घर सोडलंय, मुलाची डीएनए टेस्ट, मोलकरणीचेही आरोप… नवाझुद्दीनचं नेमकं मॅटर काय झालंय?

‘बाप का, दादा का, भाई का सबका बदला लेगा रे तेरा फैजल’ या डायलॉगमुळं हीट झालेला त्यानंतर सलमानसोबत किकमध्ये व्हिलनची अप्रतिम भुमिका साकारलेला आणि पार सेक्रेड गेम्समध्ये, ‘जाके देख रेकॉर्ड मे… कौन इंसान है की भगवान है?’ असं म्हणणाऱ्या नवाझ त्याचा त्याचा एक सेपरेट आणि डेडिकेटेड फॅनबेस आहे.

तो ना कधी सुपरस्टार, मेगास्टार यांच्या पंगतीत बसतो ना त्यांच्यासोबत त्याची तुलना केली जाते. त्याने चाहत्यांच्या आणि चित्रपट प्रेमींच्या मनात स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केलीये. हे सगळं असलं तरी, हा अभिनेता सध्या मात्र एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आलाय. ते कारण म्हणजे, त्याच्यावर असलेले आरोप.

आधी नवाझची दुसरी पत्नी आणि आता त्याच्या मोलकरणीनेही त्याच्यावर आरोप केलेत.
हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते बघुया.
प्रकरणाची सुरूवात होते नवाझुद्दीनच्या बंगल्यातून. आलिया म्हणजे नवाझुद्दीनची पत्नी त्या बंगल्यात आल्यानंतर काही कारणांवरून तिच्यात आणि नवाझच्या आईमध्ये वाद झाले. माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तांनुसार हा वाद प्रॉपर्टीशी संबंधित होता. हा वाद टोकाला गेले आणि नवाझच्या आईने वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीनुसार आलियाविरुद्ध पोलिसांनी आयपीसी सेक्शन ४५२, ३२३, ५०४,५०६ यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर आलियाला वर्सोवा पोलिसांकडून चौकशीसाठी बोलवण्यात आलं. त्यानंतर आलियाकडूनही काही आरोप करण्यात आले.
दरम्यान, आलिया आणि नवाझच्या आईमध्ये याआधीही खटके उडाले होते अशी चर्चा आहे. साधारण लॉकडाऊनच्या काळात हे खटके उडाले होते आणि त्याचाच परिणाम म्हणून आता पुन्हा वाद झाल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, या सगळ्या गृहक्लेशाच्या मध्येच एक बातमी आली की, नवाझुद्दीन या सगळ्या प्रकरणामुळे त्रासून घरातून निघून हॉटेलवर राहायला गेलाय.
या सगळ्या आरोपांनंतर आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर मग नवाझची पत्नी आलिया हिनेही काही गंभीर आरोप केलेत. आलियाच्या वकीलांनी नवाझ आणि त्याच्या आईवर आरोप केले होते. त्यांनी म्हटलं होतं,

“नवाझ आणि त्याच्या आईने आलियाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तिने घर न सोडल्यामुळे तिला अन्न दिलं नाही. इतकंच नाही तर, तिला अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्येही जाऊ दिलं नाही, तिच्या रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. शिवाय, तिच्या रूमबाहेर २४ तास बॉडीगार्ड्स उभे असतात.”

या आरोपांनंतर नवाझुद्दीनच्या वकिलांकडून आलियावर आरोप करण्यात आले.
हे प्रकरण इथवर पोहोचेपर्यंत यात नवाझुद्दीन किंवा त्याच्या वकिलांचा काहीही रोल नव्हता. त्याची आई आणि त्याची पत्नी यांच्यात हा संघर्ष सुरू होता. पण आलियाच्या वकिलांनी नवाझच्या आईसह त्याच्यावरही आरोप केल्यानंतर अभिनेत्याच्या वकिलांकडून आलियावर आरोप करण्यात आले.

नवाझच्या वकिलांनी आलियाच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले. माध्यमांमधल्या वृत्तांनुसार नवाझला असलेल्या थोरल्या लेकीची जबाबदारी नवाझला हवी आहे मात्र, धाकट्या मुलाची दबाबदारी घ्यायला त्याने नकार दिलाय.

काही दिवसांपुर्वी नवाझ हॉटेलमधून बंगल्यावर आला असतानाचा त्याचा एक व्हिडीओ आलियाने सोशल मीडियावर टाकलाय. ज्यामध्ये त्याच्या बोलण्यातून त्याला लहान मुलाला स्वीकारायला नकार दिल्याचं स्पष्ट जाणवतंय.
नवाझने स्वीकारायला नकार दिल्यानंतर आलियाच्या वकिलांकडून थेट उच्च न्यायालयात डीएनए टेस्टची मागणी केलीये.

शिवाय आलिया आता डिव्होर्स घेण्याच्या तयारीत असून दोन्ही मुलांची कस्टडी ती स्वत:कडे मागणार असल्याचं बोललं जातंय.

आता नवाझच्या मोलकरणीनेही त्याच्यावर आरोप केलेत.

आलियाच्या वकिलांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये एक मुलगी असं म्हणतेय की, नवाझुद्दीनने मागच्या दोन महिन्यांपासून तिला पगार दिलाय नाहीये… तिला दुबईतून परत भारतात आणण्यासाठी व्हिजा फी लागणार आहे असं सांगून तिचा पगार अडकवण्यात आलाय. शिवाय ती एकटीच दुबईत अडकलीये आणि तिच्याकडे खायला काहीही नाहीये आणि पैसेही नाहीयेत असं ती या व्हिडीओमध्ये म्हणतेय.

आलियाच्या वकिलांनी म्हटलंय,

“सरकारी रेकॉर्डनुसार सपनाची एका अज्ञात कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात ती नवाजुद्दीनच्या दुबईत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलांची काळजी घेण्याचं काम करत होती.”

आता नवाझुद्दीन वर करण्यात आलेले हे आरोप कितपत खरे आहेत, नवाझच्या वकिलांनी त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर घेतलेल्या संशयात कितपत तथ्य आहे हे तपासानंतर आणि न्यायालयाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल. पण या सगळ्यात ‘कभी कभी लगता है कि अपुनीच भगवान है’ म्हणणारा नवाझ घरच्यांसाठी दानव आहे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आलाय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.