कित्येक दशकांची परंपरा बंद करत अर्थमंत्र्यांनी मेड इन इंडिया टॅबवर बजेट सादर करणे सुरु केलं

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प संसदेत सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प मांडत आहेत. पण यावेळी अर्थमंत्र्यांसोबत असणाऱ्या त्या लाल  बॅगबद्दल अनेकदा प्रश्न पडतात, बऱ्याच चर्चा होतात त्यात नेमकं असतं तरी काय ? एवढा संपूर्ण देशाचं  बजेट त्या बागेत कस काय सामावतं? पण दरवेळेस अर्थमंत्र्यांच्या हातात असणाऱ्या त्या लेदर बॅगची चर्चा जरी होत असली तरी २०१९ पासून लेदर बॅग ची नव्हे तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन हातात असणाऱ्या टॅबची होत असते…भलेमोठे कागदांचे गट्ठे, फायली इत्यादी सरकारी कागदपत्रांचा गोंधळ बाजूला ठेवत मोदी सरकारने २०१९ पासून पेपरलेस बजेट सुरु केले. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत २०१९ मध्ये पहिल्यांदा वापरल्या गेलेल्या ‘बही-खाता’ ऐवजी टॅबद्वारे  २०२२-२३  वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत…या अर्थसंकल्पाकडे सामन्य जनतेसह तरुण, महिला, विद्यार्थी, उद्योजक आणि अर्थतज्ज्ञांचं लक्ष लागलं आहे.

सीतारामन आणि वित्त मंत्रालयाच्या इतर अधिकार्‍यांनी मंत्रालयाच्या कार्यालयासमोर हातात लाल कव्हरमध्ये ठेवण्यात आलेले बजेट दाखवत पोज दिली आहे.  २०१९ पासून बाही खाता ऐवजी सीतारामन या हातात टॅब असलेल्या दिसतात…२०१९ पासून अर्थसंकल्प पेपरलेस स्वरूपात सादर केला जाईल, म्हणून, सीतारामन टॅबमधून दस्तऐवज वाचत असतात.

हा टॅब लाल कव्हरमध्ये ठेवण्यात येतो, त्यावर सोनेरी रंगात अशोकस्तंभाचे प्रतीक कोरलेले असते, ज्यावर ‘बही खाता’ असे चिन्ह दिसते. दरवर्षी हे डिजिटल बही खाता असाच दिसतो. 

सीतारामन यांनी २०१९ मधील त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पात लेदर ब्रीफकेस बाळगण्याची परंपरा खंडित केली जी अनेक दशकांपासून अर्थसंकल्पीय कागदपत्रे ठेवण्यासाठी वापरली जात होती. अर्थसंकल्पीय ब्रीफकेस बाळगण्याची परंपरा ब्रिटिशांनी दिली होती. ब्रिटनमध्ये ब्रीफकेस एका अर्थमंत्र्यांकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर होत असे. परंतु, भारतात अर्थमंत्री वेगवेगळ्या ब्रीफकेसचा वापर करत असायचे. पण सद्याच्या अर्थमंत्र्यांनी या परंपरेला बगल देत अर्थसंकल्पाची कागदपत्रे ‘बही-खता’त म्हणजेच खतावणीमध्ये नेली.. तसेच २०२१ मध्ये भाजप सरकारने ‘केंद्रीय बजेट मोबाइल अॅप’ देखील लाँच केले होते जेणेकरुन संसद सदस्य (खासदार) आणि सामान्य जनतेला काही क्लिकवर कागदपत्रांवर प्रवेश करता येईल.

पण अर्थमंत्री बजेट सादर करण्यासाठी ज्या टॅब चा वापर करतात तो टॅब मुळात ‘मेड इन इंडिया’ आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील वर्षाचं देखील मेड इन इंडिया टॅबने बजेट सादर केलं होतं. त्यानंतर अनेकांना रेड ब्रिफकेस बद्दल असणारं कुतूहल संपलं अन अर्थमंत्री वापरात असणाऱ्या टॅब ची उत्सुकता लागली होती, अनेकांना वाटलं त्यांनी वापरलेला टॅब हा आयपॅड च असू शकतो. या मेड इन इंडिया टॅबबद्दल बहुतेक लोकांना जाणून घ्यायचे आहे, असे गुगल सर्चमधून समोर आले आहे. 

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की २०२१ च्या बजेट वेळेस ज्या मेड इन इंडिया टॅबमध्ये अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता तो टॅब लावा कंपनीचा टॅब होता यंदा देखील तोच असल्याचं अनुमान काढलं जातं. २०२१ च्या बजेटच्या वेळेस लावा इंटरनॅशनलचे प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड सुनील रैना यांनी ट्विट करत ज्या टॅबमधून बजेट सादर केले गेले ते लावा टॅब असल्याची पुष्टी केली होती..

आणि आत्ताचा देखील मेड इन इंडिया टॅब आहे. 

होय…..ट्विटरवर, डिजिटल इंडियाच्या अधिकृत पेजने ट्विट केले आहे. “#AatmanirbharBharatKaBudget | ‘बही खाता’ पासून ते ‘मेड इन इंडिया’ टॅब्लेट अर्थमंत्री @nsitharaman अर्थसंकल्प #पेपरलेस फॉरमॅटमध्ये ब्रीफकेस किंवा ‘बही खाता’ ऐवजी राष्ट्रीय चिन्ह  असलेल्या पारंपारिक लाल कपड्यात ठेवलेल्या टॅबलेटमध्ये घेऊन जात आहेत. अशा आशयाचं हे ट्विट आहे.

गेल्या काही वर्षांत, सीतारामन यांनी पारंपारिक ब्रीफकेस सोडली आणि ‘बही खाता’ द्वारे मेड-इन-इंडिया टॅबलेटद्वारे बजेट सादर केले. त्यामुळे सीतारामन या एकमेव अर्थमंत्री ठरल्या ज्यांनी कित्येक दशकांची परंपरा बंद करत मेड इन इंडिया टॅबवर बजेट सादर करणे सुरु केले. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.