घर विकत घ्यावं की भाड्याने..? हे वाचा बरेच प्रश्न सुटतील..

प्रत्येकाचं स्वप्न असते आपलं लहान का असेना एक घर असावं. अनेकजण हे स्वप्न पूर्णकरण्यासाठी झटत असतात. यासाठी लाखो रुपये मोजायची तयारी सुद्धा असते. तसेच महागाईच्या काळात मिळणाऱ्या पगारात रोजचा खर्च भागवणे अवघड झाले आहे. 

यामुळे मेट्रो सिटीत राहणारे अनेकजण पैसे वाचविण्यासाठी घर भाड्याने घेत असतात. मात्र, आपले घर असावे अशी मनात सुप्त इच्छा असतेच. तर दुसरीकडे घर विकत घेण्याची आर्थिक कुवत असते ते सुद्धा घर विकत घ्यावं की भाड्याने या गोंधळात असतात. 

भारतीयांचा कल हा नेहमी घर विकत घेण्याचा असतो. आणि भाड्याचं घर म्हणजे तडजोड समजली जाते. भाड्याने घर घेतल्याचे आणि विकत घर घेतल्याचे फायदे तोटे काय असतात. ते पाहुयात  

स्वतःच घर असण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सुरक्षितता असते. भाडं हा खर्च टाळता येऊ शकत नाही. प्रत्येक महिन्याला वेळेत भराव लागतं. यातून कुठलीही मालमत्ता तयार होत नाही असे अनेकांचे म्हणणे आहे.  जर नवीन घर घेतले तर त्यासाठी ईएमआय भरावा लागतो. तो भरण्याचा दुहेरी फायदा आहे. पहिला म्हणजे स्वतःच्या घरात राहता येत. 

प्रत्येक महिन्याला जो ईएमआय भरण्यात येतो यातून घराचा मालकी हक्क वाढत असतो. 

भाड्याने राहिलेल्या घरात नेहमीच  एक भीती असते घर मालक कधीही ते खाली करायला सांगू शकतात. त्यामुळे बऱ्याच मनस्ताप सहन करावा लागतो. स्वतःच घर असेल तर एकदा इंटेरिअयल करून घेतलं की टेन्शन जात. जेव्हा कधी रिनोव्हेशन करायचं असेल तेव्हाच पसारा बाहेर काढावा लागतो. 

रियल इस्टेट मधली गुंतवणूक ही सगळ्यात सर्वात गुंतवणूक समजली जाते. गुंतवणुकीची किंमत जसे जसे वर्ष पुढे जात तशी वाढत राहते. तसेच याचे टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतात. 

भाड्याने घर घेतल्याचे फायदे 

आजचा विचार केला तर २ बीएचके घरासाठी १२ ते १५ हजार रुपये भाडं द्यावं लागत. एरिया नुसार हा दर बदलू शकतो. मात्र घराचा ईएमआय ३० हजारांपेक्षा जास्त असतो. भाड्याच्या घरासाठी एक्सट्रा टॅक्स द्यावा लागत नाही. पुण्यासारख्या शहरात घर घ्यायचे असेल तर ५० लाख तरी लागतात. 

त्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. हे कर्ज पुढचे ३० वर्ष ३५ ते ४० हजारांचा ईएमआय भरावा लागतो. जर हेच घर भाड्याने दिले तर महिन्याला १५ ते २० हजारच मिळतात. नोकरीच्या ठिकाणा जवळ, मुलानांच्या शाळेजवळ भाड्याने घर घेता येत. मात्र याच ठिकाणी घर विकत घ्यायचे असेल तर बजेट मध्ये बसण्याची शकत्या कमी असते. 

घर विकत घ्यायचे असेल तर त्यासाठी डाऊन पेमेंट आणि इतर खर्च करावा लागतो. 

