राहून गेलेली बातमी : मोदी सरकारकडे ९० हजार सैनिकांचा पगार आणि भत्ता देण्यासाठी पैसे नाहीत.
मागच्या वेळी राहून गेलेली बातमी म्हणून आम्ही एका बातमीचे पोस्टर केले होते. बातमी होती ती म्हणजे गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्याहून सुशिक्षीत बेरोजगाराच्या संख्येत वाढ झाली आहे. NCRB अर्थात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने हा अहवाल दिला होता. त्यामध्ये २०१८ मध्ये सर्वाधिक म्हणजे १२,९३६ तरुणांनी आत्महत्या केल्याच सांगण्यात आलं आहे. आत्ता आम्ही हा रिपोर्ट सांगितल्यानंतर डोळे उघडून पाहणाऱ्यांनी त्याच कौतुक केलं. पण काहीजणांनी मोदी सरकारवरची टिका म्हणून याकडे पाहीलं. आत्ता सरकारचेच खाते सरकारवर टिका काय करणार. म्हणून आत्ता विचार केला की, राहून गेलेली बातमी संक्षिप्त स्वरुपात सांगण्याऐवजी अगदी डिटेलमध्ये सांगण्यात यावी.
अशीच एक बातमी टेलिग्राफने आपल्या कालच्या ऑनलाईन एडिशनमध्ये छापली आहे. ही बातमी अनेकांच्या नजरेत आली नाही. मराठी माध्यमांनी देखील या बातमीला कव्हरेज दिलं नाही.
तर पहिला मुद्दा ही बातमी काय आहे,
मोदी सरकारकडे भूतान नेपाल बार्डरवर तैनात असणाऱ्या सीमा सशस्त्र बलाच्या ९० हजार सैनिकांचे पगार आणि वेतन देण्यासाठी पैसे नाहीत अस या बातमीत सांगण्यात आलं आहे. दोन महिन्याचे पगार थकवण्यात आल्याचं या बातमीत सांगण्यात आलं आहे. पगारासोबत सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणारा भत्ता देखील थकवण्यात आला आहे.
रकार की तरफ से भूटान-नेपाल बॉर्डर पर तैनात रहने वाले सीमा सशस्त्र बलों (SSB) के करीब 90,000 सैन्यकर्मियों को जनवरी और फरवरी के वेतन और भत्तों का भुगतान नहीं किया गया है. इन भत्तों में सभी तरह के भत्ते शामिल हैं इनमें सशस्त्र बलों के बच्चों की पढ़ाई, लीव कंशेसन जैसे भत्ते मुख्य रूप से शामिल हैं.
सशस्त्र सीमा बल काय आहे ?
भारताच्या २,४५० किलोमीटरच्या सीमारेषेची जबाबदारी ही सशस्त्र सीमा बलावर अवलंबुन असते. त्यांचा समावेश पॅरा मिलेटरी अथवा अर्धसैनिक म्हणून केला जातो. बातमीत असही सांगण्यात आलं आहे की, गेल्या चार महिन्यात ही दूसरी वेळ आहे की सैनिकांचे भत्ते थांबवण्यात आलेले आहेत. मागच्या वर्षी २०१९ च्या सप्टेंबर महिन्यात CRPF च्या जवानांचे भत्ते देखील थांबण्यात आले होते.
याबाबतची सविस्तर बातमी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचू शकता.
https://www.telegraphindia.com/india/border-force-hit-by-cash-crunch/cid/1740143?ref=search-page