त्या एका मॉडेलवरून मनीषा कोईराला आणि ऐश्वर्यामध्ये भांडणं लागले होते…

ऐश्वर्या रॉय हे नाव जरी ऐकलं तरी आपसूक कजरा रे कजरा रे गाणं डोळ्यासमोर उभं राहतं. 1994 साली मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ऐश्वर्या रॉय अनेक लोकांसाठी एक स्वप्नसुंदरी होती अजूनही आहे म्हणा. त्यात सल्लूभाई आणि विवेक ओबेरॉय यांचे प्रेमप्रकरण ऐश्वर्या रॉयच्या करिअरचे वर्णनिय पॉईंटस आहेत. आता बॉलिवूड म्हणल्यावर लव कपल आले, ब्रेकअपच्या बातम्या आल्या अशा बऱ्याच गोष्टी आल्या पण ऐश्वर्या रॉय आणि मनीषा कोईराला यांच्यात एका मॉडेलवरून कोल्ड वॉर सुरू झाला होता त्याबद्दलचा हा किस्सा.

फिल्म इंडस्ट्रीचे किस्से भले जुने झाले असतील पण त्याची चर्चा आजही होते. आता बॉलिवुडमध्ये अभिनेत्रींमध्ये कॅट फाईट सुरू असल्याचं आपण कायम ऐकत असतो पण काही कोल्ड वॉर हे कायम चर्चेत राहिले त्यापैकीच एक फाईट म्हणजे ऐश्वर्या रॉय आणि मनीषा कोईराला यांच्यातली कॅट फाईट. आता ही फाईट अशी तशी नव्हती तर एका मॉडेलवरून त्यांच्यात वितुष्ट आलं होतं आणि तो मॉडेल दोन्ही अभिनेत्रींना आवडायचा.

तर तो मॉडेल होता राजीव मूलचंदानी. 90 च्या दशकात राजीव मूलचंदानी हा सगळ्यात सक्सेसफुल मॉडेल्सपैकी एक होता आणि तेव्हा अशा चर्चा होत्या की ऐश्वर्या रॉय आणि त्याचं अफेअर आहे. शूटिंगच्या सेटवरच त्यांचं अफेअर सुरू झालं होतं. ऐश्वर्या रॉयने कधीच याबाबत स्पष्टपणे जाहीर केलं नव्हतं पण सेटवर त्या दोघांची असलेली केमिस्ट्री जगजाहीर झाली होती.

राजीव मूलचंदानी याचं नाव काय फक्त ऐश्वर्या रॉयसोबतच जोडलं गेलं असं नाही तर दुसरी हिरोईन होती मनीषा कोईराला. आता हे प्रकरण इथून खरं तापायला सुरवात झाली. मनीषा कोईरालाने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की राजीव मूलचंदानीने ऐश्वर्या रॉयला सोडलं आणि मला निवडलं. ऐश्वर्या रॉयसाठी ही घटना खरंच महत्वाची होती कारण तेव्हा नुकतंच तीच करिअर सुरू झालं होतं आणि तिला कुठल्या कोन्ट्रोव्हर्सिमध्ये अडकायच नव्हतं.

1999 साली एका इंटरव्ह्यूमध्ये ऐश्वर्या रॉयने सांगितलं होतं की, मनीषा कोईरालाने जेव्हा स्टेटमेंट दिलं की राजीव मूलचंदानीने ऐश्वर्या रॉयला सोडलं आणि मला निवडलं तेव्हा मी राजीवला फोन केला आणि त्याला विचारलं की हे काय बकवास चालू आहे. तेव्हा तोही वरमला होता. तेव्हा मी आणि राजीव फक्त चांगले मित्र आहोत जास्त काही नाही.

पण पुढे राजीव मूलचंदानी मनीषा कोईराला सोडून कुठतरी गायब झाला पण त्या एका भिडूमुळे तेव्हाच्या टॉप हिरॉइन्समध्ये भांडणं लागली होती.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.