ऑल टाइम फेव्हरेट लिस्ट मध्ये CAST AWAY नेहमीच प्रथम क्रमांकावर असेल

तुम्हाला कदाचित या गोष्टीची जाणिव नसेल पण लिहण्याची देखील मक्तेदारी आहे. तेच तेच लोक लिहीत राहतात आणि आपण वाचत राहतो. पण आपण कधी लिहायचं धाडस करत नाही.

लिहायचं धाडस करायला हवं म्हणून “बोलभिडू” मार्फत या पाच सिनेमांवर लिहण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली.

याचा उद्देश सिनेमांहून अधिक कधी न लिहणाऱ्या भिडू लोकांनी मनमोकळेपणाने लिहावं हाच होता. आपण लिहते झाला. या पाच पैकी एक सिनेमा हा इन टू द वाईल्ड. या सिनेमाबद्दल जे लेख आले ते सर्व लेख खाली दिलेले आहेत.

आत्ता एक काम करायचं, ज्यांचा लेख उत्तम आहे अस वाटतं त्यांना तुम्हीच मार्क द्यायचे. लोकप्रिय असणाऱ्या लेखांना दोन महिन्यांसाठी नेटफ्लिक्स देणार आहोत. एका सिनेमावरचा एक सर्वोत्तम लेख.

वाचा आणि तुम्हीच सांगा यापैकी सर्वात्तम लेख कोणता. ज्याच्या नावाने अधिक कमेंट असतील तो व आमच्या परिक्षकांच मत याचा विचार करुन नंबर काढूया.

विशेष सुचना.

लेख वाचताना घ्यायची काळजी इतकची की, बरेच जण नवीन लिहणारे आहे. तथाकथित समिक्षक लिहणाऱ्यांनी सिनेमाचे स्पॉयलर दिले वगैरे सारख्या गोष्टी करुन वाद घालू नयेत. शिवाय हे लेख ज्या क्रमाने आम्हाला आले त्याच क्रमाने देण्यात आले आहेत. 

 

१. प्रसनजीत रमेश कांबळे यांचा लेख 

२००६/७ सालातील गोष्ट. टोळीतल्या सर्वात हुन्नरी  कार्यकर्त्याने सी डी  दिली आणि म्हणाला लई भारी है बे बघच. आपल्याला अश्या गोष्टीत पहिलाच खुप इंटरेस्ट मग काय पाहिली ती फिल्म एकदा नाही तर अनेकवेळा. आजही कधी वाटलं तर आवर्जून पहातो ती फिल्म नव्हे तर गोष्टच जिच नाव

Cast Away : मराठीत सरळ सरळ अर्थ बहिष्कृत माणूस 

पण ही काही समाजाने नाही तर अपघाताने  बहिष्कृत झालेलया माणसाची कथा आहे जी दिग्दर्शक व अभिनेत्याच्या (रॉबर्ट झेमेकीस व टॉम हँक्स) कष्टाचे सुंदर फळ म्हणून प्रेक्षकांसमोर येते.

कथेचा नायक चक एका विमान अपघातात सुदैवाने बचावतो खरा पण अडकतो मात्र एका निर्मनुष्य बेटावर आणि सुरु होतो त्याचा जगण्यासाठीचा खडतर प्रवास. ढेरपोट्या सुखवस्तू चकचे  प्रत्येक लहान गोष्टींसाठी झगडणे सुरु होते. त्याच्याच विमानातील समुद्राच्या पाण्याबरोबर वहात आलेल्या वस्तू त्याला या कामात मदतीस येतात.चक जेव्हा पहिल्यांदा आग पेटविण्यात यशस्वी होतो तेव्हा त्याला झालेला आनंद मनुष्य प्राण्याला इतिहासात झालेल्या पहिल्या आनंदाचा अनुभव मिळावा इतका सुरेख आहे

मानवाच्या जगण्यासाठी अन्न व निवारा या मूलभूत गोष्टींसोबतच कोणाच्यातरी साथीची असलेली गरज व महत्त्व हा चित्रपट सहजतेने मांडतो कारण या कथेतील नायकाव्यतिरिक्त दुसरे महत्त्वाचे पात्र हे कोणी स्त्री /पुरुष किंवा एखादे जनावर नसून तो एक बॉल आहे ज्याला चक एका चेहऱ्याचे रूप देऊन आपल्या प्रत्येक भावना शेअर करतोय.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कथेचा उत्तरार्ध जिथे सात वर्षांचा गॅप येतो. इथे चक थोडासा विक्षिप्त व शरीराने बारीक दिसतोय जी अभिनेत्याची कमाल तर आहेच पण तो हि भूमिका अक्षरशः जगलाय हेच सिद्ध होतं.

प्लॉटिंग किंवा कॅरेक्टर डेव्हल्पमेंटसाठी फुकट वेळ न घालवता चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत राखलेला वेग व चक या सर्वातून सुटतो का हे पाहण्यापेक्षा अनुभवण्यास लावणारा हा चित्रपट प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी पहावा असाच आहे

 • Prasenjit Ramesh Kamble
 • Pune – 8625814173

Screenshot 2020 04 02 at 4.12.42 PM


२. सुशांत काळे यांचा लेख

कास्ट अवे’ हा नॉर्थ अमेरिकेतील चित्रपट आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘ रॉबर्ट झेमेकिस’ आणि याचे लेखन ‘विल्यम्स ब्रॉयलेस’ यांनी केले आहे. यात मुख्य टॉम हॅक या अभिनेत्याने ‘चंक नोलाल्ड’ हे पात्र साकारले आहे. तर प्रियसीची भूमिका ‘लॉरी व्हाईट’ हिने केली आहे.

यात अभिनयाची खमंग मेजवानी टॉम हॅक यांनी बनवली आहे.

काय आहे नक्की कास्ट अवे ?

ही गोष्ट आहे एका माणसाची जो काही वर्षे ‘फेडेक्स’ वस्तूंच्या डिलिव्हरी करण्याच्या कंपनीत कामाला असतो. कंपनीच्या कामानिमित्ताने विमानातून तो चाललेला असतो. अचानकपणे विमानाचा अपघात होतो आणि विमानातील इतर कर्मचारी मृत्युमुखी पडतात.

हा विमानाचा अपघात समुद्राच्या पाण्यात होतो. चंक नोलाल्ड आपला जीव वाचवण्यासाठी त्या बेटावर जातो. ती परिस्थिती दिग्दर्शकाने फारच विदारकता दर्शवली आहे. अन्न,वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत.

त्यापासून वंचित असलेला चंक त्या मूलभूत गरजांसाठी झटत आहे.

इतकेच नव्हे तर त्याचे त्या समुद्राच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न आणि पुन्हा अंगावरती येणाऱ्या भयंकर लाटा आणि त्यामधील ‘आय कॅन डू दीस’ संवाद यातून आलेला सकारात्मकपणा त्यांच्या अभिनयातून दिसतो.अंगावर काटा आणणारा प्रसंग होण्यास कसलीच कस सोडली नाही.

