शहिद झालेल्या या अधिकाऱ्याची आठवण आजही काश्मिरचा नागरिक काढतो..!
भारताच्या भूमीत कित्येक शौर्यगाथा आहेत. शुरवीरांच्या गोष्टी ऐकत कित्येकांच बालपण गेलं. या कथा ऐकूणच अनेकांनी तसच शौर्य दाखवलं. पुढे त्यांच्याही कथा झाल्या. एकामागून एक हिरोंनी इतिहासाच्या पानांवर आपलं नाव कोरलं.
अशीच एक शोर्यगाथा कारगील युद्धात शहिद झालेल्या विजयंत थापर यांची. विजय थापर यांनी दाखवलेलं शौर्य तर मोठ्ठच होतं पण त्याहूनही अधिक प्रेम कस करावं..? कोणावर करावं…? हे दाखवून दिलं. त्याच्या या गोष्टीमुळे काश्मिरच्या खोऱ्यात आजही तिथले नागरिक कॅप्टन विजयंत थापरच्या कथा सांगत असतात.
कॅप्टन विजयंत थापर. त्यांना कॅप्टन हि पदवी शहिद झाल्यानंतर देण्यात आली. कॅप्टन विजयंत थापर यांचे पणजोबा कॅप्टन होते. आजोबा जेएस थापर आणि वडिल कर्नल विएन थापर देखील आर्मीमध्ये कर्नल होते. याच गौरवशाली वारशामुळे विजयंत पुढे काय करणार हा प्रश्न नव्हता. आपल्या घराण्याच्या वारशाप्रमाणे ते ठरल्यासारखे आर्मीमध्ये दाखल झाले. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांना कुपवाडा जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेलं होतं. एका आतंकवादी विरोधी युनिटचे ते सदस्य होते.
तो काळ होता जून १९९९ चा.
याच काळात पाकिस्तानच्या घुसखोरांची आपल्या भाग ताब्यात घेतल्याची माहिती भारतीय सैन्याला समजली. घुसखोरांना पळवून लावण्यासाठी त्यांच्या टिमला कारगील आणि द्रास भागाकडे नियुक्त करण्यात आले.
या नंतर नोल एंड पर्वतावर थ्री पिंपल वरुन पाकिस्तानच्या घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली. एका रात्रीत शुटिंग रेंन्ज मधून पर्वतावर जावून घुसखोरांकडून थ्री पिंपल ताब्यात घेण्याचं ऑपरेशन आखण्यात आलं. याच ऑपरेशन दरम्यान २२ वर्षाचे कॅप्टन विजयंत थापर शहिद झाले.
पण….
हि गोष्ट इथेच संपत नाही. त्यांच्या शौर्यगाथेमागे अजून एक वेगळी गोष्ट लपलेली होती.
कॅप्टन विजयंत थापर जम्मू काश्मीरमध्ये नियुक्त झाल्यानंतर ते स्थानिक लोकांसोबत संवाद साधत असत. कुपवाडा मध्ये पोस्टिंगला असताना त्यांना एक छोटी मुलगी भेटली होती. या मुलीच्या आईवडिलांची हत्या आतंकवाद्यांनी केली होती. तिच्या डोळ्यासमोर आईवडलांना गोळ्या घातलेल्या पाहून तिची वाचा कायमची गेली होती.
कॅप्टन विजयंत थापर हे जेव्हा त्या मुलीला भेटले तेव्हा ती मुलगी आणि कॅप्टन विजयंत यांची चांगली मैत्री झाली. विजयन आपल्या घरातून लहान मुलींचे कपडे मागवून घेवू लागले. तिच्या शिक्षणाचा इतर गोष्टींचा खर्च आपल्या पगारातून करु लागले. त्याच्या मैत्री हि स्थानिकांच्या कुतूहलाचा विषय होता आणि प्रेमाचाही.
रुखसाना आणि विजयंत यांच्या मैत्रीचे किस्से त्यांच्या बटालियन पासून ते विजयंत यांच्या घरापर्यन्त कौतुकाचा विषय होता. अशाच एका क्षणी त्यांना थ्री पिम्पल जिंकून घेण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं. आपलं पुढे काय होईल याचा अंदाज त्यांना आला असावा. करैंगा या मरेंगे म्हणणारे कॅप्टन थ्री पिम्पलवर जाताना घरातल्यांसाठी चिठ्ठी लिहून गेले होते. त्यात ते घरातल्यांना म्हणाले होते, माझ्यानंतर रुखसानाची काळजी घेणं.
कॅप्टन यांच्या एका वाक्यामुळे त्यांचे वडिल आजही रुखसानाच्या नातेवाईकांसोबत संपर्क ठेवून असतात. सध्या कॅप्टन विजयतं यांचे वडिल दरवर्षी तीला मनीऑर्डर करत असतात.
हे ही वाचा.
- टायगर हिलवरचं पाकिस्तानी बंकर उडवायला भारताच्या मदतीला इस्त्रायल धावून आला.
- १५ गोळ्या झेलूनही मातृभूमीसाठी लढत राहिलेल्या सैनिकाची अजरामर शौर्यगाथा !
- जीव वाचवणं शक्य असूनही नौसेनेची परंपरा जपण्यासाठी त्यांनी हसत-हसत जलसमाधी घेतली !
- खऱ्या आयुष्यातील मेजर कुलदिप सिंह चांदपुरी गेले..