राजकीय नेत्यांचे बुरखा हरण : श्री. यशवंतराव मोहिते

रा.तु पाटील (तडसरकर) यांचे “बुरखा हरण राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे” या पुस्तकाची प्रथम आवृत्ती जून १९८८ साली प्रसिद्ध करण्यात आली. या पुस्तकामध्ये तत्कालीन परिस्थित प.महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांबद्दल तटस्थपणे लिहण्यात आले आहे. हेच लेख आम्ही क्रमाक्रमाने आपणासमोर देत आहोत.

पैकी या लेखमालिकेतील दूसरा लेख श्री. यशवंतराव मोहिते 

अति शहाणा त्याचा बैल रिकामा 

श्री. यशवंतराव मोहित्यांचे सारख्या एका अत्यंत हुषार, कर्तबगार, महत्वाकांक्षी, विचारवंत नेत्याच्या राजकीय जीवनाचे पर्यवसान अगदी या म्हणीप्रमाणे (निदान आज तरी) झाले आहे. 

एक यशवंतराव चव्हाण दिल्लीला गेल्याने त्यांच्या मुख्यमंत्री पदावर आज ना उद्या आमचे दुसरे यशवंतराव (मोहिते) नक्की बसणार असे त्यांचे मित्र, चाहते अनुयायी छाती ठोकपणे सांहत त्यात अशक्य असे काहीही नव्हते. परिस्थितीनुसार बॅ अंतुले व बाबासाहेब भोसले कोणाच्या ध्यानी मनी स्वप्नी नसताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले त्यांना ती पदे टिकवता आली नाहीत. हा भाग अलाहिदा पण यशवंतराव मोहिते सर्व बाजूनी मुख्यमंत्री पदासाठी पात्र असताना त्या दिशेने अधुन मधून वारे वहात असतानाही प्रत्यक्षात ते पद आमच्या भाऊना गवसले नाही.

अर्थात त्यास कारण काही अंशी प्रतिकुल राजकीय परिस्थिती तर आहेच पण त्यापेक्षा अधुन मधून पडलेली चुकीची पावलेही बाधक ठरली. १९७२ च्या विधानसभा निवडणूकीत ते आपल्या दक्षिण कराड या भक्कम बालेकिल्यात सारी शक्ती पणाला लाऊन सुद्धा दमछाक होऊन जेमतेम चार हजार मतांच्या फरकाने निवडून आले. १९८० च्या लोकसभा निवडणूकीत कराडच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये कमी मतदान झाले तर १९८ च्या निवडणूकीत तर त्यांना लोकसभेचे राहो विधान सभेचेही तिकीट कॉंग्रेस पक्षाने दिले नाही. 

स्वातंत्र लढ्याला अप्रत्यक्ष मदत 

१९४२ ते १९४६ स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी यशवंतराव कोल्हापूर येथे उच्च शिक्षण घेत होते. पण त्यांना राजकारणाचा नाद, दांडगा व्यासंग त्यामुळे भाई जी.डी. लाड, नागनाथअण्णा नायकवडी, वाय.सी.पाटील वगैरे तरुण भूमिगत क्रांतिकरार अधुन मधून कोल्हापूरला जात तेव्हा यशवंतराव मोहिते त्यांचेशी चर्चा करीत आश्रय व इतर मदत देत असे म्हणतात.

अर्थात १९४८ साली शेतकरी कामगार पक्ष कॉंग्रेसमधुन बाहेर पडला तेव्हा वरील पार्श्वभूमीमुळेच की काय यशवंतराव शेतकरी कामगार पक्षात दाखल झाले. पक्षातील वरच्या श्रेणीतील अत्यंत अभ्यासू मार्क्सवादाचे गाढेतज्ञ अशा तरुण नेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसले. १९५० च्या सप्टेंबर मध्ये आपल्या रेठरे गावाजवळच्या सडकेवरीला वाठार या गावी पक्षाचे वैभवशाली अधिवेशन घेऊन आपल्या व घराण्यांच्या सर्व शक्तीनिशी ते यशस्वी करुन दाखविले. 

शे.का. पक्षातील कार्य व स्थान  

स्वतंत्र भारतातील पहिल्याच १९५२ च्या सार्वत्रिक निवडणूकीत स्वत:च्या दक्षिण कराड मतदार संघातून ते संभाजीराव थोरात या वजनदार स्वातंत्र्य सैनिकास पराभूत करुन निवडून आले तर १९५७ साली यशवंतराव चव्हाण यांचे साडू दादासाहेब जगताप यांचा त्यांनी पराभव केला. शे.का. पक्ष व त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्र समितीचे आंदोलन यामध्ये यशवंतरावांनी जबाबदारीने कामे पार पाडली. 