मूलभूत गरजांपासून एखादा व्यक्ती दूर असूनही जगण्याची इच्छा व संघर्ष प्रखरतेने मांडताना दिसतो. बेटावर कोणतेही माणूस नसल्याने व्हिल्सन कंपनीचा फुटबॉल पाण्यासोबत वाहत आलेल्या फेडेक्स कंपनीचा माल होता हे त्यावरील फिडेक्स कव्हर वरून कळते.

तेथे सजीव नसल्याने फुटबॉलला मित्र बनवतो. त्याच्याशी गप्पा गोष्टी करत असतो.

लाकडावर लाकूड घासून आग तयार करणे, अन्नासाठी नारळाचे झाड तेथे होते म्हणून नारळाचे पाणी पिणे त्यातील खोबर खाणे हा खाण्याचा मार्ग सापडला. शेवटी दात दुखू लागणे, पायाला खवले पडणे, अंगाला बोचरी थंडी माणसाचं जगणं नसून जनवरासारख असहाय्या जगणं चंकच झालं होत.

ह्या चित्रपटाची कथा हितेच न राहता पुढे सरकते.नायक समुद्रा बाहेर पडण्याच्या प्रयत्नात त्याला बरेच अपयश येते.पुढून येणाऱ्या लाटा अप्याशाच कारण किंवा अडथळा म्हणून आ वासून उभ्या राहतात. शेवटी तो पुन्हा बेटाजवळ येतो.

तो सतत बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो पण त्याला अपयश येत असते.

शेवटी  काही वर्षे लोटली जातात ती भाषा नायकाच्या चेहऱ्यावरील दाढी आणि वाढलेली केस यांवरून कळते. यात संवादाची जागा चित्रपटिय भाषेने घेतलेली दिसून येते. शेवटी तो त्या लाटेवर मात करून जातो आणि शहरात पोहचतो.
शेवटी त्याला त्याची प्रियसी म्हणजेच नायिका मिळते परंतु तिचा विवाह झालेला असतो थोडक्यात ही कथा आहे.

कास्ट अवे बद्दल केलेला अभ्यास :-

चित्रपट सुरू होताना आपल्याला फेडेक्स कंपनीची गाडी दिसते.
त्यानंतर कंपनीत काम करणारे कर्मचारी त्या पैकी चंक नोलाल्ड दिसतो.

यात निरीक्षण केल्यास एक गोष्ट अशी दिसते की एका कर्मचाऱ्याने घेतलेले पार्सल तो हातात घेऊन जातो मॅनेजर पर्यंत जाईपर्यंत कॅमेरा शॉट कुठेच कट होत नाही त्यास ‘वन टेक शॉट’ म्हणतात ही कॅमेरामनची कमाल दिसते.

कंपनीत काम करताना जे काही सांगत असतो तेथेच नायकाची ओळख होते. तसेच झेरॉक्स शॉपमध्ये नायक जातो आणि त्यावेळी नायिकेची ओळख होते तेथे कोणतही संवाद नसून त्यांनी एकमेकांना मारलेली मिठी व घेतलेले चुंबन हे प्रेमाचे प्रतीक न बोलताही बोलके दिग्दर्शकाने केले आहे.

संवाद कस चित्रपटाचं काम करतो किंवा पुढे नेण्यासाठी आधार मानला जातो त्याला याच चित्रपटात अर्थपूर्ण प्राप्त होते. कंपनीच्या कामानिमित्ताने जात असताना प्रियसी त्याला भेट म्हणून लॉकेट देते.त्यात तिचा फोटो असतो आणि तो घेऊन जातो.

जाताना ‘मी लवकर येईल’ हा संवाद चित्रपटाला पुढे घेऊन जातो.
विमानवरती फेडेक्स असे लिहलेले असते यावरून कळते की तो कामानिमित्त चालला आहे.

विमानात बसल्या नंतर अचानकपणे विमानाचा अपघाताकडे वळण जाताना भास होतो विमान पडते अपघात होतो त्यात त्याच्या प्रियसिने दिलेले लॉकेट तो घट्टपणे हातात पकडतो हित कोणताच संवाद न देता प्रेम म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या खूप  सहजतेणे दिग्दर्शक व पटकथाकार सांगतो.

अपघातानंतर सकाळी सर्व समुद्राच्या लय अगदी मंद स्थितीत असतात. तेथेच नायक जोपलेला असतो. रात्री झालेला अपघात आणि लाटांची दाहकता आणि सकलाई लाटांची मंद गती ही कॅमेऱ्यातून विरोधाभासी दिसून येते. तो उठतो आजूबाजूला पाहतो कोणीच नसते तो आणि बेट कोणता मनुष्य नाही काय नाही हे त्या कॅमेऱ्याने चित्रपटिय भाषेतून दर्शविले आहे.

त्याला तेथून जायचे असते म्हणून तो ओरडतो हेल्प हेल्प म्हणजेच लेखकाने देखील कुठे कोणत्या संवादाची आवश्यकता आहे ह्याचा अभ्यास करूनच मांडणी केलेली दिसते. कोणीच व्यक्ती तेथे नसते. किनारपट्टीवर वाळूवर तो हेल्प असे लीहतो पण ना तिथं कोणी सजीव जमात होती ना कोणीच होते.

लाट येते आणि हेल्प लिहलेले अक्षर नाहीस होत म्हणजेच हित कोणतीही मदत त्या परिस्थितीस मिळणं अशक्य होत,अशा पद्धतीचा बोलका सिन कोणतही संवादाच्या माध्यमातून न देता चित्राच्या माध्यमातून दर्शविला आहे.

तो तेथेच बसून राहतो. कोणतीही सजीव जमात नसल्याने कोणतेही मनोरंजनाचे साधन नसल्याने व्यक्ती कसा जगेल हे फार विचित्र आहे. विमानातून वाहून आलेलं पार्सल असत ते तो काढतो मुलींचे सायंडेल, व्हीलसन नावाचा फुटबॉल कंपनीचा बॉल या सर्व वस्तू त्या पार्सल मधून निघतात.

तो पोटासाठी काहीतरी शिजवायला लाकडावर लाकूड घासून आग तयार करताना त्याच्या हाताला लाकूड लागते आणि रक्त निघते अशा वेळी तो फुटबॉल घेऊन फेकत रक्ताळलेला हात त्या बॉल वर उमटलेला दिसतो.

त्याच बॉलवर नाक, कान, डोळे काढतो आणि त्यालाच व्हीलसोन असे हाक मारतो त्याच्याशी गप्पा मारतो ही देखील त्या परिस्थिती नुसार झालेली मानसिकता दिसून येते.

