‘बूब हंटर’ हे काय बलात्काऱ्यांपेक्षा कमी नसतात…

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

समजा तुमची एक मैत्रीण रस्त्यावरून जातेय आणि काही पुरुष संधी साधून तिच्या जवळ आले आणि  तिला काही कळायच्या आत तिची छाती दाबून पळून गेले. काय घडतंय काही काळ तिला काही समजलंच नाही. या प्रसंगाने ती इतकी घाबरली कि पुन्हा कधी त्या रस्त्यावर गेलीच नाही. विचार करा किती भयंकर अनुभव असेल हा….

तुम्हाला वाटेल कि नशीब तिच्यासोबत आणखी काही गंभीर घटना घडली नाही. खरं तर प्रकार जितका साधा- सुधा वाटतो तितका सोपा नाहीये. एक भयंकर गुन्हा आहे. असे भयंकर गुन्हे करणाऱ्यांना ‘बूब हंटर’ म्हणतात…याची चर्चा आपण यासाठी करतोय कारण केरळमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तो स्वत:ला ‘बूब हंटर’ म्हणतो, आणि त्याला हि गोष्ट ‘कुल’ वाटते..

एका तरुणाचे whats app चे स्क्रीनशॉट व्हायरल झालेत. ज्यामध्ये त्याने याचा खुलासा केला आहे की, तो चौदा वर्षाचा असतांन पासूनच महिलांशी लैंगिक संबंध ठेवत आला आहे, गर्दीचा फायदा घेत महिलांच्या स्तनांना स्पर्श करत आहे.  थोडक्यात हा मुलगा महिलांचा लैंगिक छळ करत आहे आणि तो अशा कृत्यांना प्रॅंक समजतो आणि त्याला तो बूब हंटर असल्याचा अभिमान देखील वाटतो.  

मात्र सोशल मिडियावर व्हायरल झालेले हे स्क्रीनशॉट पाहून अनेक महिलांनी चिंता व्यक्त केली आहे की मेडिकलचा अभ्यास करणाऱ्या या  तरुणाला तो करत असलेल्या विकृत लैंगिक खोड्यांचा अभिमान वाटतो. किती भयंकर गोष्ट आहे ही ?

स्क्रीनशॉटमध्ये, मुलगा म्हणतो की तो वयाच्या १३ व्या वर्षापासून हे करत आला आहे. तो आणि त्याचा मित्र ‘बूब हंटिंग कॉन्टेस्ट’ करायचे. चॅटमध्ये त्याने असंही धक्कादायक दावा केला आहे की त्याने आतापर्यंत तब्बल ३००  महिलांसोबत हे कृत्य केलेले आहे. आठ तासांत ५२ मुलींची बुब्स दाबण्याचा  ‘रेकॉर्ड’ त्याच्याकडे आहे, असेही तो लिहितो.

आता जर एखादा माणूस स्वत:ला ‘बूब हंटर’ म्हणतो आणि त्याने ज्या मुलींचे बुब्स दाबले असे कारनामे तो सांगतो देखील. अन परत वरतून स्वतःला कुल म्हणवतो. तो सांगतोय कि, तो असा रेकॉर्ड करून ‘चॅम्पियन बूब कॅचर’ बनला आहे…. सिरीयसली ?????

याच मुद्द्याला सिरीयसली घेत गायिका चिन्मयी श्रीपादाने ह्या चॅटचे स्क्रीनशॉट ट्विट केलेत. ती देखील या प्रकारावर चांगलीच भडकली. तिच्या ट्विटखाली अनेक युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी त्यांच्या  आयुष्यात घडलेल्या अशाच काही घटना देखील सांगितल्या आहेत. 

महिलांशी जवळीक आणि स्पर्श हा अनेकदा अपघात मानला जातो. मात्र या मुलाची पोस्ट पाहून हा अपघात नसूच शकतो याची जाणीव होते. ३०० पेक्षा जास्त महिलांसोबत असं कृत्य करणे हे एका व्यक्ती साठी मनोरंजनाचा विषय असू शकतो. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांचे संगोपन करताना याची  काळजी घ्यावी, कि ते आपल्या पाल्यांना योग्य समजूत देतील, चांगले विचार आणि आचार शिकवतील.

आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती YouTuber आहे आणि YouTube वर लाइव्ह गेम स्ट्रीमिंग करत असते. 

ही विकृत पोस्ट सध्या देशभरात व्हायरल होत आहे. हा विकृत मुलगा कधी सापडतो आणि पोलीस त्याच्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा गुन्हेगारांना वेळीच शिक्षा झाली तरच अशा गैरप्रकारांना आळा बसेल, असा सर्वसाधारण समज असला तरी अशा विकृत लोकांचे समुपदेशन कारणे आवश्यक आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.