सत्ताधारी पक्षात प्रवेश 

मध्यंतरीच्या काळात शे.का. पक्षाची दोन शकले झाली पण यशवंतराव, शंकरराव मोरे गटाला चिटकून राहिले. नंतर खुद्द मोरेच मार्क्स्वादाशी गट्टी फू करुन कॉंग्रेसमध्ये गेले तेव्हा यशवंतराव मोहिते, आनंदराव चव्हाण, तुळशीदास जाधव, र.के.खाडीलकर यांनी थोडे दिवस मजगूर किसा हा पक्ष स्थापन केला अखेर ही सर्वच मंडळी १ मे १९६० रोजी मुंबई राजधानीसह महाराष्ट्र स्थापन होण्याच्या सुमारास थेट कॉंग्रेस पक्षात जाऊन पोहचली व सत्तेत वाटा मिळवण्याच्या उद्योगाला लागली. 

कर्तबगार हुषार मंत्री 

यशवंतराव मोहिते समाजवाद, मार्क्सवाद इ. गुंडाळून सत्ताधारी पक्षात गेले तेव्हा आम्हा मंडळींना खूप राग आला. पण बिचाऱ्यांच्या हूषारीचे कर्तबगारीचे चीज होवो अशी सदिच्छाही होती.

पण यशवंतराव चव्हाणांनी, हवे तर राज्यमंत्रीपद स्वीकारा नाही तर दोनतासांनी तेही मिळणार नाही असे एका पहाटे फोन करुन संदेश पाठवला व यशवंतराव चव्हाणांची पूर्वीची आठवण ठेऊन कोणा हितचिंतकाच्या सल्लाने भाऊंनी नाईलाजाने राज्यमंत्रीपद स्विकारले नंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपदही मिळाले सहकार चळवळीच्या अभ्यासाचा अनुभवाचा उपयोग त्यांना सहकार मंत्री म्हणून काम करताना धाला.

अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी चमक दाखवली एक कार्यक्षम हुषार मंत्री म्हणून ते आणखी वरच्यास्थानी जाणार असे वाटू लागले. 

इंदिरा गांधींच्यापर्यंत संधान 

१९६९ साली राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची निवड करण्यावरून कॉंग्रेसची दोन शकले पडली त्यावेळी संजीव रेड्डींना निवडून आणण्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी सारी ताकद पुण्याई एकवटून वसंतराव दादा वसंतराव नाईक यांच्या मदतीने महाराष्ट्रीय आमदार व खासदाराचे एक गठ्ठा मतदान मिळवले दिल्लीत इंदिराजींच्या सानिध्यात राहणारे तुळशीदास जाधवस र.के.खाडीलकर, आनंदराव चव्हाण यांनी व्ही.व्ही. गिरी यांना मतदान केले वेळ आणिबाणींची होती. इंदिराजी प्रत्येक मंत्र्याची नाडी ओळखत होत्या.

त्यांनी यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई यांना मदतीसाठी हाक दिली. दिल्लीला बोलावले. पण यशवंतराव वसंतराव वगैरे नेते व बहुसंख्य कॉंग्रेस आमदार यांच्या विरोधात जाण्याचे बिचाऱ्यांना धाडस झाले नाही बिचाऱ्यांची हाडी कायमची चुकली असे लोक बोलू लागले. बहुमताच्या पाठिंब्याच्या भ्रमात राहिलेल्या वसंतराव नाईकांना ( त्यांचे एक वाक्य खटकताच) मुख्यमंत्रीपदावरून चुटकी सरशी उडवण्यासाठी १९७५ च्या फेब्रुवारीत याच यशवंतराव मोहिते वगैरे दोनतीन मंडळींचा उपयोग इंदाराजींनी केला तेव्हा यशवंतराव मोहिते वगैरे मंडळींना ग्यानबाची मेख ध्यानात आली असावी. 

ढासळलेले मनोरथ 

श्री यशवंतराव मोहिते महत्वकांक्षी होते. दांडगे महत्वाकांक्षी म्हणा हवेतर पण त्यात त्यांचे काय चुकले? सारेच राजकारणी सत्तेसाठी एखाद्या खुर्चीसाठी हापापलेले असतात. अगदी जीव टाकतात. यशवंतराव मोहिते तर कोणत्याही उच्चपदासाठी सर्व दृष्टींनी लायक होते रेठरे बुद्रुक येथे साखर कारखाना उभारण्यासाठी बिचाऱ्यांनी लाखो रुपये भाग भांडवल जमा करुन ठेवलेले पण ते कॉंग्रेसच्या विरोधात असल्याने कारखाना उभा राहिना.

खर्चासाठी भांडवल कमी कमी होण्याची पाळी आली लोक चिडऊ लागले. रेठऱ्याच्या मोहिते घराण्याचे वडील माधवराव मोहिते (एंगोनवाले) यांची पुण्याई १९५२ व १९५७ मध्ये विधानसभा जिंकण्यासाठी उपयोगी पडली. पण कारखाना उभा राहीना. शेवटी यशवंतराव चव्हाणांच्या कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याबरोबर चुटकी सरशी उभा राहिला व वेगाने पळू लागला. 

पण यशवंतराव चव्हाण दिल्लीला गेल्यावर त्याजागी वर्षभर मारोतराव कन्नमवार व ते वारल्याबरोबर विदर्भाचेच वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले ते ११ वर्ष ४ महिने राहिले त्यांना घालवल्यावरही यशवंतरावाच्या एवजी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री बनले नंतर वसंतराव दादा आले हे हलेनातच. 

