ब्रेक द चेन ला हातभार लावायला या १२ बियर ट्राय करुन घरात निवांत बसू शकता… 

आया मौसम ठंडे ठंडे बियर का.. ठंडे ठंडे बियर का…. 

अरे भावड्या जगात काय चाल्लय, तुझं काय चाल्लय. इथं दारूची दुकानं बंद आहेत. मुख्यमंत्र्यानी उद्यापासून संचार बंदी लागू केलीय आणि तू काय सांगतोय. भावांनो सगळं सगळं मान्याय. पण कसय. सगळ्याचं टेन्शन घेवून कसं चालल.

शिवाय आम्ही जो विषय मांडतोय तो पण प्रशासनासाठी उपयोगाचा ठरू शकतोय. म्हणजे कसं तर लोकं बियर ट्राय करणार. मग जास्त बियर पिवून घरात बसणार. बाहेर पडणार नाहीत आणि कोरोनाचं संक्रमण थांबणार. आहे कनाय ब्रेक चेन. तुम्हाला तर विषयच कळत नाय. 

त्यात आत्ता आलाय उन्हाळा, मग तुम्हाला रम, व्हिस्कीचा पर्याय सुचवणं देखील चुकीचं ठरू शकतय म्हणून म्हणलं बियर सांगाव्यात. सर्वात कडक आणि सर्वात भारी अशा या दहा बियर आहेत. एकेक नाव वाचा आणि मिळवण्याचा प्रयत्न करा. 

लॉकडाऊनमध्ये कशी मिळवायची हे अस्सल दारूड्याला सांगायची गरज नाही 

) BroCode

BroCode

भारतात सर्वांधिक अल्कोहलची मात्रा या बियरमध्ये आहे. म्हणजे ही स्ट्रॉंग आहे. १५ टक्यांपर्यन्त यात अल्कोहल असतय. कडवट फ्लेवर आहे पण जिथे तीन लागतात तिथे या जातीच्या दोन बियरमध्ये काम भागतय.  

२) किंगफिशियर स्ट्रॉंग 

kingfisher beer 2

किंगफिशियर तुम्हाला साधा ब्रॅण्ड वाटू शकतोय. तस वाटत असलं तर एकदा गोव्याला जावून बघा. तिथं या ब्रॅण्डची फुल्ल चलती असते. अस्सल बियर पिणारे पण किंगफिशियरच पेत असतात. यात अल्कोहलची मात्रा टक्के असते. म्हणजे ब्रो कोडच्या जवळपास निम्मी. 

) HAYWARDS 10,000

हेवर्ड्स हे नाव ऐकलं की सहसा लक्षात येणार नाही, पण कर्नाटक सारख्या भागात गेलात की याची जादू कळेल. गेल्या ३० वर्षांपासून ही बियर धुमाकूळ घालून आहे. चकण्याला फक्त शेंगदाणे अथवा तिखट खाणाऱ्या लोकांची बियर म्हणून एक सेपरेट क्लास देखील या बियरचा आहे. यात आठ टक्के अल्कोहल असतय. 

४) गॉडफादर 

एकदम स्ट्रॉंग चव. चिपडा माल पण नाव गॉडफादर. यात पण टक्के अल्कोहल असतय. स्वस्त: मस्त असा हा खेळ आहे. शिवाय ज्याला ब्रॅण्ड माहिती नाही त्याला लय भारीतली बियर हाय भावा दोन हजाराला एक बाटली आणल्या म्हणून तुम्ही पाजू शकताय. नाव चांगल असल्यामुळं खपून जातय.  

५) बॅड मंकी 

यात पण टक्के अल्कोहल असतय. बिरा जशी गोड लागत्या तशी ही लागत्या. एकदम सॉफ्ट. अस्सल बियर पिणाऱ्यांना हे आवडणारं प्रकरण नाही पण समजा जोडीदार बियर पिणारा नसला तर त्याच्यासाठी हा ब्रॅण्ड सिलेक्ट करु शकताय तुम्ही.  

६) सिंम्बा स्ट्रॉंग 

download 10

यात पण टक्के अल्कोहल असतय. भेंडी सगळ्यातच आठ टक्के असतय तर कौतुकानं सांगताय कशाला.  असो तर एक स्वॅग म्हणून ही बियर पुढे यायला लागल्या. मी काहीतरी वेगळं पितो सांगून बिरा पिणारी जमात जशी पुढे आलेली तशीच सिंम्बाची जमात पुढे यायला लागली आहे. 

७) नॉक आऊट 

थोडं विषयांतर करतो पण पर्सनल सांगतो एकदा ही बियर मारलेली. आगआयआय लय कडू. टिपीकल दगडाच्या खाणीवरचा माल वाटला. पण कुणाची चॉईस कशी असल सांगता येत नाय. ट्राय करायला हरकत नाय आवडणाऱ्याला काय बाबा कायपण आवडू शकतय. लोकांनी आर्चीला पण डोक्यावर घेतलेलच की. 

८) कल्याणी ब्लॅक लेबल 

कल्याणी ब्लॅक लेबक, कस आकडा लावल्यासारखं वाटतय नाय. बियर मारली की आकडी आल्यासारखं देखील वाटू शकतय. कडू आहे, स्ट्रॉंग आहे. झिणझिण्या आणण्याचं काम करते. 

९) बिरा बुम 

bira 91 launches 2 new beers and one of them has only 90 calories

प्रिमियम क्लालिटीची बियर आहे. बीरा ने गेल्या काही वर्षात चांगल नाव कमावलय. यात पण नाव कमावण्याची स्टाईल असते. विशेष म्हणजे आत्ता बिरा लय कष्ट न घेता सुद्धा सगळीकडे मिळते. भारी बियर आहे. एकदा नाद लागला तर तुम्ही पर्मनंट ब्रॅण्ड म्हणून वापरू शकत. 

१०) कासबर्ग स्ट्रॉंन्ग 

हा आला आपला ब्रॅण्ड. सात टक्के अल्कोहल. चवीला पण भारी. लय कडू नाही का लय गोड नाही. त्यातही थंडगार असेल तर टेन्शन नॉट. 

११) बडवायझर मॅगनम 

इंजिनिरिंग झालं असेल आणि US मध्ये जायची स्वप्न पडत असतील पण आत्ता घरातनं येणाऱ्या १५ हजारात महिना काढायला सांगितला जात असेल तर तुम्ही ही बियर पिवू शकताय. म्हणजे धड इकडेचे ना तिकडचे असतात त्यांच्यासाठी त्यातल्या त्यात हा उच्चवर्णीय ब्रॅण्ड म्हणावा लागेल. 

१२) टॅंगो पंच 

Desi Daru Tango Punch

ही बियर नाही, पण दारूचा विषय निघाला की काही कळो अगर न कळो टॅंगो पंच लिहून जाण्याचा एक ट्रेन्ड आहे. कार्यकर्त्यांच समाधान व्हावं म्हणून हे नाव लिहलय. बाकी काही नाही. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.