं ५२ कोटी. पण याउलट हिंदी रिमेकचं बजेट होतं ४० कोटी अन् या सिनेमानं आत्तापर्यन्त बॉक्स ऑफिस कलेक्शन केलय २५ कोटी.

दूसरा रिमेक येतोय तो विक्रम-वेधा चा 

विक्रम वेधाचं नाव घेतल्यानंतर आर माधवन आणि विजय सेतुपतीचा हा पिक्चर २०१७ साली रिलीज झालेला. पिक्चरने मोक्कार हवा केलेली. पिक्चरचं बजेट होतं ११ कोटी आणि कलेक्शन होतं ६० कोटींच.

विक्रम वेधाच्या रिमेकमध्ये सैफ अली खान आणि ह्रतिक रोशन असणार आहेत. हिरोईन म्हणून राधिका आपटे असल्याचं सांगण्यात येतय. या वर्षीच्या ३० सप्टेंबरला पिक्चर रिलीज होणार आहे. पण गोल्डमाईन्सने हा सिनेमा हिंदीत डब करून यु ट्यूबवर पुर्वीच टाकलाय. सो हिंदी रिमेकची वाट बघण्यात वेळ घालवण्याची गरज नाही अस वाटतं.

तिसरा रिमेक येतोय तो ड्रायव्हिंग लायसन्स सिनेमाचा.. 

ड्रायव्हिंग लायसन्स हा २०१९ मध्ये रिलीज झालेला मल्याळम सिनेमा. या सिनेमाचं बजेट होतं ४ कोटी आणि सिनेमानं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलेलं २२ कोटींच. पृथ्वीराज या सिनेमात प्रमुख भूमिकेत होता.

याच सिनेमाचा रिमेक करतोय अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी. आणि निर्माता आहे करण जोहर. मल्याळम सिनेमा ड्रायव्हिंग लायसन्सचा रिमेक करताना सिनेमाचं नाव सेल्फी ठेवण्यात आल्याची बातमी आहे. हा सिनेमा पण याचवर्षी रिलीज होणार आहे.

चौथा सिनेमा आहे शहजादा.. 

तेलगू पिक्चर वैकुण्ठपुरमचा हा रिमेक. वैकुण्ठपुरम् हा अल्लू अर्जूनचा बिग बजेट सिनेमा होता. १०० कोटी बजेट असणाऱ्या या सिनेमाने २६२ कोटींची कमाई केलेली. १२ जानेवारी २०२० रोजी हा सिनेमा रिलीज झालेला. रिमेक करताना या सिनेमात अल्लू अर्जूनच्या ठिकाणी कार्तिक आर्यनला घेण्यात आलय. येत्या वर्षीच्या ४ नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय.

पाचवा सिनेमा आहे मिली.. 

१५ नोव्हेंबर २०१९ ला हेलन हा मळ्याळम सिनेमा रिलीज झालेला. त्याचाच रिमेक मिली या नावाने येतोय. या सिनेमात जान्हवी कपूर आहे. सैराटच्या आपटबारनंतर मिलीचा आपटबार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या ३१ डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय.

सहावा सिनेमा आहे मुंबईकर.. 

२०१७ साली रिलीज झालेला आणि अनेक पुरस्कार घेतलेल्या मानागरम् सिनेमाचा हा रिमेक आहे. थ्रिलर बेस असणारा हा सिनेमा प्रेम, गुन्हेगारी या संबधित होता. आत्ता सिनेमाच्या रिमेकची चांगली गोष्ट म्हणजे याची टिम साऊथचीच आहे. सिनेमात विजय सेतुपती असणार आहे. करण जोहरच्या हस्ते मागील वर्षाच्या जानेवारीत सिनेमाचं पोस्टर लॉन्च केलं होतं. या वर्षी हा सिनेमा येईल.

अशी ही यादी होती प्रमुख सिनेमांची जे या वर्षी तामिळ, तेलगु, मल्याळम भाषेतून हिंदीत बॉलिवूडचे सिनेमे म्हणून रिलीज होणार आहेत याची. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.