पुन्हा सिद्धूपाजींनी कॅप्टनसोबत फाईट सुरु केलीय. त्यांचा भरवसा फक्त एकाच माणसावर आहे..

एकीकडे कोरोनाची लढाई सुरु असतांना पंजाबमध्ये सध्या वेगळाच सीन सुरु झालाय. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी सत्ताधारी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागला गेलाय. ज्यातला एक गट  मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याबाजूनं, तर दुसरा कॉंग्रेसचे आमदार आणि माजी क्रिकेटपटू नवजोतसिंग सिद्धू यांच्याबरोबर आहे. हे पंजाब कॉंग्रेसमध्ये बदल होण्याचे संकेत मानले जातायेत.

गेल्या कित्येक  वर्षापासून  राजकीय डावपेच खेळत असलेले मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे सध्याच्या घडीलाही पक्षाचे नेतृत्व करतायेत, त्यात येणाऱ्या निवडणुकांत ते पुन्हा पक्षाचे भविष्य असतील का? असा असे प्रश्न उपस्थित केले जातायेत. त्यामागच कारणही तसच आहे. कारण पंजाब कॉंग्रेसमधल्या ७८ आमदारांपैकी एक मोठा गट कॅप्टनविरोधात आवाज उठवताते. 

दरम्यान या सगळ्याची सुरुवात केलीये ती नवज्योतसिंग सिद्धूंनी. नवज्योतसिंग सिद्धूंनी कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर आरोप केलेत कि, ते साधे आमदारांना भेटत सुद्धा नाहीत, त्यामुळ जनतेची कितीतरी काम खोळंबळीत. सिद्धू यांच्यासह बाकीची नेतेमंडळी सुद्धा  कॅप्टनविरोधात निषेध व्यक्त करतायेत. त्यात आता प्रदेश प्रभारी हरीश रावत यांनी या वादात उडी घेतलीये, त्यांनी  सिद्धू यांना पक्षाचे भविष्य म्हंटलय.

दिल्ली दरबारात जाऊन पोहोचलं भांडण 

पंजाबमधल्या या वादाची दखल आता कॉंग्रेस हाय कमांडला घेण भाग पडलंय. या  नेत्यांचे म्हणण ऐकण्यासाठी हाय कमांडने एक समिती गठित केली होती, म्हणजेच त्यांना  दुसर्‍या नेत्यांचा मार्ग रोखायचा नाहीये. मेन म्हणजे नवज्योत सिद्धू. अशा परिस्थितीत पंजाब कॉंग्रेसमध्ये हा पेटलेला वाद  खरोखरच बदलाचा प्रयत्न असल्याचं म्हंटल जातंय. 

झालं असं कि, २०१७ मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं होत की, ही त्यांची शेवटची निवडणूक असेल. पण नंतर कॅप्टननी आणखी एक डाव खेळायचं ठरवलं. त्यात हाय कमांडला चांगलच माहितेय कि,

पंजाबमध्ये कॅप्टन पक्षाचा चेहरा आहे आणि पुढच्या निवडणुकाही त्यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील.

तर दुसरीकडे नवज्योतसिंग सिद्धू जरी वाकड्यात घुसत असले  तरी हाय कमांड त्यांच्याकडे  दुर्लक्ष करू शकत नाही. हाय कमांडच्या दृष्टिकोनातून असं सिद्ध होतय कि, ते सिद्धूला  कॉंग्रेसचा भावी चेहरा म्हणून पाहतेय.

हे पाहता कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी समितीच्या बैठकीपूर्वी पंजाबमधील सुमारे एक डझन मंत्री आणि आमदारांना ज्या पद्धतीने फोन केले त्यावरून  स्पष्ट होते की, पक्ष आता पंजाबमधील दुसर्‍या नेत्यांनाही प्राधान्य देतेय. यातील बहुतेक आमदार आणि मंत्री हे कॅप्टन विरुद्ध होते. भाजप मध्ये काळ गाजवून आलेल्या माजी क्रिकेटर सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसवर आपली छाप पडली आहे.

दिल्लीकर अजूनही कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवायचे कि नाही या बद्दल द्विधा मनस्थितीत आहेत. एकच माणूस मात्र कंबर कसून सिद्धूच्या मागे उभा राहिलाय तो म्हणजे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत . त्यांच्याकडे काँग्रेसने पंजाबची जबाबदारीची जबाबदारी सोपवलीय. त्यांची सिद्धुंकडे झुकती बाजू एकप्रकारे हाय कमांडचाच संकेत  असल्याचं म्हंटल जातंय.

अशाप्रकारे सुरू झाला वाद

२०१९ मध्ये जेव्हा नवज्योतसिंग सिद्धू यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर हाय कमांड   सतत त्यांना पक्षात किंवा सरकारमध्ये जोडण्यासाठी प्रयत्न करतंय. कॅप्टन अमरिंदर सिंह हे सिद्धू यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यास तयार होते पण जुनंच मंत्रिपद. उपमुख्यमंत्री किंवा पक्षाचा प्रदेशाध्यक्ष नाही.

दुसरीकडे, हाय कमांडला सर्व बाजूने सिद्धू याचं पक्षातल पद वाढवायचं. कारण हाय कमांडला चांगलच माहितेय कि,  सिद्धू  केवळ जमावाला एकत्र आणू शकत नाहीत तर ते कॉंग्रेसचे भविष्यही बनू शकतात.

त्यात नवज्योतसिंग सिद्धू जेव्हापासून कॉंग्रेसमध्ये  आलेत, ते कुठल्या नं कुठल्या मार्गानं कॅप्टन अमरेंद्रसिंग विरोधात निशाणा साधतायेत. पण कॅप्टन असे आहेत जे कोणाचंच ऐकत  नाहीत. पण नवज्योतसिंग सिद्धूना गप्प बसवन अवघड आहे. त्यामुळे पंजाबमधल्या कॉंग्रेसची अवस्था “एका म्यानात दोन तलवारी” अशी होऊन बसलीये.

दरम्यान,  कॉंग्रेसनं गठीत केलेल्या तिन सदस्यीय बैठकीत आमदार, खासदारांसह सुमारे २५ नेत्यांची भेट घेऊन आपली तक्रार नोंदविली. यावेळी समितीन  नेत्यांना  वक्तव्यावरून चांगलच सुनावलं पण याचा नवज्योतसिंग सिद्धूवर काहीच परिणाम झाला नाही. 

समितीसमोर आपलं म्हणण मांडून बाहेर आल्यावर  सिद्धू  यांचा दीर्घकाळापासून  मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याविरोधात असलेला राग तसाच दिसला.  सिद्धूंनी पत्रकारांशी बोलताना म्हंटल कि, त्यांची भूमिका होती तीच राहील. एक  योद्धा तोच असतो जो मैदानात  लढतो. सत्याचा  पराभव होऊ शकत नाही.

दरम्यान आता नवज्योतसिंग सिद्धू  यांच्यानंतर मुख्यमंत्री समितीच्या सदस्यांची भेट घेतील. त्यानंतर समिती आपला अहवाल कॉंग्रेस अध्यक्षांना देईल. त्यामुळ कॉंग्रेसला दोघांना एकत्र आणण्याच्या फोर्म्युल्यावर काम कराव लागणारे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.