तेथून तो बऱ्याचदा जाण्याचा प्रयत्न करतो पण समुद्राच्या लाटा उसळत असतात त्या पुढे नायकाचा ठाव लागत नाही. शेवटी तो एका उंच टेकडीवर किंवा बुरुजसारख्या भागावर चढतो; परंतु सर्व बाजूने समुद्र दिसतो.अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह किनारी येतो तेव्हा नायक तेथे जातो त्याच्या खिशातील बॅटरी घेतो.

रात्री थंडी पडल्याने तो ती बॅटरी लावतो जोपतो हळू हळू अंधारात बॅटरीचा प्रकाश मंदावते आणि तेथूनच पहाट म्हणजेच सूर्याचे किरण त्याच ठिकाणाहून छिद्रातून प्रकाश येतो.अंधारातील बॅटरी मंदावणे व तेथूनच आलेला सूर्यप्रकाश अगदी विरोधाभासही दिग्दर्शकाने दर्शविला आहे.

तेथे कोणीच नसल्याने तो आपले लॉकेट काढून सतत आपल्या प्रियसीचा फोटो त्यात पाहत असतो.तेथे देखील कोणता संवाद नसून जे म्हणायचे आहे ते कळते.
अन्न म्हणून नारळातील पाणी, खोबर, रात्री खेकडे असे काही नाही पदार्थ खाऊ लागला ना शौचाची सुविधा न काही हे जनावरांपेक्षाही असहाय्य जगणं नायक जगताना दिसतो.

काही वर्षे लोटली जातात ही वर्षे नायकाच्या चेहऱ्यावरील दाढी वाढलेली केस आणि नायकाने एका दगडावरती लिहतो ‘चक नोलांड वॉज हेर 15000 डेज यावरून कळते तिथं ना कोणत्या संवादाची गरज ना क्षाची तिथं चीताची भाषा आपलं बोलता संवाद साधण्याचे काम बजावते. तेव्हाच व्हिल्सोन अगदी ओबड धोबड पहिल्या पेक्षा झालेला दिसतो.

पुन्हा तो तिथून निघण्याचा प्रयत्न करतो. त्याला समुद्राच्या पाण्यात लोखंडी पत्रा सापडतो तो त्याची नाव तयार करतो आणि आपल्या निर्जीव मित्राला म्हणजेच व्हिल्सण फुटबॉलला नावेशी घट्ट बांधून ठेवतो एखादा सजीव देखील दुसऱ्या साजिवाची काळजी घेऊ शकणार नाही एवढं जीव नायकाने व्हिलसन याने निर्जीव वस्तू फुटबॉल वर  माणसासारखा जीव लावला होता.

नायक बेटाला सोडून जाताना सर्विकडे पाहतो.त्यातून असे दिसून येते की त्याचं आणि त्या बेटाच देखील नात झाल होत. तो नाव चालू करतो हळू हळू पुढून लाटा येतात तो मागे हटत नाही.

तो आपल्या व्हीलसन फुटबॉलला म्हणतो पकडून ठेव सोडू नको यातूनच अजूनच आत्मीयता दिसून येते.असे दोनदा तीनदा होते परंतू त्या पुढे व्हीलसन लाटेत हरवून जातो तो रडू लगतोटो बिथरतो.

समुद्राच्या लाटा आ वासून येत असतात धडा धड; नावही पलटी होता होता वाचते,ती दाहकता दिग्दर्शकाने उत्तम प्रकारे मांडली आहे. हळू हळू समुद्राच्या लाटा संथ होतात आणि तो अगदी शांतपणे नावेवर झोपते इतक्यात शेजारून एक मोठे जहाज येते यावरून कळते की तो बेटावरून एका शहराच्या ठिकाणी आला आहे हे देखील चित्रातून कळते.

आता मात्र पटकथाकाराने उडी घेऊन नाईके जवळ आणले  नायिकेची लग्न झालेले असून तिला मुलगी असते तरी ती नोकवर प्रेम करते.
हा चित्रपट लीनियेर म्हणजे सरळ स्वरूपात आहे.

 • सुशांत धनाजी काळे

Screenshot 2020 04 02 at 4.12.51 PM


३. संदिप मुणगेकर यांचा लेख

वर्ष होते साधारण 2000 साल चे ते वायटूके नी काय. न्यू मिलेनियम नवीन शतक वगैरे काय काय भानगडी चालू होत्या. 

बॉलीवूड मध्ये कहो ना प्यार है मधून ह्रितिक ने दणक्यात एंट्री घेतली होती. बाबूभय्या, राजू श्याम जोडीचा हेराफेरी, शाहरुख आणि अमिताभ बच्चनचा मोहब्बते बॉक्स ऑफिस वर सुसाट सुटले होते. एकंदरीत बॉलीवूड चित्रपट सुसाट यशात होते.

त्यात दूरदेशी सातासमुद्रापार हॉलिवूड मध्ये त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात कास्ट अवे हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शीत झाला… 

हॉलिवूड चे सिनेमे अजून काही हल्लीसारखे फर्स्ट डे फर्स्ट शो बघायची त्याकाळी टूम नव्हती. भारतीय चॅनेल्स वर नुकतीच सासू बहू छाप सीरिअलची लाट आली असावी, घरातील टीव्हीवर एखादा इंग्लिश चित्रपट पाहणे त्यावेळी प्रत्येकाला शक्य नसायचे.

त्यात आमची इंग्लिश समजण्याची बोंब…

स्टार मूवीझ, HBO वर रात्रभर एखाद्या मित्राच्या घरी घरचे सर्वजण गावी गेल्यावर इंग्लिश चित्रपट पाहणे हाच कधी काळी केला जाणारा टाइमपास.
नक्की आठवत नाही पण वर्ष साधारण दहावीचे होते. मित्राच्या घरी रात्री अभ्यासाला जायची परवानगी मिळाली होती.

अशाच  एका रात्री मित्राच्या घरी कास्ट अवे साधारण रात्री 1 नंतर HBO वर  अर्धवट पाहिला. आणि नंतर जी उत्सुकता लागली. ती पूर्ण सिनेमाची राईट मारून मिळालेली कॉपी पाहून ती उत्सुकता थांबली…

अमेरिकन पार्सल डिलिव्हरी कंपनी फेडएक्स कार्गो विमानास खराब हवामान वादळ वाऱ्या मुळे प्यासीफिक समुद्र वर अपघात होतो. विमान भरकटून अपघात होऊन विमानाचे अवशेष बेटाच्या  किनाऱ्याला लागतात. या अपघातातुन कंपनीचा कर्मचारी आणि सिनेमाचा नायक चक नोलान (टॉम हँक्स )बचावतो. भर समुद्रात कसाबसा पोहत, raft चा आधार घेत बेटाच्या किनाऱ्याला पोहोचतो….

