कास्टलेसच्या नावानं झपाटलेल्या “कास्टलेस” कुटूंबाची गोष्ट.

एक जोडपं ज्यांनी घराचं नाव कास्टलेस हाऊस ठेवलं. ज्यांनी पहिल्या मुलांच नाव कास्टलेस ठेवलं. दूसऱ्या मुलांच नाव कास्टलेस ज्युनिअर ठेवलं. तिसऱ्या मुलींच नाव शाईन कास्टलेस ठेवलं. तीन मुलं झाल्यानंतर त्यांनी लग्न झाल्याचं रजिस्टर केलं. कास्टलेस च्या नावानं झपाटलेल्या कास्टलेस कुटूंबाची गोष्ट.

कास्टलेस “कुटूंब”

केरळमधील पुनलूर या शहरातील फसलुद्दीन अलिकुंज व अॅग्नेस गॅब्रियल या जोडप्याची ही कथा. १९७० च्या दशकात या दोघांच प्रेम फुललं. प्रेमाच्या आणाभाका घेतं आयुष्यभर एकत्र रहायचा निर्णय घेतला. पण त्यांच्या प्रेमात जात आडवी आली. आडवी आलेली ही जात संपवून टाकण्याचा निर्णय या दोघांनी घेतला.

 

दोघं घरातल्यांचा दबाव झुगारून पळून गेले. लग्न केलं तर पुन्हा त्याच प्रथेच समर्थन होईल म्हणून लग्न न करता एकत्र रहायचा निर्णय त्यांनी घेतला. दोघं एकत्र राहू लागले. हळूहळू परस्थिती सुधारली व त्यांनी घर घेतलं. या घराचं नाव त्यांनी कास्टलेस हाउस ठेवलं. राजा राणीचा संसार चालू झाला. घरात पहिल्या मुलाचा जन्म झाला. आंतरजातीय विवाह केलेल्या मुलाला पक्की जात नसते म्हणून या जात सोडलेल्या जोडप्यानं मुलाचं नाव कास्टलेस ठेवलं. दूसरां देखील मुलगा झाला त्याचं नाव कास्टलेस ज्युनिअर ठेवलं. तिसऱ्या मुलींच नाव शाईन कास्टलेस ठेवलं.

आणि सुरू झाला तो कास्टलेस कुटूंबाचा कास्टलेस प्रवास –

पंचक्रोशीत या कुटूंबाला कास्टलेस कुटूंब म्हणून ओळख मिळाली. जात नसणारं, धर्म नसणारं हे कुटूंब. यांच्या घराच्या नावाला जात नाही की यांच्या मुलांना जात नाही. जिथं जातात तिथं ही मुलं नाव आणि पत्ता एकच सांगतात तो म्हणजे, “कास्टलेस”.

कास्टलेस शाईनचं लग्न २००८ ला झालं. तेही रजिस्टर. तिच्या नवऱ्याचं नाव आहे “चे गुव्हेरा”.

आत्ता हे सगळं करुन या कुटूंबाला काय मिळालं तर आजच्या जातीजातीच्या राजकारणात “कास्टलेस ज्युनिअर” पुनलूर नगरपालिकेत निवडून गेला होता. कास्टलेस या नावानं कास्टवाल्या लोकांनी त्यांना स्वीकारलं का हे पहायला एवढां प्रसंग बास आहे की !!!!

Leave A Reply

Your email address will not be published.