कॅनडातल्या एका शाळेत २१५ मुलांचे सापळे सापडल्याने खळबळ उडाली होती.

शाळा या देशाचे नागरिक घडवत असतात. आदर्श गोष्टीचा वस्तुपाठ घालून देत असतात आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावत असतात. मुलं देवाघरची फुलं असं आपल्या महाराष्ट्रात म्हटलं जात पण महाराष्ट्राचं राहूद्या बाजूला कॅनडामधल्या एका शाळेत २१५ मुलांचे सापळे सापडल्याने सगळ्या जगाला धक्का बसला होता. नक्की काय प्रकरण होतं हे जाणून घेऊया.

कॅनडामधल्या कॅमलूप्स रेसिडेन्शिअल स्कुल या प्रतिष्ठित शाळेमध्ये २१५ लहान मुलांचे सांगाडे आढळून आले होते. या घटनेमुळे जगभरात प्रचंड निषेध व्यक्त केला गेला होता आणि कॅनडा सरकारला बरीच खरमरीत टीका सहन करावी लागली होती. पण या मुलांचे मृतदेह सापडण्याच कारण काय होतं. या कॅनडातल्या शाळेत लहान मुलांना भयंकर पद्धतीने टॉर्चर केलं जायचं. या सापळ्यांमध्ये ३ वर्षांच्या मुलांचादेखील समावेश होता. 

१९७० साली कॅमलूप्स रेसिडेन्शियल स्कुल हे एक प्रतिष्ठित विद्यालय म्हणून प्रसिद्ध होतं. पण काही काळानंतर परिस्थिती बदलली. या शाळेचं लोकांमध्ये इतकं नाव होतं कि या शाळेत मुलांचं ऍडमिशन व्हावं म्हणून लोकांची झुंबड उडायची. या शाळेत ख्रिश्चन धर्माचा प्रचार, प्रसार केला जायचा. जबरदस्तीने विद्यार्थ्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारायला भाग पाडलं जायचं. जी मुलं विरोध करत असे त्यांना विचित्र पद्धतीने टॉर्चर केलं जात असे.

कॅनडा पोलिसांच्या मते या शाळेत विद्यार्थ्यांना जबरदस्तीने भरती केलं जायचं आणि केवळ धार्मिक गोष्टी शिकवून त्यांच्यावर मोहिनी केली जायची. या शाळेमध्ये ऍडमिशन घेतल्यावर विद्यार्थ्यांसोबत भयंकर दुर्व्यव्हार केले जायचे. या शाळेत शिक्षक लोकांचं विशेष काही ध्यान विद्यार्थ्यांवर नसल्याने तब्बल ६००० मुलांच्या हत्या नोंदवण्यात आल्या होत्या. 

१९१५ ते १९६३ या काळात ५१ मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली होती. कॅमलूप्स इंडियन रेसिडेन्शिअल स्कुलचं संचालन हे १८९० ते १९६९ या काळापर्यंत झालं होतं. पुढे हे भीषण प्रकरण बघून कॅथलिक चर्च कडून अधिकार काढून घेत कॅनडा सरकारने ते स्वतःकडे घेतले. पुढे अशा घटना घडू नये म्हणून १९७८ साली कॅनडा सरकारने हि शाळाच बंद करून टाकली.

कॅनडा सरकारच्या सर्वेनुसार या शाळेमध्ये सुरवातीच्या काळात तब्बल दीड लाख विद्यार्थी शिकत असायचे. ख्रिश्चन बनवण्याच्या नादात विद्यार्थ्यांना टॉर्चर केलं जायचं. शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन त्यांचं खच्चीकरण केलं जायचं. बोर्डिंग स्कुल असल्याने बाहेर कम्प्लेंट सुद्धा जात नसायची. 

२००६ साली हा भीषण प्रकार पुढे आल्यावर कॅनडा सरकारने संसदेमध्ये या घटनेची जाहीर माफी मागितली होती. हि शाळा कॅनडामधली सगळ्यात मोठी शाळा होती, विद्यार्थीसंख्यासुध्दा जास्त होती. पालकांचं विशेष लक्ष नसल्याने आणि विद्यार्थ्यांना क्वचितच घरी सोडण्यात येणाऱ्या नियमांमुळे हा प्रकार उघडकीस आला नव्हता. एका पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाचा छडा लावला आणि पुढे हि सगळी धार्मिक विकृती समोर आली.

आता या सापडलेल्या विद्यार्थ्यांची ओळख सुद्धा पटत नसल्याने कॅनडा सरकार हतबल झालं होतं.

कॅनडामध्ये अशा अनेक शाळा आहेत जिथं आधुनिक शिक्षण देण्याच्या अमिषापोटी लहान मुलांना भयंकर त्रासाला सामोरं जावं लागतं. आईवडिलांपासून जबरदस्तीने मुलांना वेगळं केलं जायचं आणि असा किळसवाणा प्रकार केला जायचा.

चर्चच्या अधिपत्याखाली शाळा असल्याने सगळे नियम हे विद्यार्थ्यांना पाळणं बंधनकारक होतं. धार्मिक गोष्टींमध्ये चूक केल्यास त्या विद्यार्थ्यांची हयगय न करता त्याला टॉर्चर केलं जायचं आणि यातच त्या मुलाचा मृत्यू व्हायचा. चर्चच्या आवारातच हि मुलं दफन करण्यात यायची. इतकी वर्ष हा प्रकार कुणाच्याही लक्षात कसा आला नाही याबद्दल कॅनडा सरकारवर ताशेरे ओढण्यात आले होते. 

जगभरात धार्मिक गोष्टींचं वाढत प्रस्थ, द्वेष या गोष्टींचा सूड असो किंवा धार्मिक गोष्टी लहान मुलांकडून करवून घेऊन धर्म वाढ असो असा सगळा बीभत्स प्रकार या शाळेत सुरु होता. शेवटी हि शाळा कायमचीच बंद करण्यात आली. पण जगभरातुन २१५ मुलांसाठी सहानुभूती आणि कॅनडा सरकारच्या हलगर्जीपणामुळे इतके निष्पाप जीव गेले म्हणून प्रचंड टीका करण्यात आली होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.