इथून खऱ्या फिल्म ला सुरुवात होते… 

अफाट समुद्रात,,पूर्णपणे सूनसान बेटावर परतिची आशा उराशी बाळगून जिगरी नायक चक  ने उभा केला आहे. विमानातील अवशेष गोळा करून त्यातून ज्याला हल्ली आपण जुगाड बोलतो. अगदी तसाच जुगाड करून बनवलेली त्याने बोट… त्यात त्याला आलेले अपयश. त्या अपयशाने खचून न जाता पुन्हा संघर्ष करून चक चा पुन्हा समुद्रपार करून किनाऱ्याला लागणारा प्रवास टॉम च्या उत्तुंग अभिनयाची साक्ष देतो…

या सिनेमाचा अजून एक सहनायक आहे… 

विलसन वोलीबॉल 

चक ला विमानाच्या अवशेषतुन एका पार्सल मध्ये विलसन बॉल सापडतो त्याचा एखाद्या मित्रासारखा बोलण्यासाठी केलेला वापर पाहून प्रत्येकला हा बॉल एखादी जिवंत वस्तू आहे याचे अनुभव येत राहतो. त्या निर्जन बेटावर एकाकीपणा घालवण्यासाठी चक आणि विलसन वोलीबॉल मधील संवाद आपल्याला मनुष्य किती समाजप्रिय प्राणी आहे याची क्षणोक्षणी जाणीव करून देतो.

सिनेमाचा शेवट ही लाजवाब आहे….

एका मोठ्या लाटेत शेवटी चक भर समुद्रात बाजूने जाणाऱ्या एका मोठया जहाजवरील लोकांचे लक्ष वेधून घेण्यास यशस्वी होतो. विमानात बसून शेवटी अमेरिकेत जातो. त्याची एकेकाळची प्रेयसीला भेटतो.  जिने त्याला मृत समजून लग्न केले असते. तिच्याकडून कार घेऊन तो अमेरिकेतील दूर एका शहरात एका घरात एक पार्सल ठेवतो.

त्या पार्सल सोबत त्याने कृतज्ञता व्यक्त केलेली असते. इतके होऊन सिनेमा संपतो.

कास्ट अवे प्रचंड धीरगंभीर आहे. खूप एकाकी आहे. अडचणीत सापडलेल्या प्रत्येकजण या सिनेमाशी पाहताना एकरूप होतो. प्रत्येकजण चक मध्ये स्वतःला पाहतो. त्या बेटावरून प्रत्येकजण स्वतःला चक समजून समुद्र पार करून मुख्य जगात येऊ पाहतोय.

हेच या सिनेमाचे खरे यश आहे चकची भूमिका टॉम हँक्स या लोकप्रिय अभिनेत्याने ने केली आहे. कमालीचा शांत, संयत, गोंधळलेला चक टॉम ने आपल्या अभिनयातुन जबरदस्त साकार केला आहे.

धीरगंभीर प्रसंग, भीतीदायक शांतता, समुद्राच्या लाटेची गाज, आणि जीवघेणा एकलकोंडेपणा ह्या गोष्टी  ज्यांना आवडतात त्यांच्या ऑल टाइम फेव्हरेट लिस्ट मध्ये कास्ट अवे नेहमीच प्रथम क्रमांकावर असेल.

 • संदिप मुणगेकर

Screenshot 2020 04 02 at 4.12.58 PM


४. ऋषिकेश तेलंग यांचा लेख 

केवळ सर्व्हायवल स्टोरी नाही तर एक शौर्यगाथा असणारा ‘कास्ट अवे’ !

आपल्या सर्वांचं आयुष्य कितीही सुरळीत, अडचणी नसणारं असलं तरीही त्यात एक टप्पा असा येतो जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत अडकतो.मग ते काही वेळा मानसिक असतं तर काही वेळा शारिरीक तर कधी कधी दोन्ही वेळा.

परंतु त्यातून कितीजण सुटतात हेही महत्त्वाचं आहे.’कास्ट अवे’ हा 2000 मध्ये आलेला रॉबर्ट झेमेकिस दिग्दर्शित चित्रपटही हीच बाब दर्शवतो.

1995 मध्ये चक नोलँड ( टॉम हँक्स ) हा एक सिस्टम ॲनालिस्ट आहे. केली फ्रिअर्स (हेलन हंट) सोबत तो रिलेशनशिपमध्ये आहे परंतु त्याच्या व्यस्त दिनशैलीमुळे त्यांनी अजून लग्न केलेलं नाही.

मलेशियात एक पॅकेट डिलीव्हरी करायला जाताना अचानक आलेल्या वादळामुळे चकचे विमान पॅसिफिक सागरात पडते आणि तिथूनच खऱ्या चित्रपटाला सुरुवात होते. चकचा त्या निर्मनुष्य बेटावर तब्बल चार वर्षापर्यंत जिवंत राहण्याचा आणि तिथून हिंमतीवर आणि ईच्छाशक्तीवर सुटण्याचा प्रवास !

फक्त कथेच्या जोरावरच नाही तर उत्कृष्ट दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी,पटकथा, अभिनय या सर्वच गोष्टींच्या तांत्रिक बाबींमुळे हा सिनेमा अव्वल ठरतो.

बेटावरील विस्तीर्ण समुद्रकिनारा, लांबच लांबपर्यंत एकही माणूस न दिसणारं नो मेन्स लँड हे सर्व कॅमेऱ्यातून प्रभावीपणे दर्शवलं गेलंय. टॉम हँक्स या अभिनेत्याच्या उत्कृष्ट अभिनयाचं उदाहरण देण्यासाठी त्याचे फॉरेस्ट गम्प, सेविंग प्रायव्हेट रायन, बिग हे चित्रपट पुरेसे आहेत.

आपल्या प्रत्येक चित्रपटात वास्तववादी अभिनयातून तो प्रेक्षकांवर छाप पाडतो. झेमेकिसच्या चित्रपटांमध्ये तांत्रिक कुशलता आणि सोबतच पात्रांच्या मनोवस्थेतला त्याने दाखवलेला द्वंद्व दोन्ही कौतुकास्पद असतं मग ते 1989 मध्ये आलेला ‘बँक टू द फ्युचर 2’ चित्रपट असो किंवा ‘द पोलार एक्सप्रेस चित्रपट’ असो !

याही चित्रपटात चकचा वक्तशीरपणा आणि त्याची शिस्त व त्याला लाभलेली बुद्धिमत्तेची जोड हे सर्व उत्कृष्टपणे दर्शवलंय.

झोंबीपटात तसेच ॲपोकॅलिप्स चित्रपटातही सर्व्हायवल कथानक असतं मग यात काय वेगळं आहे, यात आणखी काय एलिमेंट्स आहेत असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. त्याचं उत्तर आहे जवळपास संपूर्ण चित्रपट नायकाभोवती फिरतो.