शेवटचे प्रयत्न 

श्री यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई व राजारामबापू हे पश्चिम महाराष्ट्रातील तीन नेते मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज होते पण १९७७ च्या लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसचे पानिपत झाले तेव्हा “कॉंग्रेसचे घर पेटले ते विझवण्यासाठी” वसंतरावदादा आपल्या त्रिदडी संन्यास गुंडाळून मुख्यमंत्री पदाकडे धावले. पण कॉंग्रेसपक्ष नेतेपदाच्या निवडणूकीत राजारामबापूंच्या प्रोत्साहनाने यशवंतराव मोहिते दादांना विरोध करायला धावले.

त्यातही यश आले नाहीच. पण राजारामबापूंनी मात्र मतदानाचे पारडे दादाच्या बाजूला जड होत आहे ते दिसताच एकाएकी खालच्या पाचव्या मजल्यावर येऊन कॉंग्रेसचा त्याग केल्याची घोषणा केली. 

बॅ बाबासाहेब भोसले यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यावर त्याजागी लोकसभा सोडून वसंतराव दादा परत येणार ही बातमी कळताच त्यावेळीही दादाशी दोन हात करण्याची तयारी यशवंतरावांनी जाहीर केली. पण प्रत्यक्षात धाडस झाले नाही.. 

सर्वच बाजूंनी पिछेहाट १९८० 

१९८० च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्र भूमी नि:क्षत्रीय करण्यासाठी मुसलमान मुख्यमंत्री लादून इतिहास घडवायचाच या इर्षेने मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य स्पर्धक वसंतदादा, यशवंतराव मोहिते, उदयसिंहराव गायकवाड आदि रथीमहारथींना बाईनी दिल्लीत येऊन लोकसभेत ठाणबंद करुन ठेवले अखेर दादांना पुन्हा मुख्यमंत्रीपदावर आणणे भागच पडले पण यशवंतराव मागे पडले ते पडलेच १९८५ च्या लोकसभा निवडणूकीचे तिकीट तरी मिळावे अशी त्यांनी माफक अपेक्षा व्यक्त केली पण ते ही जमले नाही.

अगदी सभेचे सुद्धा तिकीट त्यांना देण्यात आले नाही कारण खुद्द दक्षिण कराड मतदारसंघा सुद्धा त्यांच्या बालेकिल्यातही त्यांना बहुमत राहिले नाही. याची खात्री सर्वांनाच पटली होती. 

काही चुकीची पावले 

यशवंतराव मोहिते हुषार, अभ्यासू कर्तबगार आहेत. तसेच धुर्त मुत्सद्दीही असावेत पण कसे काय कोण जाणे त्यांच्याच चुकीच्या धोरणाने त्यांना दगा दिला. असावा असे वाटते. १९८० मध्ये स्वत: कराड बाहेरच्या मतदानाच्या आधारे लोकसभेवर गेल्यावर विधानसभेचे तिकीट आपले बंधु जयंतराव भोसले (अप्पा) यांना मिळावे यासाठी मतदारांचा मेळावा वगैरे प्रयत्न केले पण प्रेमला काकीच्या आग्रहाने कराडची दोन्ही तिकीटे नवख्या कार्यकर्त्यांना मिळाली.

यशवंतराव यांनी सहकार्य करण्याचे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातच जाहीरपणे नाकारले ते दूरच्या मतदार संघात कॉंग्रेस प्रचाराला निघून गेले. अर्थात दोन्ही उमेदवार पराभूत झाले १९८५ च्या विधानसभा निवडणूकीतही तसेच घडले. यशवंतराव कोल्हापूर जिल्ह्यात प्रचाराला गेले. बुडत्याचा पाय खोलात म्हणतात ते यालाच. 

एक उपेक्षित कर्तबगार नेतृत्त्व 

राजकारणात होती सोने घेतले तरी त्याची माती होऊ शकते तर हाती माती घेतल्यास सुदैवाने सोनेही होते. यशवंतराव मोहिते, बाळासो देसाई , राजारामबापू यांची उदारणे आपल्या नजरे पुढे आहेत. आणखी किती तरी रत्ने प्रकाशात येण्यापुर्वीच अंतर्धान पावली असावीत. येवढें खरे की यशवंतराव हुषार विद्वान आहेत.

पन्हाळा येथील पक्षकार्यकर्त्यांच्या शिबिरातील समजावादावरील सलग तीन दिवसाच्या व्याख्यानाने एक मोठे पुस्तकच प्रसिद्ध झाले आहे. ते प्रभावी वक्ते व प्रचारक आहेत. सध्या ते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारक समितीचे प्रमुख म्हणून काम करतात. प्रचार करतात. विरोधकांची हजेरी घेतात. पण? पण? असा प्रसंग वैऱ्यावरही येवू नये. आमच्या भाऊंना उदंड आयुष्य लाभो.. 

रा.तु. पाटील ( तडसर)  

हे ही वाच भिडू : 

Leave A Reply

Your email address will not be published.