आश्चर्य वाटेल पण भारतातली तिसरी सर्वात मोठ्ठी चॉकलेट कंपनी शेतकऱ्यांनी उभी केली आहे 

जसं मराठी माणसाला बिझनेस कळत नाही हे महाराष्ट्रातलं पेटंट वाक्य ठरलेलं आहे तसच शेतकऱ्यांना बिझनेस कळत नाही हे भारतातलं पेटंट वाक्य असेल. म्हणजे काहीही झालं तरी शेतकऱ्यांना कमी दाखवायचं, त्यांना मार्केट कळत नाही, व्यवहार कळत नाही ते अडाणी असतात असा एक समज उभा करायचा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाचं गणित त्यांच्याच माथ्यावर मारायचं अशीही एक थेअरी आहे.

तुम्हाला वाटत असेल अशा गोष्टींनी कुठे जास्त फरक पडतो तर भावांनो पडतो वो. काय होतं अस सातत्याने बिंबवल्यामुळे शेतकरी रिस्क घ्यायलाच घाबरतो, कचरतो. मग यावर उपाय काय तर शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स येईल अशी उदाहरणं आपण मांडायला हवीत. ती समोर आली तर जास्तीत जास्त लोकांपर्यन्त ती पोहचवायला हवीत.

असच एक उदाहरण म्हणजे कर्नाटकातल्या सुपारी उत्पादक शेतकऱ्यांच…

चॉकलेटमध्ये डेअरी मिल्क, पर्क, किटकॅट आयस्क्रिममध्ये बास्किन रॉबिन्स, अमूल, वाडीलाल बिस्किटींमध्ये डार्क फॅंटेसी, हाईड एण्ड सीक, बॉर्बन अशा वेगवेगळ्या गोष्टी तयार करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या पण यातला एक घटक मात्र कॉमन असतो आणि तो घटक तयार करणारी कंपनी असते ती म्हणजे सामग्री सेंट्रल एरेका नट मार्केटिंग ॲण्ड प्रोसेसिंग को-ऑपरेटिव्ह अर्थात Campco….

कॅटबरी आणि नेस्ले नंतर भारतातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी म्हणून याचा उल्लेख केला जातो. 

मंगलोर पासून ५२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोर्नडका येथे ही कंपनी असून १९७३ मध्ये सुपारी उत्पादक शेतकऱ्यांनी ती सुरू केली होती. कैम्पको या कंपनीची स्थापना मोठमोठ्या आंतराष्ट्रीय कंपन्यामार्फत शेतकऱ्यांचं शोषण रोखण्यासाठी करण्यात आली होती. आज ही कंपनी दरवर्षी १८०० कोटींचा व्यवसाय करती त्यामध्ये ३०० कोटी फक्त चॉकलेट्समधून उभा होतात.

याची सुरवात म्हणजे १९७० ते १९८० च्या केरल आणि कर्नाटक च्या किनारी भागात मोठ्या प्रमाणात सुपारीचे उत्पादन घेतले जात असे. मात्र या सुपारीला एक ठराविक किंमत नव्हती. आंतराष्ट्रीय बाजारातील किंमतीच्या अस्थैर्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याचदा तोटा सहन करावा लागत असेल.

या सर्व गोष्टींवर उपाय निघाला तो सुपारीसह कोकोचे आंतरपीक करण्याचा.

वाराणशी सुब्रया भट यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना किमान हमीभाव द्यावा ही संकल्पना आली. सुपारीला ठराविक किंमत मिळावी या उद्देशाने वेगवेगळे विचार समोर आले त्यातलाच एक विचार म्हणजे सुपारीसोबत आंतरपीक म्हणून कोकोचं उत्पादन घेणं.. 

१९७० च्या दरम्यान यासाठी अमूल आणि कॅडबरीने कोको विकत घेण्यासंबधित करार केले.

१९७९ साली कोको प्रतिकिलो १३ रुपयांनी गेला मात्र पुढच्याच वर्षी त्याची किंमत साडेपाच रुपये झाली. दूसरीकडे आंतराष्ट्रीय बाजारात देखील कोको विकला गेला नाही. थोडक्यात सुपारी प्रमाणेच कोको देखील आंतराष्ट्रीय बाजारावर गनला जावू लागल्याने शेतकऱ्यांना किमान हमीभाव देण्याची संकल्पना मोडकळीस निघू लागली. 

यावर उपाय म्हणून स्वत: कंपनी उभारण्याची आयड्या पुढे आली. त्यातून कंपनी उभा राहिली व या कंपनीमार्फत एक स्थिर दर देवून १९८० ते ८५ दरम्यान एकूण ३३७ टन कोको विकत घेण्यात आले.  Campco अस कंपनीचं नाव ठेवण्यात आलं व त्यामार्फत कोको बीन्स विकत घेण्यात येवू लागले. या कोको बीन्स पासून चॉकलेट्स निर्माण केले जावू लागले. 

सुरवातीला चॉकलेट्स निर्मातीबद्दल कोणतिही कल्पना नव्हती. एकमेव उद्देश शेतकऱ्यांना स्थिर भाव देण्यासाठी कंपनी उभारणे हा होता पण तो देण्यासाठी चॉकलेट्स निर्मीती देखील महत्वाची होती. १९८६ अखेर उत्तम दर्जाचे चॉकलेट्स निर्माण होती अशी कंपनी उभारण्यात आली. 

तत्कालीन परिस्थितीत दक्षिण भारतातील सर्वात मोठ्ठी चॉकलेट्स उत्पादन करणारी कंपनी म्हणून या कंपनीचा उल्लेख केला जावू लागला होता.

वेगवेगळ्या कंपन्याना चॉकलेट्सची पुर्तता करणारी कंपनी म्हणून Campco विकसित झाली. ब्रिटानिया, आटीसी, युनिबिक, पार्ले, कॅडबरी, हर्शीज अशा वेगवेगळ्या कंपन्या रॉ मटेरियल म्हणून Campco वर अवलंबून राहू लागल्या. त्याचसोबत कंपनीने आपला स्वत:चा ब्रॅण्ड देखील विकसित केला. 

आजची आकडेवारी सांगायची तर Campco आज वर्षाला सात हजार मेट्रिक टन चॉकलेट्सचे उत्पादन करते. कंपनीच्या ५७० हून अधिक सहकारी समित्या आहेत त्याचसोबत शेतकरी स्वत:चा धंदा स्वत: उभारू शकतो हे सिद्ध करणारा भलामोठ्ठा इतिहास देखील आहे. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.