तो बेटावर अडकल्यावर त्याचा उदरनिर्वाह तो कसा करतो हाही भाग त्याचाच झाला.परंतु टॉम हँक्सच्या सहजसुंदर अभिनयामुळे चित्रपट कुठेही कंटाळवाणा ठरत नाही.

प्रेक्षक गुंतून राहतो ते फक्त चकच्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडल्यामुळे ! चकचं पात्र विल्यम ब्रॉयल्स ज्युनियर यांनी छान लिहिलंय.

अगदी एका बास्केटबॉलला माणसाप्रमाणे बोलणारा चक त्याच्या एकटेपणाला घालवण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या करताना दिसतो. एकावेळी तर तो इतका निराश होतो की बास्केटबॉलचा बनवलेला बाहुला जो त्याचा मित्र व साथीदार बनलेला असतो त्याला तावातावाने समुद्रात फेकून देतो परंतु नंतर लगेच त्याला त्याची चूकही उमगते.

तो चार वर्षानंतर या ठिकाणाहून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न यशस्वी ठरतोही. तेव्हा केलीला तो भेटतो. क्लायमॅक्सचा हा सीन दाद देण्यासारखा आहे.

यात तिच्यासोबत त्याचा जो संवाद होतो तो बघताना टॉम हँक्स नावाचं रसायन नेमकं काय आहे याची जाणीव प्रेक्षकाला होते. तो तिला भेटतो पहिल्यांदा बघतो तेव्हा तिचं लग्न झालंय असं त्याला समजतं.

नंतर त्याच्या एका सहकारी मित्राला बोलताना तो म्हणतो, ती इतके दिवस माझ्यासोबत तर होती आठवणींच्या स्वरूपात. जरी ती आता सोबत नसली तिचं लग्न झालं तरी काय झालं. परंतु मी जगेन कारण आयुष्यात उद्या काय होईल हे आपल्यापैकी कुणालाही माहिती नसतं त्यामुळे आलेला दिवस जगायला तयार असलं पाहिजे.

यावेळी नायकाने दुसऱ्या वेळेसही आपलं दुःख गिळून त्यावर मात केली आहे असं जाणवतं. खूपच प्रेरणादायी या नायकाचा प्रवास आणि अडचणींना तोंड देणारं धैर्य वाटतं.

कास्ट अवेची गती जास्त संथ व जास्त जलदही नाही. सर्व्हायवल फिल्म म्हणून इतर चित्रपटांसारखी चित्रपटाची लांबी वाढवण्याकडे दिग्दर्शकाचा कल नाहीये. 90 मिलियन इतक्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 429 डॉलरचा व्यवसाय केला.

73 व्या ॲकॅडमी अवॉर्ड्समध्ये पण टॉम हँक्सचं उत्कृष्ट प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेसाठी नॉमिनेशन झालं तर 58 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारावर त्याने आपलं नाव कोरलं. बऱ्याच वर्षानंतर आलेल्या एबीसी शो ‘लॉस्ट’ च्या निर्मितीतही कास्ट अवेच्या कथेचं योगदान आहे. या चित्रपटाला पाहताना ‘रॉबिन्सन क्रुसो’ या डॅनियल डेफोच्या कादंबरीचीही आठवण येते.

चकच्या पात्रात चार वर्षानंतर जो बदल होतो तो टॉम हँक्सने उत्तमपणे दर्शवलाय त्यासाठी त्याने आपले वजनही बरेच कमी केले.टॉम हँक्सबद्दल बोलताना विशेषकरून हे सांगावंस वाटेल की तो रॉबर्ट डी निरोसारखा अभिनेता आहे जो एखाद्या पात्राच्या मानसिकतेला समजून घेतो, त्यात प्रवेश करतो असं म्हटलं तरी चालेल.

ऐंशीच्या दशकात त्याने ‘स्प्लॅश’ व ‘बिग’ या चित्रपटात भूमिका केल्या असल्या तरी नव्वदीच्या दशकात त्याची कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली.स्टीव्हन स्पीलबर्गच्या ‘सेविंग प्रायव्हेट रायन’ मध्ये कॅप्टन जॉन मिलरची भूमिका खूपच ताकदीने त्याने निभावली.

त्याच्याबद्दल बोलताना एक खेदाची बाब ही जाणवते की बरेच जण त्याची तुलना आमिर खानसोबत करतात.आमिर खानसुद्धा उत्कृष्ट अभिनेता असला तरीही दोघांच्या अभिनयात बराच फरक जाणवतो.

त्यामुळे दोघांच्या कामात तुलना करणं योग्य नाही.’पेन ॲण्ड ग्लोरी’ या स्पॅनिश चित्रपटात एक डायलॉग आहे , ‘The better Actor is not one that cries but the one that fights the tears ‘टॉम हँक्सच्या बाबतीतही माझं तेच मत आहे.जेव्हा रडण्याचा प्रसंग येतो तेव्हा तो त्या प्रसंगात पूर्ण जीव ओततो. त्यामुळे प्रेक्षक अधिकच जुळला जातो.

विक्रमादित्य मोटवाणी दिग्दर्शित 2016 मध्ये आलेला ‘ट्रॅप्ड’ हा पण याच प्रकारचा चित्रपट आहे. यातला नायक शौर्यपण एका बंद रूममध्ये अडकतो. परंतु त्यादरम्यान तो जगायला शिकतो. ‘कास्ट अवे’ पण याच प्रकारातला चित्रपट आहे. जवळपास ‘कास्ट अवे’ नंतर अशा सर्व्हायवल कथानक असणाऱ्या चित्रपटांची परंपराच सुरू झाली.

तुलनेने बॉलिवूडमध्ये असे चित्रपट कमीच निघाले कारण येथील बहुतांश प्रेक्षक हे व्यावसायिक चित्रपट पाहणारे असल्याने त्यांना असे चित्रपट रूचत नाहीत. परंतु ‘कास्ट अवे’ सारखे चित्रपट आजही मोठ्या संख्येने सर्व जगातील रसिक प्रेक्षक बघतात ही खूप चांगली बाब आहे !

 • ऋषिकेश तेलंगे

Screenshot 2020 04 02 at 4.13.04 PM


५. शेखर पासेकर यांचा लेख 

 

2000 साली प्रदर्शित झालेला Cast Away म्हणजे टॉम हँक्स करता खास लिहिला गेलेला चित्रपट म्हणावा लागेल आणि टॉम ने पण तो विश्वास सार्थ करून दाखवला.

म्हटले तर Cast Away चक आणि केली ची प्रेमकथा पण आहे तसेच सर्व रस्ते बंद झाल्यावर संकटातून मार्ग काढणाऱ्या चक च्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा एकट्याचा प्रवास आहे .मिनीटा मिनिटांच्या हिशेबात काम करणारा चक घाईघाइत कार मध्येच ख्रिसमस साजरा करतो केली च्या हातून केलीचा फोटो असणारे लॉकेट उराशी घेऊन विमानात चढतो.

