नट्यांच्या ऑकवर्ड फोटोला ‘कॅमल टो’ का म्हणतात

सहज एक दिवस फेसबुक स्क्रोल करता करता एका हिरॉईनचा फोटो दिसला. नाव काही मी सांगणार नाही पण तिचा नवरा नवाब आहे. त्यामुळं आता तीच नाव काय होत ते तुम्ही समजून जावा.

तर खूप जुना फोटो होता तो. नवंनवंच लग्न झालेले ते जोडपं होत. कुठंतरी हनिमुनला गेले असतील. मीडियावाले पोहोचले तिथे. पुढं त्याची बातमी झाली की काय, काय माहीत मात्र तो फोटो व्हायरल झाला होता. त्या व्हायरल फोटोत तिच्या पॅन्ट वर पिवळ्या रंगाचा हे मोठा गोल केला होता. त्याखाली कॅप्शन लिहिलं होत…

कॅमल टो

आयला म्हणलं, हे आणि काय नवं. म्हणून गुगल सर्च केलं तर अय्यो राम पापं. विचारू नका असले असले फोटो आले म्हणून सांगता. त्यानंतर बरेच इंटरेस्टिंग किस्सेवाले आर्टिकल्स आले. मग म्हंटल आयला या कॅमल टो ची मराठी माहिती कुठंच नाही की.

जर मराठीत काय बी घावलं नाय तर सोबतीला बोल भिडू हाय. ते देत्यात ओ माहिती..

त्यामुळं आधी समजून सांगायला पाहिजे कॅमल टो म्हणजे नेमकं काय ते ?

कॅमला टो म्हणजे उंटाचे खूर. आता उंटाचे खुर ज्या पद्धतीने विभागलेले असतात तशी महिलांसाठीची चड्डी, घट्ट, तोकडे कपडे घालताना योनी मार्गाचा आकार कपड्यांवरून नैसर्गिक पद्धतीने दुभागलेला दिसतो. तो आकार दिसतो त्याला नाव पडलय कॅमल टो. तो इतरवेळी लपवला जातो. पण आता साध्या कपड्यांमध्येही तो अाकार कॅमल टो पॅन्टीज वापरून बिनधास्त दाखवा, असं जाहीरपणे सांगितलं जातं. तस एक कॅम्पेनच २०१८ मध्ये सुरू झालं होतं.

आता या आकाराला कॅमल टो असंच का नाव पडलं ?

तर आम्ही हे शोधायचा बराच प्रयत्न केला. तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी उत्तर सापडली. जसं की १२ व्या शतकात या स्त्रियांच्या योनी भागाला कॅमल टो असं नाव मिळालं असावं. एक माणूस वाळवंटात फिरत होता. तेव्हा त्याला उंटाची खुर स्त्रियांच्या योनीच्या उंच भागासारखी दिसली मग तिथून हे नाव पडलं कॅमल टो.

आता अजून काही आर्टिकल्स सांगतात त्याप्रमाणे,

ही कॅमल टो कन्सेप्ट 90′ s मध्ये उदयाला आली. आणि जगभरात या कन्सेप्टने धुमाकूळ घातला २००१ या सालात. त्याच झालं असं होतं की, Late Night with Conan O’Brien या अमेरिकन टॉक शो मध्ये एक बाई उड्या मारत होती. तिने स्पंडेक्स सारखी पॅन्ट घातली होती त्यात त्या बाईच्या योनीचा आकार त्या शो मधल्या होस्टला उंटाच्या खुरासारखा दिसला. आणि तो म्हंटला,

ते बघा कॅमल टो…. झालं कन्सेप्ट वर्ल्ड वाईड झाली.

२००२ मध्ये तर हा शब्द ye अर्बन डिक्शनरी मध्ये सुद्धा ऍड झाला. त्या डिक्शनरी मध्ये जो अर्थ दिलाय कॅमल टो चा तो जसाच्या तसा देत आहोत,

crotch cleavage, esp. on a woman. The outer lips of female genitalia visible through tight clothing.

आता हे तुम्ही वाक्यात कसं वापरणार म्हणून डिक्शनरी मध्ये एक वाक्य सुद्धा दिलंय,

Did you see that girl in spandex? She had serious camel-toe going on.

त्याच २००२ या सालात एक हिप हॉप ग्रुप आला होता. त्या ग्रुपच नाव होतं FannyPack. यात ज्या तीन पोरी होत्या त्यांनी त्यांच्या एका गाण्याच्या लिरिक्स मध्ये हे कॅमल टो नाव वापरलं आणि त्या शब्दाला तुफान फेमस करून टाकलं.

त्यानंतर २०१० मध्ये जग Kim Kardashian च्या प्रेमात दिवान होऊ लागलं. त्या इराला Kardashian Kameltoe Era म्हंटल जाऊ लागलं. त्यानंतर किम जेव्हा २०१२ च्या Jay Leno च्या नाईट शो मध्ये गेली तेव्हा ती या कॅमल टो मुमेंट वर खुलून बोलली. त्या दिवसापासून अमेरिकाच काय तर या शब्दाचा विस्तार झपाट्यानं जगभरात झाला.

आजच्या घडीला हे कॅमल टो इतकं प्रचारात आलं म्हणता, की आता तो आपल्याच बोली भाषेतला शब्द आहे की काय असं वाटू लागलं.

आता आपल्यातली पोर ठोर पण शिकायला लागली, इंग्लिश बोलायला लागली. मग एखादी ऑकवर्ड मुमेंट आली की कॅमल टो कसा सोपा साधा शब्द वाटतो. त्यामुळं असं अचानक कोणी स्टॅच्यु दिल्यासारखं कॅमल टो म्हणलं की आपण लगिच वळकून जायाच.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.