शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊन वरुण गांधी योगी आदित्यनाथांना आपली ताकद दाखवतोय.

हरियाणात शेतकऱ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीनंतर, कालच उत्तर प्रदेशात मुझफ्फनगरमधील महापंचायतीत शेतकरी संघटनांनी भाजपविरोधातील आक्रमक आंदोलनाचे रणिशग फुंकल. उत्तरप्रदेशात येत्या सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक होत असून योगी सरकारविरोधात मिशन उत्तर प्रदेश सुरू केले जाणार असून २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे. या महापंचायतीला १० लाख शेतकऱ्यांची गर्दी झाली होती.

या महापंचायतीमुळे शेतकरी संघटनेचे सगळं सोर्टेड आहे. पण भाजपच्या अंतर्गत राजकारणात एक नवा ट्विस्ट आलाय. 

त्याच झालंय असं की, ही महापंचायत सुरु असताना भाजपा नेता वरुण गांधी यांनी एक ट्विट केलंय.

आता हे ट्वीट इंग्लिश मध्ये आहे, आम्ही ते मराठीत करतो,

आज लाखो शेतकरी मुझफ्फरनगरमध्ये निषेध करण्यासाठी जमले आहेत. ते आपलेच आहेत. आपण त्यांच्याशी आदरपूर्वक पुन्हा वाटाघाटी केल्या पाहिजे आणि त्यांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत, त्यांची मते जाणून घेतली पाहिजेत. आणि कोणत्याही निष्कर्षाप्रती पोहोचण्याआधी त्यांच्या बरोबर काम केले पाहिजे.

त्यांनी केलेलं हे ट्विट आगामी उत्तरप्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप महत्वाचं मानलं जातंय. कारण त्यांच्या मातोश्री मनेका गांधींनी ही त्यांचं शेतकऱ्यांना पाठिंबा देणार ट्विट रिट्विट केलं आहे. तस पाहायला गेलं तर योगी आदित्यनाथ आणि वरुण गांधींचा वाद जरी उघड उघड नसला तरी, गांधीं स्वतःला मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानत होते आणि आज ही मानतात.

उत्तरप्रदेश मध्ये भाजपच सरकार येण्याआधीपासूनच त्यांच्या मनात मुख्यमंत्री पदाची इच्छा वाढू लागली होती. याची काही उदाहरण..

२०१४ मध्ये वरुण गांधींच्या आई मनेका गांधी यांनी मनेका यांनी उत्तरप्रदेशच्या तकीया या गावात सभा घेतली होती. त्यावेळी त्या म्हंटल्या की,

राज्यात भाजपा सरकार असते तर बरे झाले असते. कारण तेव्हाच आपण आपले काम व्यवस्थितपणे करू शकलो असतो. जर वरुणने ते सरकार चालवले असते तर आपली चांदीच चांदी झाली असती. त्या जस का हे म्हंटल्या तस तिथं ‘हमारा सीएम कैसा हो, वरुण गांधी जैसा हो। अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. 

त्यानंतर यथावकाश उत्तरप्रदेशच्या निवडणूका झाल्या, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले न वरूण गांधी नाराज झाले. त्यावेळी सुद्धा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री न होता आल्यानं वरुण गांधी म्हंटले होते, मी पण ‘बाबा’ झालो असतो तर बरं झालं असत. ते म्हंटले होते की,

जीवन हे गंगाजीसारखे आहे, तुम्ही जितके जास्त त्यात खोल जाल तितके तुम्ही शुद्ध व्हाल. जीवनाला घर किंवा दुकान असे म्हटले जात नाही. हृदयाच्या आत जे काही घडते त्याला जीवन म्हणतात. जितके तुम्ही लोकांच्या हृदयात प्रवेश कराल तितके तुम्हाला असे वाटेल की हो भाऊ, आपणही या जगात काहीतरी कमावले आहे. मला वाटते की मी बाबा असायला हवे होते. 

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील तीन दिवसांच्या दौऱ्यावर असताना वरुण गांधींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हे टोमणे मारले आहेत.

अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे योगी आणि वरुण यांच्यातला छुपा वाद उघड झालाय. पण आज सगळ्या जगाला दिसेल असं ट्विट करून डायरेक्ट शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दाखवणं, म्हणजे भाजपश्रेष्ठींच्या डोळ्यात येणं. आणि असं डोळ्यात येणं म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकडे डोळे वर करून बघणं असं झालंय.

Leave A Reply

Your email address will not be published.