अपघाताच्या वेळी केली ने दिलेले लॉकेट आपल्या हातात सापडायला हवे या करता चक ने केलेली मरमर आपल्याला मूर्खपणा वाटतो.पण हेच लॉकेट कथेचा मुळगाभा आहे .निर्जन बेटावर अडकल्यावर साधे नारळाच्या शहाळ्यातून पाणी काढताना चकचा घाम निघतो.

रोजच्या खाण्याची धडपड मग त्याकरता अग्नी पेटवण्याची क्लुप्ती आणि मग समोरच्या अथांग सागराला आणि निळ्या आभाळाला मी अग्नी पेटवून दाखवला म्हणून आनंदाने ओरडून सांगणारा शेकोटी भोवती नाचणारा चक पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

अगदी लाकडावर काठी घासताना बघून चक पेक्षा आपल्यालाच आग केव्हा पेटेल याची काळजी लागली असते. चित्रपटातील “विल्सन “म्हणजे फक्त एक व्हॉलीबॉल नाहीये तर चक चा जिगरी दोस्त आहे त्याचा मार्गदर्शक आहे ,शेवटी समुद्रात गटांगळ्या खाणाऱ्या व्विल्सन ला वाचवायची धडपड आपलिही घालमेल वाढवते.

लाकडी दांड्यानच्या ताराफ्यावर पडलेला चक सापडतोच पण आता निर्जन बेटावरचा एकटेपणा सुटून वास्तविक आयुष्यातले एकटे पण सुरू झालेले असते, चार पाच वर्षांपासून नवरा बेपत्ता म्हणून केली ने संसार थाटला असतो.चक भर पावसात तिला भेटायला जातो.

तिने पण त्याच्या आठवणी जपून ठेवल्या असतात त्याच्या कार ची किल्ली त्याच्या हातात देऊन दोघे निरोप घेतात ,गाडी वळणावर थाम्बली असतांना केली वाऱ्याच्या वेगाने चक च्या मिठीत सामावते .चक तिला शांतपणे कार मध्ये बसवतो आणि तुझी गरज तुझ्या घराला जास्त आहे म्हणून तिला घरी सोडुन येतो जातांना तिने दिलेले लॉकेट तीला देऊन हे तुझ्या कुटुंबकरता कामात आण सांगायला विसरत नाही.

कम्पनीतला दोस्त चक ला विचारतो तू इतके वर्ष एकटा कसा काय जगला रे तेव्हा चक खूप छान उत्तर देतो .चक सांगतो मी कुठे एकटा होतो माझ्याबरोबर आशा होती आणि केली च्या अठवणी होत्या .

 • शेखर पासेकर 

Screenshot 2020 04 02 at 4.13.10 PM


६. हेमंत कुलकर्णी यांचा लेख

मी ‘Cast Away’ फिल्म पाहिली आहे व माझ्या संग्रही आहे. FedEx ह्या कुरीयर कंपनी चा कर्मचारी त्याची जबाबदारी निभावत असतांना त्याच्या वर आलेलं संकट तेही एका निर्जन बेटावर काढावा लागलेला काळ.
खुप काही सांगुन जातो. शेवटच्या क्षणापर्यंत धीर न सोडता अस्तित्व टिकवून ठेवायला शिकवतो..!!

शोधत आलेलं विमान बघुन त्याला झालेला आनंद तसेच त्यांच्या शहरात आल्यानंतर प्रेयसी ची भेट हे क्षण अविस्मरणीय आहेत..!! कथा, पार्श्वसंगीत आणि Tom Hanks ने केलेला अभिनय हे सर्व डोळ्यात पाणी आणतं.

अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मनाचा खंबीरपणा, प्रयत्न आणि जिद्द याची सुरेख सांगड महत्वाची असते. Cast Away ला बरेच महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.

आयुष्यात एकदा हा चित्रपट नक्कीच पहावा.!!

 • Hemant Kulkarni

७. प्रकाश डांगी यांचा लेख 

 

In 1995, Chuck Noland (Tom Hanks) is a time-obsessed systems analyst, who travels worldwide resolving productivity problems at FedEx depots.

He is in a long-term relationship with Kelly Frears (Helen Hunt), with whom he lives in Memphis, Tennessee. Although the couple wants to get married, Chuck’s busy schedule interferes with their relationship.

A Christmas with relatives is interrupted by Chuck being summoned to resolve a problem in Malaysia. Flying through a violent storm, his airplane crashes into the Pacific Ocean. Chuck is able to escape the sinking plane and is saved by an inflatable life-raft, but in the process loses the raft’s emergency locator transmitter.

He clings to the life-raft, loses consciousness, and floats all night before being washed up on an island.

After he awakens, he explores the island and soon discovers that it is uninhabited. Several FedEx packages from the crashed plane wash up on the shore, as well as the corpse of one of the pilots, whom he buries.

He initially tries to signal for rescue and makes an escape attempt with the remnants of his life-raft, but he cannot pass the powerful surf. He searches for food, water, shelter, and opens the packages, finding a number of potentially useful items. He leaves one package, with a pair of wings painted on it, unopened.

During a first attempt to make fire, Chuck receives a deep wound to his hand. In anger he throws several objects, including a Wilson Sporting Goods volleyball from one of the packages. A short time later he draws a face in the bloody hand print on the ball, names it Wilson and begins talking to it.

In the course of the next four years, Chuck manages to eke out a meager existence on the island, and also has regular conversations and arguments with Wilson.

After a large section from a portable toilet washes up on the island, Chuck uses it as a sail in the construction of a raft. After spending some time building and stocking the raft and deciding when the weather conditions will be optimal (using an analemma he has created in his cave to monitor the time of year), he launches, using the sail to overcome the powerful surf.

After some time on the ocean, a storm nearly tears his raft apart. The following day, Wilson falls from the raft and is lost, leaving Chuck overwhelmed by loneliness. Later, he is found drifting by a passing cargo ship.

Upon returning to civilization, Chuck learns that he has long been given up for dead; his family and friends held a funeral, and Kelly has since married Chuck’s dentist and has a daughter. After reuniting with Kelly, the pair profess their love for each other but, realizing a future together would be impossible due to her commitment to her family, they part. Kelly gives Chuck the keys to the car they once shared.

Chuck then travels out into the country to return the unopened FedEx package to its sender. The house at the address is empty, so he leaves the package at the door with a note saying that the package saved his life. He then departs and stops at a remote crossroads.

A woman passing by in a pickup truck stops to explain where each road leads. As she drives away, Chuck notices the illustration on her truck is similar to the one on the parcel. He looks down each road, then

back to the road the woman took, and smiles.

Yours follower,

Prakash dangi

Pune

Screenshot 2020 04 02 at 4.13.21 PM


 

८. संदिप महाजन यांचा लेख 

नमस्कार, रोज नवनव्या विषयांवर लेख देणारे बोल भिडू आज त्याच्या वाचकांना रोजच्या खुर्चीतून उठवून लेखकाच्या खुर्चीत बसवतो आहे तर ही संधी हातची घालवायची कशी?

