अटल बोगदा निर्माण करणाऱ्या ‘बीआरओ’ ला भारतीय सीमेची रक्तवाहिनी का म्हणतात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच उद्घाटन केलेल्या अटल बोगद्याचे बांधकाम ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ ने केले आहे. बीआरओने यापुर्वी देखील अशीच अनेक आव्हानात्मक बांधकाम पुर्ण करुन दाखविली आहेत. तसेच ही संस्था केवळ कठीण काळात फक्त रस्ते बनवायचे काम करत नसून भारताच्या सीमेवरील लोकांची रक्तवाहिनी बनली आहे.

या प्रकल्पावर कर्तव्य बजावताना अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. या लोकांना नेहमी धोक्याशी खेळत आणी मृत्यूशी हसत कर्तव्य बजावायचं असते.

स्वातंत्र्य मिळून जेमतेम १२ वर्ष झाली होती.

भारतातील पंचवार्षिक योजनांचा तो काळ होता. पायाभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था, शिक्षण, दळणवळणासाठी रस्ते यांची उभारणी करण्याची सुरुवात झाली होती. त्याच सोबत भारताच्या सीमांवर देखील तणाव असायचा.

चीन सोबत पंचशील करार झाला होता पण सीमेवर तणाव होताच.

तसेच भारताचा उत्तरेकडील आणि पुर्वेकडील सीमावर्ती भाग हा संपुर्ण पणे डोंगराळ आणि बर्फाळ असा होता त्यामुळे तिथे लष्कराचे सामान आणि पायाभूत सुविधा पोहचवणे जिकीरीचे होत होते. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने देखील हे अत्यंत संवेदनशील भाग. त्यामुळे येथे रस्त्यांची उभारणी होणे आवश्यक होतेच. परंतु तितक्याच विश्वासार्ह संस्थेकडून बांधकाण होणे गरजेचे होते.

यावर उपाय म्हणून तत्कालिन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी ७ मे १९६० रोजी ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ची स्थापना केली.

तसेच ही संस्था संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली ठेवली. सैन्यातील अभियांत्रीकी विभाग म्हणून हा विभाग काम करु लागला.

व्हिजन:

राष्ट्रांच्या सर्वात प्रतिष्ठित, बहुविध, बहुराष्ट्रीय, आधुनिक बांधकाम संघटनेने सुप्रसिद्ध नेतृत्व, एक मजबूत, कुशल आणि वचनबद्ध कार्य शक्ती आणि एक मजबूत पर्यावरण विवेक असलेल्या सशस्त्र दलाच्या धोरणात्मक गरजा
भागविण्यासाठी वचनबद्ध. पायाभूत विकासासाठी मोठ्या प्रमाणात योगदान देऊन सामाजिक आर्थिक विकासात राष्ट्रीय भूमिका पार पाडणे.

मिशन :

१. सशस्त्र दलांना त्यांच्या धोरणात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रतिबद्ध, समर्पित आणि खर्च प्रभावी विकास आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता करणे.

२. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य, वास्तविक वेळ आणि प्रभावी निर्णयासाठी पर्यावरण तयार करणे.

काही आव्हानात्मक बांधकामे :

भारत-चीन सीमेवरील (India-China Border Dispute) तणावा दरम्यान बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO)लेहजवळ तीन महत्त्वाचे पूल बांधले. हे पूल सामरिक दृष्टीने भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण चीनशी सुरू असलेल्या तणावामुळे या पुलांवरून लष्कराचे रणगाडे प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) सहज पोहोचवता येणार आहेत. NH1 वर बनवण्यात आलेले तिन्ही पूल फक्त तीन महिन्यांत तयार करण्यात आले आहेत. हे पूल कित्येक टन वजन पेलू शकतात.

७० कामगार ६ दिवसांत १२० फूट लांब पूल उभारला

उत्तराखंड पिथोरागढमधील मुनस्यारी येथे नाल्यावरील एक पूल तुटला होता. मुनस्यारी येथून मिलम जाणाऱ्या मार्गावर धापाजवळ असलेल्या सेनर नाल्यावर बनवण्यात आलेला पूल तुटला होता. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (BRO) कठोर परिश्रम घेत त्याच ठिकाणी फक्त ६ दिवसांत नवीन पूल उभारला

हा पूल उभारला गेल्याने भारतीय लष्कर आणि आयटीबीपीच्या जावनांसमोर मोठी अडचण दूर झाली आहे. यामुळे जवानांना चीन सीमेवर वेळेत जाता पोहोचता येणार आहे. ७० कामगार आणि एका पोकलँड मशिनद्वारे हा १२० फूट बेली पूल उभारण्यात आला.

या संस्थेला भारत रत्न देण्याची मागणी

अटल सेतु, अटल बोगदा यांसारखी अनेक आव्हानात्मक काम करणाऱ्या या संस्थेला महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनीदेखील संस्थेचं कौतुक करत त्यांना भारतरत्न मिळालं पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.