बंगालच्या बुद्धदेव भट्टाचार्यांनी पद्मभूषण पुरस्कार का नाकारला ?

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशांतील सर्वांत मानाच्या पद्म पुरस्कारांचे मानकरी नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पुरस्कार आहेत. या पुरस्काराची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून केली जाते. दरवर्षी मार्च वा एप्रिल या महिन्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यात राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र (सनद) तसेच एक पदक यांचा समावेश असतो. यंदा देखील विविध क्षेत्रांतील मान्यवर पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांचे मानकरी ठरलेत.

यात पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री राहिलेले बुद्धदेव भट्टाचार्य यांना देखील केंद्रातर्फे पद्मभूषण पुरस्काराचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आलं.  

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य  व जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण देऊन सरकारने वेगळ्या विचारधारेचा सन्मान केलाय. गुलामनबी देशभक्त तर बुद्धदेव सचोटीचे नेते आहेत. अशी चर्चाच होती कि तितक्याच पुरस्कारांविरोधात पहिली ठिणगी पडली. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्म सन्मान स्वीकारण्यास नकार दिला आहे. अन  

बुद्धदेव भट्टाचार्य यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास थेट नकार दिला आहे. 

पुरस्कारांची घोषणा होताच काही वेळातच त्यांनी हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बुद्धदेव यांनी पुरस्कारांची घोषणा होताच पुरस्कार नाकारला असून ते म्हणाले, ”मला पद्म भूषण पुरस्काराबाबत काही माहिती नाही. मला याबद्दल काहीच कळवण्यात आलेलं नव्हतं. तसंच मला अशाप्रकारे पुरस्कार जाहीर झाला असल्यास मी तो नाकारु शकतो.” दरम्यान माकप पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव यांच्या या निर्णयासोबत माकप पक्षाचा देखील हाच निर्णय़ असल्याचं माकप पक्षाच्या सूत्रांकडून समोर येत आहे.

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय गृह सचिवांनी बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या पत्नीशी पुरस्काराविषयी बोलले होते. तेंव्हा त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला आणि आभार मानले, असे गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी फ्लबचे स्पष्टीकरण देताना सांगितले.

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्जी यांनी सांगितले की, त्यांचे पद्मभूषणसाठी नाव घेतले गेले होते हे त्यांना माहीत नव्हते, ते असंही म्हणाले कि, ”मला पद्म भूषण पुरस्काराबाबत काही माहिती नाही. मला याबद्दल काहीच कळवण्यात आलेलं नाही. तसंच मला अशाप्रकारे पुरस्कार जाहीर झाला असल्यास मी तो नाकारु शकतो”.

आतापर्यंत सीपीएम आणि सीपीआयच्या कुठल्याही नेत्याने अशा प्रकारचा पुरस्कार स्वीकारलेला नाही. माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांनाही भारतरत्न सन्मान देण्याची चर्चा झाली होती. मात्र त्यांनीही त्याला नकार दिला होता. 

भट्टाचार्य आपला पगार पक्षाला देणगी म्हणून देत असत. 

कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे कट्टर टीकाकार म्हणून त्यांना पाहिलं जातं, ते ७७ वर्षांचे असून गेल्या काही काळापासून हृदय आणि फुफ्फुसाच्या आजारांनी त्यांना त्रासलं आहे.

कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य हे सलग २४ वर्ष आमदार आणि २००० ते २०११ अशी अकरा वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री राहिले आहेत.  ज्योती बसू यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. ते २०११ मध्ये डाव्या पक्षांचा पराभव होईपर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. बुद्धदेव भट्टाचार्य हे सीपीआयएमचे पोलिट ब्युरोचे सदस्य राहिले आहेत. 

त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे मंत्रिपदाचे वेतनही पक्ष कार्यासाठी समर्पित करत असत, ना बंगला, ना कार…. पक्षाकडून मिळणाऱ्या निर्वाह खर्चावर त्यांचा परिवार चालतो असं म्हणलं जातं. कम्युनिस्टांचा साधेपणाने त्यागाची आणि कातील एक मिसाल म्हणून त्यांना मानले जाते.

ज्येष्ठ गायिका संध्या मुखर्जी यांनी देखील त्यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे, सोबतच त्यांनी असंही म्हणलं कि, “पद्मश्री नको अपमान वाटतो”

कोण आहेत या संध्या मुखर्जी ?

६० अन ७० च्या दशकातील मधुर आवाज म्हणून संध्या मुखर्जी यांना ओळखलं जातं.  संध्या मुखर्जी यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९३१ रोजी कलकत्ता येथील धाकुरिया येथे झाला. त्यांचे वडील रेल्वे अधिकारी होते. ६ भावंडांमध्ये संध्या सर्वात लहान आहे. 

पंडित संतोष कुमार बसू, प्रोफेसर एटी कन्नन आणि प्रोफेसर चिन्मय लाहिरी यांच्याकडून त्यांनी संगीत शिकण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांचे गुरू उस्ताद बडे गुलाम अली खान होते. उस्ताद गुलाम अली खान यांच्यानंतर त्यांचे पुत्र उस्ताद मुनव्वर अली खान त्यांचे गुरू झाले, ज्यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीतावर प्रभुत्व मिळवले.

हिंदी चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली. त्यांनी १७ हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्याची सुरुवात त्यांनी १९५० मध्ये आलेल्या तराना चित्रपटातून केली होती. यानंतर, १९५२ मध्ये, त्या वैयक्तिक कारणास्तव कोलकात्याला परतल्या. तिने बंगाली कवी श्यामल गुप्ता यांच्याशी १९६६ मध्ये लग्न केले. संध्या मुखर्जी ही ६० आणि ७० च्या दशकातील सर्वात महत्वाच्या गायिका मानल्या जातात. त्यांनी हजारो बंगाली आणि बिगर बंगाली गाणी गायली आहेत. संध्या आणि हेमंत मुखर्जी यांची जोडी आजही संगीतप्रेमींच्या स्मरणात आहे.

त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर होण्याच्या आधी २०११ मध्ये पश्चिम बंगालचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘बंग विभूषण’ मिळाला होता. १९७० मध्ये ‘जय जयंती’ नावाच्या बंगाली चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.पण त्यांनी पद्मश्री नको अपमान वाटतो” असं म्हणत पद्मश्री पुरस्कार नाकारला आहे. 

आता असे दिग्गज व्यक्ती भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पुरस्कार नाकारत असलेली अत्यंत विचार करायला भाग पडणारी घटना आहे. त्यासाठी हा नकार म्हणजे सरकारसाठी मोठा पेच असल्याचं म्हणलं जातं.

तसेच चित्रपट लेखक सलीम खान यांनी सांगितले होते की त्यांनी २०१५ मध्ये पद्मश्री स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यांच्या आधी, इतिहासकार रोमिला थापर यांनी २००५ मध्ये त्यांना जाहीर केलेला पद्मभूषण नाकारला होता, तर १९८४ मध्ये भारतीय सैन्याने सुवर्ण मंदिराला वेढा घातल्यामुळे त्यांचा १९७४ चा पुरस्कार परत केला होता. लेखक खुशवंत सिंग यांनी देखील याच मुद्द्यावरून १९७४ मध्ये पद्मभूषण परत केले होते परंतु त्यांनी २००७ मध्ये पद्मविभूषण स्वीकारला.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.