मनेका गांधी पुन्हा भडकल्या. आता एका जनावराच्या डॉक्टरला शिव्या घातल्यात !

और तुमने (फिर गाली) कहा कि हमारे पास दवा नहीं है, ये नहीं-वो नहीं. कहीं और से लाओ. मैं तुम्हारा लाइसेंस लेकर रहूंगी.

तुम बदमाश और घटिया हो. तुम बदमाश और घटिया हो. तुम बदमाश और घटिया हो. तुम बदमाश और घटिया हो.तुम बदमाश और घटिया हो.

वरच्या शिव्या ऐकून थोडं इको आल्यासारखं फील करा बघू, कसं वाटतंय ? हे जो कोणी बोललाय त्याच्या कानाखाली जाळ काढायची इच्छा होईल की नाही. पण थांबा हे आज तरी शक्य नाही कारण हे बोलल्यात मनेका गांधी ते पण एका जनावराच्या डॉक्टरला.. बिच्चारा डॉक्टर

त्याच झालंय असं की,

आज सकाळपासूनच ट्विटरवर #BoycottManekaGandhi ट्रेंड व्हायला सुरुवात झाली होती. भाजपच्या नेत्या मनेका गांधी उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरच्या खासदार आहेत. त्यांचं प्राण्यांवर अतीव प्रेम आहे. प्राण्यांच्या हक्कांसाठी त्या तत्पर असतात. ऍनिमल राइट्स एक्टिविस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. पण पशु हक्कांसाठी काम करणाऱ्या मनेका गांधींनी पशुवैद्यकीय डॉक्टरलाच शिव्या दिल्यात. आणि त्यातूनच हा ट्रेंड सुरुय.

मनेका गांधींवर खरं तर त्या पशुवैद्यकीय डॉक्टरला अश्लील भाषा वापरल्याचा आरोप झालाय. त्यांचा शिव्या दिलेला एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. यातला आवाज मनेका गांधींचा आहे.  यामध्ये, त्या आपल्या कुत्र्याच्या उपचारांबाबत पशुवैद्यकीय डॉक्टरांशी बोलत आहेत.

संभाषणातील काही भाग खास तुमच्यासाठी.

मनेका गांधी : तू या कुत्र्याचा पाय उगाच का कापलास ?

डॉक्टर : नाही मॅम

मनेका गांधी : माझ्याजवळ एक मुलगी आली होती अंजली चौधरी. आणि मी बघितलंय की कशाप्रकारे पाय कापलायस. (यानंतर मनेका गांधींनी लागलीच एक शिवी हासडली) त्याचे टाके निघत नाहीयेत.

डॉक्टर : मॅम तुम्हाला पूर्ण डिटेल सांगतो. त्याचे (कुत्र्याचे) टाके एकदम बरोबर घातले होते. पण एक दिवसासाठी सांगून या मॅडम कुत्र्याला घेऊन घरी गेल्या. (कुत्र्याची केयरटेकर) मी त्यांना सांगितलं होत की, तुम्ही घरी घेऊन जाताय, खरं त्याच्या टाक्यांकडे लक्ष द्या. नाहीतर तो ते टाके खोलेल. दुसऱ्या दिवशी या मॅडम कुत्र्याला घेऊन आमच्याकडे आल्या आणि तेव्हा त्याच्या पायाचे टाके निघाले होते.

मनेका गांधी : आणि तू म्हंटलास (पुन्हा शिवी) कि आमच्याकडे यावर काही औषध नाहीये. हे नाही ते नाही. मी तुझं लायसन्स कॅन्सल करूनच राहीन. तु एक नंबरचा बदमाश आणि घटिया आहेस. तुझ्याकडे डिग्री तरी आहे का?

यानंतर डॉक्टरने त्याच्या डिग्र्या सांगायला सुरुवात केली.

मनेका गांधी : ह्या काय डिग्र्या आहेत. हा कुत्रा जर मेला तर तुझं लायसन्सच कॅन्सल करते मी. त्या कुत्र्याला आणून स्वतःजवळचे पैसे घालून ठीक कर. तुझं पूर्ण नाव काय आहे ?

डॉक्टर : विकास शर्मा.

मनेका गांधी : पूर्ण नाव का सांगत नाहीस ? तू कलंक आहेस तुझ्या घरावर म्हणून का (पुन्हा शिवी)

थोड्या वेळच्या संभाषणानंतर मनेका गांधी त्या डॉक्टरला म्हणतात,

“तुम्हारा बाप क्या करता है. माली है, चौकीदार है? तुम पढ़े-लिखे हो भी?”

त्यावर तो डॉक्टर सांगतो त्याचे वडील शिक्षक आहेत.

मनेका गांधी : तु कशाला आलायस या धंद्यात ?

डॉक्टर : धंद्यात ? मॅडम मी डॉक्टर आहे.

हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर मनेका गांधींवर बरीच टीका झाली.

या संदर्भात भारतीय पशुवैद्यकीय संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र ही लिहिलं आहे. या प्रकरणाचे वर्णन करून मेनका गांधी विषयी तक्रार दिली आहे. असोसिएशनचे आणखी एक पत्र व्हायरल झालं आहे. ज्यामध्ये त्यांनी भारतातल्या सर्व पशुवैद्यकीय डॉक्टरांना २३ जून रोजी देशव्यापी निषेध करण्याचे आवाहन केले आहे. आणि हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.

हे संपूर्ण प्रकरण उघडकीस येताच #BoycottManekaGandhi ट्विटरवर ट्रेंड होण्यास सुरुवात झाली. काही लोकांनी लिहिले की आपल्या सर्व नेत्यांनी शालीनता आणि सभ्यतेच्या शाळेत प्रवेश घ्यावा. पीएमओने या घटनेवर कारवाई करावी.

कंचन सरवा नावाच्या एका युजरने ट्वीट केलंय.

“आम्ही वेटरनरी डॉक्टर डिग्री घेण्यासाठी साडे पाच वर्ष अभ्यास करतो. आणि त्या म्हणतायत कि, मिनिटात तुझं लायसन्स कॅन्सल करीन. असं वाटतंय कि, आमच्या पेशाविषयी त्यांनाच जास्तीची माहिती आहे. #BoycottManekaGandhi”

we studied 5.5 years to be a veterinarian and she was saying that she will take our licence within a minute. She knows more about our proffession then us.#BoycottManekaGandhi #मेनकागांधीमाफीमांगे

— Kanchan Sarwa (@SarwaKanchan) June 23, 2021

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.