८००० निरपराध लोकांना निर्दयीपणे मारणाऱ्या क्रूरकर्माचे सुटकेचे सर्व दार बंद झालेत..

‘बोस्नियाचा कसाई’ म्हणून ओळखला जाणारा माजी बोस्निया सर्ब कमांडर रोक्तो म्लादिक पुन्हा एकदा चर्चेत आलाय. १९९० च्या बोस्निया लढाईत जवळपास ८ हजार मुस्लीम बांधवांच्या हत्येचा आणि अत्याचाराचा त्याच्यावर  आरोप आहे. याच आरोपाखाली  युएन कोर्टान  त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  संयुक्त राष्ट्रांच्या गुन्हे न्यायाधिकरणानं त्याची शिक्षा कमी करण्याची अपील फेटाळून त्याच्यावर लागलेल्या ११ पैकी १० आरोपांसाठी त्याला गुन्हेगार ठरवलंय.

बोस्निया हत्याकांड

एप्रिल १९९२ ते डिसेंबर १९९५ या काळात बोस्नियाचं युद्ध सुरु होत. यावेळी झालेल्या जनमतात  बोस्निया आणि क्रोएशियाचे नागरिक स्वातंत्राच्या बाजूने होते, तर सर्ब नागरिकांनी त्यांच्या  विरोधात वोटिंग केल. त्यामुळे स्वातंत्र पाहिजे असणाऱ्यांचा आवाज बंद करण्यासाठी म्लादिकनं सेनेची मदत घेतली. जवळपास २२०० लोकांची घर त्यान जाळली, इतरांना घाबरवण्यासाठी ताब्यात घेतलेल्या लोकांवर अत्याचार करून त्याचे व्हिडीओ बनवले गेले आणि ते लोकांमध्ये पसरवले. जेणेकरून दहशत पसरवता येईल आणि त्यांच्या डोक्यातला स्वातंत्र्याचा विचार दूर होईल.

यावेळी जवळपास १ लाखापेक्षा जास्त लोकं मारली गेली. ज्यात सगळ्यात जास्त बोस्नियाचे मुस्लीम होते.

म्लादिकनं लहान – मोठ कोणालाच सोडलं नव्हत. असं मानलं जात कि,  दुसऱ्या महायुद्धात युरोपात झालेलं हे सर्वात मोठ हत्याकांड होत.  या लढाईच्या वेळी १,८०,०००  सैनिकांच्या नेतृवात त्याने बर्बर अभियान चालवलं.  यावेळी जवळपास २८ लाख लोकांना आपल्या घरादारावर पाणी सोडावं लागल.

१५  वर्षांपासून मोकाट फिरत होता 

या मोठ्या हत्याकांडानंतर सुद्धा रोक्तो म्लादिक बरीच वर्ष फरार होता. तो आंतरराष्ट्रीय युद्ध गुन्हे न्यायाधिकरणाचा मोस्ट  वॉन्टेड गुन्हेगार होता. १५ वर्ष तो पोलिसांच्या नजरेतून वाचत होता. कारण सर्बियनांच्या दृष्टीकोनातनं तो एक हिरो होता.  त्याने देशाच्या राजकारणात मोठा प्रभाव पाडला होता. ज्यामुळे तो ताठ मानेन मोकाट फिरत होता.

२००० सालापर्यंत तो आपल्या समर्थाकांसोबत बेलग्रेडमध्ये फिरायचा. त्याच्या पाठीवर कुठ ना कुठ  यूगोस्‍लावियाचे माजी राष्ट्रपती स्लोबोदान मीलोसेविचचा हात होता. यांनी म्‍लादिकला सिक्युरिटी दिली होती.  मात्र २०११ मध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलं होत.

… म्हणून झाली होती अटक

त्याच्या अटकेमागेही इंट्रेस्टिंग गोष्ट आहे. सर्बियासमोर आंतरराष्ट्रीय संघटनेचा हिस्सा बनण्यासाठी एकच मार्ग होता तो म्हणजे म्लादिकला अटक करण. युरोपियन संघाचा सदस्य बनण्यासाठी त्याला ती अटक करण गरजेच होत.

२०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  हा हत्याकांडासाठी सर्बचे माजी राष्ट्रपती स्लोबोदान मीलोसेविच आणि सर्ब नेता रादोवान कराद्जिक यांच्यावरही खटला चालवला गेला. मीलोसेविक यांचा ट्रायल दरम्यानच २००६ साली  मृत्यू झाला होता. त्यांनतर युएन कोर्टान  त्याच्यावर अनेक खटले दाखल केले. 

त्यानंतर आता त्यान पुन्हा एकदा आपली शिक्षा कमी व्हावी यासठी आंतरराष्ट्रीय गुन्हे प्राधिकरणाला विनंती केली, मात्र कोर्टान ती अपील फेटाळून त्याची शिक्षा कायम ठेवली. बेल्जियमचे वकील सर्गे ब्रामेअर्त्सने यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला. त्यांचे म्हणणे आहे कि, आता ह्या कसाईजवळ पुढच्या अपीलसाठी कोणताच मार्ग नाही. आणि हा कोर्टाचा शेवटचा निर्णय आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.