५० लाखांचा घर घ्यायचे असेल तर त्या रकमेच्या ८० टक्क्यापर्यंत  होम लोन मिळत. डाऊन पेमेंटसाठी कमीत कमी २० टक्के भरावे लागतात. तसेच लोन प्रोसेसिंगसाठी किमान २० हजार द्यावे लागतात. डिपॉसिट ऑफ टायटल डिड साठी २० हजारांपर्यंत खर्च येतो. 

तसेच स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्टेशनसाठी ६ टक्के एवढ्या हिशोबाने ३ लाख रुपये द्यावे लागतात. तसेच पार्किंग, स्विमिंगपूल सारख्या अमेनिटीजसाठी अधिकचे ३ लाख रुपये भरावे लागू शकतात. इंटेरियर सारख्या गोष्टींवर ३ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. 

या सगळ्या खर्चाची बेरीज केली तर जवळपास घर घ्यायला ६० लाख रुपये खर्च येऊ शकतो.  

२० वर्षांनंतर  प्रति वर्ष ८ टक्के एवढी जरी ग्रोथ धरली तर त्याची किंमत २ कोटी ३३ लाख ४ हजार ७८६ होते. यातून टोटल मेंटेनंस कॉस्ट ती वजा केली तर ती १० लाखांच्या आसपास असेल. आणि इतर खर्च आणि वेगेवेगळे चार्जेस ११ लाख ६५ हजार वजा होऊ शकतात. 

हा सगळा विचार करून २० वर्षानंतर घराची किंमत २ कोटी ११ लाख ३९ हजार ५४६ रुपये होईल. याचा अर्थ असा आहे की, ५० लाखांच्या घराची किंमत २ कोटी होण्यासाठी २० वर्ष हप्ते भरावे लागणार आहे. त्याचबरोबर सुरुवातील खिशातील पैसे आणि कर्ज मिळून ५९ लाख ४० हजार गुंतवावे लागणार आहे. 

या सगळ्या गोष्टींचा जमा खर्च पाहिला तर लक्षात येत की, भाड्याचे घर कधीही परवडतं. घरासाठी आज  १२ हजार ५०० रुपये भाडं देत असाल आणि प्रति वर्ष ८ टक्के वाढ धरली तरीही २० वर्षी प्रतिमहिना ५३ हजर रुपये भाडं द्यावे लागेल. 

जर याच किंमतीची सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना. भाडं आणि हप्ता यात जी काही रक्कम शिल्लक राहते त्याची एसआयपी केली तर २० वर्षात साडे तीन कोटींचा पोर्ट फोलिओ तयार होऊ शकतो. 

यात दोन्ही मत प्रवाह पाहायला मिळतात. काही जण घर विकत घेतलं पाहिजे म्हणणारे आहेत तर काही जण घर भाड्याने घ्यावे असा सल्ला देतात. भाड्याने घर घेऊन रहा आणि उरलेल्या पैशाची गुंतवणूक एसआयपी, मुच्युल फंड मध्ये इनव्हेसमेंट करा असे सांगतात. 

भाड्याने घर घेण्याचा निर्णय जरी सांगितला जात असला तरीही ज्या किमतीचा आधार घेण्यात आला आहे तो मेट्रो शहराचा आहे. सर्व शहारत हीच परिस्थिती असेल सांगता येतं नाही. स्वतःला राहण्यासाठी घर घ्यायचे असेल तर बिनधास्त घ्यावे. 

अजून एक घर, इनव्हेसमेंट म्हणून दुसरं घेत असाल तर जरा विचार करून निर्णय घ्यावा. इन्कम आणि इतर गोष्टी तपासून निर्णय घ्यायला हवा. आर्थिक स्थिती चांगली असले तर घर नक्की विकत घ्यायला हवं. कोरोना नंतर रियल इस्टेट मार्केट काही प्रमाणात डाऊन आहे. त्यामुळे ज्यांना घर विकत घ्यायचे आहे त्याच्यासाठी चांगली संधी आहे.   

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.