तसे ट्विटरवर ट्विटसचे थ्रेड लिहले आहे, शाळेत असताना निबंध चांगले लिहायचो आज ह्या संधीचा फायदा उचलण्याचा माझा हा प्रयत्न

जग एकविसाव्या शतकात पाऊल टाकत होते आणि त्याच्या उंबरठ्यावर टॉम हँक्सचा Cast Away लोकांची गर्दी चित्रपटगृहात खेचत होता तर आपला हा हिरो सर्वसामान्य घडाळ्याच्या काट्यावर जगणारा आपल्या कामात आणि विश्वात रमलेला त्याला एक सुंदर मैत्रीण असते, Kelly तीच नाव.

बऱ्याच वर्षांपासून त्यांची प्रेम कहाणी चालू असते पण आपला हिरो Chuck कामाच्या व्यापात स्वतःचे लग्न देखील पुढे ढकलत असतो. आपला हिरो जगभरात हिंडून FedEx जी वस्तूंची डिलिव्हरी योग्य ठिकाणी,योग्य वेळी देण्यात अग्रेसर असते कामात अजून चांगलेपण आणण्याचे काम आपला हिरो प्रामाणिकपणे करत असतो, काही कारणास्तव मलेशियाच्या डिलिव्हरी देण्याच्या विमानात याला जावं लागतं आणि याचे नशीबच खराब म्हणून ते विमान वादळाच्या तडाख्यात अडकत आणि क्रॅश होते.

सुदैवाने हिरो त्यात वाचतो बुडणाऱ्या विमानातून बाहेर पडून जीव वाचवणाऱ्या होडीत बसून रात्रभर पाण्यात प्रवास करून एका किनाऱ्यावर लागतो,जीव वाचतो पण वाईट गोष्टींची श्रुखलेचा पहिला वार त्याच्यावर होतो त्या बोटीवर लोकेशन ट्रॅकर नसते त्यामुळे मूळ विमानाचा अपघात आणि आपल्या हिरोचे स्थान यात बरच अंतर असत ज्यामुळे बचाव दल त्याच्या पर्यंत पोहचू शकणार नसते.

कशीबशी रात्र काढून जेव्हा हिरो सकाळी उठतो तो आजूबाजूचा परिसर पिंजून काढतो त्यात त्याला विमान क्रॅश नंतर त्यातील काही डिलिव्हरी पॅकेट्स किनाऱ्यावर तरंगताना दिसतात जी हा गोळा करून व्यवस्थित किनाऱ्यापासून लांब आणून ठेवतो आणि जिवंत राहण्याचा त्याचा संघर्ष चालू होतो.

समुद्र लांघून जाण्याचा प्रयत्न, अडचणीत असलेला संदेश किनाऱ्यावर तयार करणे, अनेक असे प्रयत्न करत असताना मिळालेले पॅकेट्स फोडून त्यातून त्याला गरजेच्या वस्तू मिळवतो, आग पेटवतो आणि एकंदरीत हा संघर्ष पडद्यावर पहाताना अंगावर काटा आणतो पण ही फक्त सुरुवात असते हे आपल्या हिरोला माहीतच नसते.

या संघर्षात त्याला सोबती भेटतो तो एक चेंडू अनावधानाने हाताला झालेल्या जखमेमुळे झालेल्या रक्त  आणि हाताचा पंजा त्या चेंडूवर तयार झालेले असते. एकटेपणा आणि चिडलेला आपला हिरो त्याला विल्सन नाव देऊन आपले सुख दुःख भावना त्या चेंडूसमोर बोलत असतो असेच चार वर्षे तो एकटाच त्या निर्जन बेटावर अडकलेला असतो.

चेहरा रुक्ष,निस्तेज झालेला, वाढलेली दाढी, थकलेला आपला हिरो आपल्याला कोणी वाचवायला येईल किंवा प्रयत्नांती तो बेटावरून निसटून परत त्याच्या लोकांत जाईल अश्या अपेक्षेने जीवन जगत असतो.

चार वर्षांत आपला हिरोने हवामानाचा अंदाज बांधून एक छोटी राफ्ट बनवून बेटावरून निस्टण्याचा प्लॅन बनवलेला असतो आणि एका रात्री तो विल्सन ला घेऊन आपली परतीची वाट धरतो पण त्याचे नशीब अजूनही त्याच्यावर रुसलेले असते लाटांच्या तडाख्यात त्याची कामचलाऊ राफ्ट तुटते त्यात त्याचा जिवाभावाचा जोडीदार विल्सन हरवतो आणि आपला हिरो जेथून प्रवास चालू करतो परत तिथेच येऊन पडतो.

आलेले अपयश, हरवलेला जोडीदार विल्सन याने त्याची उमेद तुटलेली असते त्यातच त्याला समुद्रात मालाची ने आण करणारे जहाज दिसते बऱ्याच प्रयत्नानंतर जहाजावरील लोकांना आपला हिरो दिसतो आणि तो परत आपल्या शहरात परततो.चार वर्षात बऱ्याच घटना घडून गेलेल्या असतात ज्यात विशेष म्हणजे त्याची मैत्रीण Kelly लग्न करून सेटल झालेली असते ती त्याला त्याच्या दोघनची कारची चावी देते आणि आपला हिरोचा प्रवास चालू होतो ज्यात त्याला किनाऱ्यावर सापडलेल्या पॅकेट्सच्या लोकांच्या घरी जाऊन डिलिव्हरी करत असतो ह्या त्याच वस्तू असतात ज्यांनी त्याचा जीव त्या निर्जन बेटावर वाचवलेला असतो.

एकंदरीत एकदा तरी पहावा असा हा चित्रपट ज्यात मानवी भाव भावना, सामाजिक गरजा आणि जीवन किती अमूल्य आहे याची जाण पदोपदी देत राहते.
आज आपले विमान क्रॅश झाले नसले तरी कोरोना नामक व्हायरस आपल्याला याच सगळ्या गोष्टींचा जवळून अनुभव देतोय. रोजचे घड्याळी जीवन, सामजिक आणि वैयक्तिक निकष दूर गेल्याने घरात बसणे बऱ्याच लोकांना जमत नसले तरी आपल्या हिरोचा संघर्ष पाहायला आज हरकत नाही.
मनोरंजन तर होईलच शिवाय आपल्याला आजच्या कठीण काळात जगण्याचा नवीन मार्ग देखील सापडू शकतो. सामजिक भान राखता घरात राहून आपण स्वतःचा, कुटुंबाचा आणि शेवटी इतरांचा जीव वाचू शकतोय त्यामुळे शक्यतो गरजेशिवाय घराबाहेर पाऊल काढताना दहादा विचार करा. Cast Away चे Cast In ही काळाची आणि आजची गरज आहे
 •  संदिप महाजन

9. तेजस जामनिक लिहतात,

CAST AWAY जे दाखवलं ते रिअल मध्ये घडलेलं आहे, ४ वर्ष एक मनुष्य एका बेटावर एकटा राहतो , त्यात तू तो हार मनात नाही आत्महत्या करायचा विचार करतो पण तस करत नाही त्या वरून मला तरी एवढं शिकता आलं की आयुष्यात अडथळे येत राहतील पन आत्महत्या या मार्गाने कधी जायचं नाही जे अडथळे येतील त्या वर जो पर्यंत आपण जिंकत नाही लढाई सोडायची नाही.
हो आणि शेवट पर्यंत त्याच्या कडे असलेलं एक पार्सल तो open करत नाही त्या वरून आपण आपल्या कामाशी प्रामाणिक असलं पाहिजे.

