म्हणून कुक्स या ब्रिटीश माणसाने आपला ग्रॅंथ “धोंडी महार” या व्यक्तीस अर्पण केला आहे.

मुंबईत रेल्वे आली होती. पण पुण्यात येण्यासाठी रेल्वेमार्ग नव्हता त्या काळची ही गोष्ट. पुर्वीच्या काळी मुंबई पुणे प्रवासासाठी १८ तास लागायचे. इतक्या कमी वेळात पुण्यातून मुंबईस जाता येत म्हणून लोक खूष होते.

तो प्रवास कसा असायचा तर पुण्याची गाडी खंडाळ्याला आली सगळ्या लोकांना खाली उतरवून तिथून पालख्या, डोल्या, खुर्च्या नि बैलगाड्यात बसवून सर्वांना घाटाखाली खोपोलीत आणले जायचे. ठाकूर आणि कातकरी लोकांच्याकडे सामान वहायचे काम होते. लोकांना अशा प्रकारे खंडाळ्यातून खोपोलीस घेवून जाण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटची या पारशी व्यापाऱ्याकडे होते. हा प्रवास अठरा तासात पुर्ण व्हायचा आणि इतक्या कमी वेळात पुणे-मुंबई प्रवास होतो म्हणून लोक खूष असायचे.

याच काळात कर्जत पळसधरीवरून बोरघाट खोदण्याचे काम चालू होते. इंग्रज अधिकारी असणारा मिस्टर कुक यांच्या मार्गदर्शनाखाली बोरघाट खोदण्याचे काम सुरू होते.

आजही घाट पाहिल्यानंतर जाणवते की त्याकाळात पुरेशा सोईसुविधा नसताना देखील हे काम कसे केले असेल. या कामासाठी लाखांहून अधिक कामगार दिवसरात्र खपत होते. साध्या पहारीने हे काम चालायचे. सहाजिक त्यामुळे शेकडो अपघात होतं असत. दिवसाला याची गणती कशी होती तर दर दिवशी १०० एक अपघात व्हायचे. त्यामध्ये कित्येकांची हाडे तुटायची, कुणाच्या पायावर भल्लामोठ्ठा दगड पडायचा. खरचटण्यापासून जीव जाण्यापर्यन्तच्या जखमा व्हायच्या.

आत्ता यावर उपचार कसे असायचे तर,

इतक्या मोठ्या कामगारांसाठी वैद्यकिय सेवा उभारणे अशक्य कोटीतली गोष्ट होती. नाही म्हणायला आठ दहा डॉक्टर प्राथमिक उपचार करण्यासाठी तळ ठोकून असल्याच्या नोंदी मिळतात मात्र लाखोंच्या संख्येने असणाऱ्या कामगारांवर उपचार करण्यासाठी असणारी डॉक्टरांची संख्या असून नसल्यासारखी होती.

अशा वेळी लाखभर लोकांसाठी उपचार असायचा तो धोंडी नावाच्या व्यक्तीचा.

धोंडी इथेच मजूर होता पण त्याला वनस्पतीशास्त्राची चांगली जाणीव होती. कुणाचा पाय मुरगळला किंवा मोठमोठ्या जखमा झाल्या तर मजूर धोंडीकडे जात. तो जंगलातला पाला तोडून आणत आणि तात्काळ उपचार करत. पिचलेली हाडे तो वनस्पतींचा लेप लावून ठिक करत असे. आपल्या डॉक्टरांकडून उपचार होत नाहीत पण इथे असणाऱ्या या धोंडी महार या व्यक्तीकडून कसे पटकन उपचार होतात, जखमा बऱ्या होतात असा प्रश्न मुख्य इंजिनियर असणाऱ्या कुक्स या अधिकाऱ्याला पडला.

त्याने धोंडी महार या व्यक्तीला सोबत घेतलं आणि संपुर्ण बोरघाट पालथा घातला. घाटात असणाऱ्या वनस्पतींची इत्यंभूत माहिती त्यांचे औषधी गुणधर्म नोंद करुन घेतले. वनस्पतींचे नमुने गोळा करून त्यांची हुबेहुब चित्र काढण्यात आली आणि वनस्पतीशास्त्रावर इंत्यभूत माहिती असणारा इंग्रजी ग्रॅंथ लिहला. या ग्रॅंथाचे नाव “कुक्स फ्लोरा”. वनस्पतीशास्त्रात हा ग्रॅंथ आजही आधारभूत गणला जातो.

विशेष म्हणजे कुकने हा ग्रॅंथ धोंडी महार या व्यक्तींस अर्पण केला. त्याने पुस्तकामध्ये हा ग्रॅंथ “धोंडी महार” यास अर्पण करत असल्याचे नमुद केले आहे.

संदर्भ : प्रबोधनकार ठाकरे समग्र साहित्य. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.