देशात उमेदवार मतदारांना प्रलोभनं देतात मणिपुरात मात्र लोकंच कॅन्डीडेटला गिफ्ट्स देतेत
सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी आहे. आता उत्तरप्रदेश यामध्ये सगळ्यात मोठं आणि राजकीयदृष्ट्या महत्वाचं राज्य असल्याने उत्तराखंड, गोवा, मणिपूर या बारक्या राज्यांतील निवडणुका झाकळल्या जातात. मात्र या राज्यांतील निवडणुका उत्तरप्रदेशसारख्या राज्यांत होणाऱ्या गोंगाटापेक्षा खूप इंटरेस्टिंग असतात. मग ते गोव्यातले घरो घरी जाऊन शांततेत प्रचार करणं असू दे की उत्तराखंडातील एक एक मतदारपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांचे दरोरोजचं डोंगर चढणं असू दे. मणिपूरमध्ये पण कॅन्डीडेट असाच इंटरेस्टिंग प्रकारे प्रचार करतात.
तर प्रचाराची सुरवात उमेदवार मुहूर्त बघून करतो…
मग ज्योतिषानं चांगला मुहूर्त काढला का त्या दिवशी मग प्रचाराचा बिगुल वाजतो ध्वजारोहनाणं. हा समारंभ उमेदवाराच्या घराच्या अंगणात आयोजित केला जातो. या कार्यक्रमात उमेदवार पक्षाचा ध्वज फडकावतो. उमेदवारच ध्वज कोणता तर त्याला ज्या पक्षाचं तिकीट मिळालं आहे त्या पक्षाचा झेंडा त्यानंतर मग पुजार्याने पूजा प्रार्थना केल्यानंतर समाजातील थोरा-मोठयांचें आशीर्वाद घेतले जातात. आता या समारंभाचं आयोजन, तामझाम हे उमेदवारांच्या ऐपतीनुसार बदलत राहतं.
मेईतेई समाजाचं वर्चस्व असलेल्या इंफाळ खोऱ्यात, अथेनपोट थिन्बा नावाची प्रथा ध्वजारोहण समारंभाचा मुख्य भाग आहे.
एथेनपॉट म्हणजे सहसा अर्पणचा करणे, ज्यामध्ये अन्न आणि फुले यासारख्या वस्तूंचा समावेष असतो आणि थिनबा म्हणजे वस्तू सादर करणे. धार्मिक समारंभांमध्ये देवी-देवतांना संतुष्ट करण्यासाठी अथेनपॉट सादर केला जातो तर निवडणुकीत उमेदवाराला पाठिंबा दर्शविण्यासाठी त्याला अथेनपॉट दिला जातो. त्यामध्ये समाजातील महिला विविध फळे आणि भाज्या, तांदूळ, पारंपारिक फराळ आणि फुले घेऊन पक्षाच्या ध्वजस्तंभाच्या पायथ्याशी ठेवतात. निवडणुकीसाठी उमेदवाराला शुभेच्छा देण्यासाठी इतर भेटवस्तू देखील दिल्या जातात.
Beautiful tradition where locals bring offerings for their candidate as a support for their campaign- Athenpot Lanba #Manipur #FlagHosting pic.twitter.com/RMYVIkkPz4
— Payal Mehta/પાયલ મેહતા/ पायल मेहता/ পাযেল মেহতা (@payalmehta100) February 23, 2022
या समारंभानंतर मग उमेदवार लोकांशी संवाद साधायला सुरवात करतात.
काही उमेदवारांच्या ध्वजारोहण समारंभाला केंद्रीय नेते किंवा स्टार प्रचारकही हजेरी लावतात.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गेल्या आठवड्यात मणिपूरमध्ये होते, त्यांनी सिंगजामेईमधून निवडणूक लढवणारे भाजपचे वाय खेमचंद सिंग यांच्या ध्वजारोहण समारंभाला हजेरी लावली होती. हा समारंभात धर्मानुसारही थोडे बदल होंतात. वैष्णव आणि सनमहिझम पाळणाऱ्या मेईतींइ लोकं या समारंभात पूजा होऊ करतात. तर ख्रिश्चन समाजाचं प्राबल्य असलेल्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये, समारंभा ख्रिश्चन पाद्रीच्या उपस्थितीत होतो जो त्यावेळी प्रवचन देतो.
निरीक्षक सांगतात की की ध्वजारोहण समारंभ एखाद्या विशिष्ट मतदारसंघातून उमेदवार उभा असल्याची जाहीर घोषणा केल्यासारखाच आहे. त्याचबरोबर तो/ती किती मजबूत किंवा लोकप्रिय आहे हे देखील या समारंभातून कळून येतं. जर तुमच्या ध्वजारोहणाच्या वेळी बरेच लोक आले, तर याचा अर्थ तुम्ही खूप लोकप्रिय आहात आणि जिंकण्याची चांगली संधी आहे.
म्हणजे आपल्या इनक्रेडिबल भारतात अशी इलेक्शनपण किती वैविध्यपुर्ण असतेत हेच दिसून येतं.
हे ही वाच भिडू :
- पुण्याचे गांधी दांपत्य मणिपूरच्या एका दुर्गम खेड्यात शेतकऱ्याच्या भल्यासाठी राबत आहेत.
- उत्तराखंडमध्ये संध्याकाळ झाली कि, कार्यकर्ते प्रचार सोडून पळून का जातात?
- जेव्हा नेस्ले कंपनीला पैसे देऊन स्टॉक जाळावा लागला होता….