 

10. संदेश राजे यांचा लेख 

 

‘कास्ट अवे’ हि जगण्याची कथा आहे. हि फिल्म इच्छा असेल तर माणूस पाषाणातून पण पाणी काढू शकतो आणि या पृथ्वीवर विचार करून बदल घडवायची क्षमता कोणामध्ये आहे तर ती माणूस या प्राण्यामध्ये आहे हे स्पष्ट करते. 

1995 साली आलेली ही फिल्म पण आजच्या तंत्रज्ञानात पुढे गेलेल्या जगात ती तिथकिच तग धरू शकते. फिल्मची सुरवात एका निर्जन रस्त्यावरून होते आणि शेवट पण त्याच रस्त्यावर होतो. म्हणजे निसर्गाचा नियम दिग्दर्शकाने दोन फ्रेम मध्ये सांगितला आहे, कि या जगामध्ये एकटे आलात जाणार पण तुम्ही एकटेच आहात.

पण आत्ताचा कोरोना हा नियमच बदलू पाहत आहे म्हणून आपल्याला घरामध्ये बसा असे सांगतायत हे किती महत्वाचे आहे हे कळलेच असेल.

जीवनात वेळेला किती महत्व द्यायला हवय. आपल्या एक ते दोन मिनिटांच्या उशिरा येण्यामुळे काय होवू शकतं हे या फिल्मचा नायक त्याच्या पहिल्याच सिनमध्ये सांगतो. कारण तो त्यावेळच्या जगातल्या सर्वात फास्ट कुरियर कंपनीच्या चांगल्या पोस्ट वर काम करत असतो.

तो आपल्या विमान प्रवासात आपल्या मित्राला म्हणतो पण कि आज कुरियरचा ट्रक हा दोन मिनिटं उशिरा आला उद्या त्याचे चार, सहा आणि दहा होऊ शकतात. पुढच्या येणाऱ्या संकटावर जर आत्ताच विचार झाला तर येणाऱ्या संकटाशी सामना करण्यासाठी आपण सज्ज असेन.

इटलीमध्ये कोरोनामुळे जो हाहाकार होतोय ते हेच कि या रोगामुळे येणाऱ्या संकटाशी सामना कसा करायचा याचा वेळच्या वेळी विचार नाही झाला त्यामुळे जगात सर्वात चांगली मेडिकल सुविधा देणाऱ्या या देशाने या रोगापुढे हार पत्करली.

२२ मार्चला आपल्या देशामध्ये जनताकर्फयू होता. दिवसभर आपण घरामध्ये बसून तो खूप चांगल्या प्रकारे अमलात आणला पण पाच वाजताच चित्र भयवाह होतं. कोरोनाचा नायनाट केल्यासारखे लोक रस्त्यावर येऊन जल्लोष करायला लागले. हे असाच झालं कि या फिल्म मधील नायकाला रात्री कोणतं तरी जहाज हे समुद्रच्या एकदम मध्यभागी दिसतं.

तो सकाळी लगेच उठून आपल्या एकदम हलक्या अशा बोटीने तिकडे जाण्यास निघतो तर समुद्रच्या प्रचंड मोठया लाटा त्याला बाहेर टाकतात.  हेच आहे कि कोरोना ही आलेली अशीच मोठी एक लाट आहे आपण पूर्ण तयारीनिशीच त्याला हरवू शकू अशा एका दिवसाने नाही. म्हणून आपण आताच्या या लॉकडाउनमध्ये घरामध्ये बसून या आलेल्या लाटेवर मात करायची आहे,

कि जशी या फिल्म मधील नायकाने चार वर्ष वाट पाहून एक सशक्त नाव तयार करून केली.

हि फिल्म स्वतःला स्वतःचा शोध घेण्यासाठी भाग पाडते. आज असच काहीसं वातावरण आहे. फक्त आपण कोणत्या आयलँडवर नाहीये मस्त आपल्या रोजच्या घरामध्ये आहे. नायक पण त्या आयलँडवरून आपल्या घराकडे निघताना त्या मोठया लाटेचा सामना करतो तेंव्हा त्याला पुढे जायची अजून ऊर्जा मिळते. पण वाटेत त्याला ते जहाज नसतं मिळालं तर?

पण त्याची इच्छा प्रबळ होती त्यामुळे चार वर्ष निर्मनुष्य अशा आयलँड वर राहूनसुद्धा तो जिवंत घरी पोहोचला. आपण आता पर्यंत तरी एका लाटेवर मात करून पुढे आलोय पण अजून पुढे खूप पल्ला गाठून घरी सुखरूप पोहोचायचं आहे.

आपली जगण्याची इच्छा प्रबळ आहे पण आपल्याला एका जहाजाची मदत लागेल. तर अशा एका चांगल्या जहाजाची तयारी आपलं शासन करत आहे जे आपल्याला पुढे घेऊन जाईल. त्यांना आपण सहकार्य घरामध्ये बसून केलेच पाहिजे तरच आपण आपल्या ठिकाणी सुखरूप पोहोचु.

 • संदेश राजे

यापैकी तुम्हाला आवडलेला लेख कमेंट करुन कळवा.  

हे ही पहा : INTO THE WILD : इथं प्रत्येकजण स्वत: बनवलेल्या पिंजऱ्यात बंदिस्त आहे

3 Comments
 1. Shradha says

  Dear writer’s,
  Indeed each one of you have written it with the personal touch of yourself and so it really feels good to read such article which are so related to the current situation.
  I personally found Sandesh Raje’s article very interesting to read. He has done the best comparison of current situation and the movie where the actor doesn’t lose hopes and kept reaching his destination even though he lost on Island. Likewise in this global outbreak we really need to understand where we stand towards society and should support them by staying home. This simple message very well explained by Sandesh. We encourage you to write more of such.
  Thank you😊
  Stay home And Keep writing😊

 2. लक्ष्मी यादव says

  गीताश्री मगर यांचा लेख… जगून लिहिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.