वयाच्या १९ व्या वर्षी त्याने जगभरातील २७ बॅंका लुटल्या होत्या !
आपले इंजनियर सध्या काय करतात. ट्रॅफिकमधून जगले वाचले तर अमेरिकेसाठी येड्यागत काम करतात. वेळ मिळालाच तर बायकोला घेवून पिक्चर बघायला जातात आणि मोकळ्या वेळेत चौकात लावलेलं 2BHK चं कोडं सोडवतात.
पुण्यातले सॉफ्टवेअर इंजिनियर सध्या काहीही करु शकतात इतका कॉन्फिडन्स आम्हाला पण आहे पण १९ व्या वर्षी हे मुलं काय करत असतील. तर नुकतच त्यांनी ठोले पाटील पासून ठाकूर, शिंदे कॉलेजात अॅडमिशन घेवून कॉम्प्युटर शिकण्यास सुरवात केलेली. कॉम्प्युटर फक्त गेमपुरता किंवा ऑर्कुट पाहण्यापुरतं होतं तेव्हा C, Cpp आणि जावा, पायथॉन अस काहीच्या काही या पोरांनी शिकलं.
अंदाजे वयाच्या अठराव्या एकोणीसाव्या वर्षात त्यांनी पहिल्यांदा C शिकली असावी. या C चा वापर करुन त्यांनी पहिल्यांदा स्वहस्ते कॉम्पुटरवर झाड निर्माण केल असावं, पिरॅमिड बांधल असावं, नाहीतर गाडी काढून हिकडून तिकडे पळवली असेल. काय आनंद असायचा तो…
असो तर या आनंदाला ड्रिप्रेशनमध्ये घेवून जाणारी हि स्टोरी.. याच वयात एका मुलाने जगभरातल्या तब्बल २७ बॅंकाना अस्मान दाखवलं होतं.
जगभरातले २६ देश, २७ मोठमोठ्या बॅंका आणि FBI पासून छोट्यामोठ्या देशातील गुप्तचर संघटना त्याच्या मागावर होत्या. तो सापडत नव्हताच. त्याच्यावर एक पिक्चर देखील आला.
“कॅच मी इफ यु कॅन”.
टायटॅनिक फेम लिओनार्दो दी कप्रिओ आणि जेष्ठ दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान यांनी काढलेला हा सिनेमा याच माणसाच्या आयुष्यावर बेतलेला होता.
फ्रॅन्क ज्युनियर अॅबेग्नेल अस त्याचं नाव.
वयाच्या १५ व्या वर्षी त्यानं आयुष्यातलं पहिलं कांड केलं. झालं अस की त्याच्या वडिलांनी त्याला क्रेडिट कार्ड दिलेलं. त्या क्रेडिट कार्डचा वापर करुन त्यानं स्वत:च्या वडलांना साडेतीन हजारांचा डबरा खोदला. वडलांवरतीच पहिला प्रयोग यशस्वी झाल्यावरती आत्ता मागं बघायचं नाही हे त्यानं मनोमन ठरवलं. त्या काळात त्यानं काय केलं तर कुठल्याही कंपनीच पगार बिल चोरुन कोणाच्या अकाऊंटवर किती जमा होतात याची नोंद ठेवण्यास सुरवात केली. तिथं असा झोलझाल सुरू केला की कंपनीचा पगार कर्मचाऱ्यांच्या खिश्यात न जाता थेट त्याच्या अकाऊंटवर जमा होवू लागला. पैसा जमा झाला की हा तो ते पैसे दुसरीकडे लांबवून पसार व्हायचां.
पैसा आल्यानंतर डमी पायलट झाला, बोअर झाल्यानंतर डॉक्टर झाला नंतर वकिल देखील झाला.
दिसायला तो चिकणा होता. फायदा कसा उठवायचा म्हणून तो पायलटचा ड्रेस घालू लागला.. मोठमोठ्या हॉटेलमध्ये जायचा. लोक त्याला पायलट मानू लागले. खोटी कागदपत्र दाखवून वेगवेगळ्या देशात जायचा आणि तिथे बॅंकामध्ये कांड घडवून आणायचा ते झालं की पुन्हा दूसऱ्या देशात. पायलट म्हणून बोअर झाल्यानंतर तो हॉस्पीटलमध्ये जावून डॉक्टरकी करू लागला. तात्पुरत कामचलावू शिकून घेणं हा त्याचा हातखंडा होताच. तिथे देखील बोअर झाल्यानंतर तो वकिल झाला. तो हि हॉवर्ड विद्यापीठातून. म्हणजे तशी खोटी कागदपत्र त्याच्याकडे होतीच. पण त्यानं वकिलीची सनद मात्र प्रामाणिकपणे घेतली होती. अगदी परिक्षेला अभ्यास करुन पास होवून त्याने वकिलीची सनद मिळवली.
जगभर त्याचे कांड चालूच होते पण एक दिवस तो FBI च्या हाताला लागलाच. त्याच कारण ठरली ती त्याची प्रेयसी. प्रेमात दिलेला धोका लय वाईट. त्या पोरगीनं त्याला पकडून दिलं म्हणजे दिलं. कोर्टाने त्याला शिक्षा दिली ती फक्त १२ वर्षाची त्याचं कारण म्हणजे त्यानं त्याच्यासमोर FBI साठी काम करण्याची ऑफर देण्यात आली होती.
त्याला सांगण्यात आलं की जगभरात फसवणुक कशी केली जाते, कशी केली जावू शकते याबद्दल तू FBI ला सांगायचं. चोराचा माग काढून द्यायचा. त्याने ते कबुल केलं. मग त्याच्याकडे मोठमोठ्या बॅंका देखील येवू लागल्या. तो बॅंकाना देखील फसवणुकीपासून वाचण्याचे उपाय सांगू लागला. मार्केटमध्ये आलेल्या नव्या ट्रिक समजावून सांगू लागला.
सध्या त्याची लोकांना फ्रॉड पासून वाचवण्याची कंपनी आहे, जगभरात तो सुप्रसिद्ध आहे आणि त्याचं एकंदरित कष्टाच्या पैशावर जोरात चाललय.
हे ही वाचा –
- पैशांसाठी देश विकणारा सैनिक !
- कामाठीपुऱ्याची सम्राज्ञी : जिने नेहरूंना प्रपोज केलेलं.
- बायको सुंदर वाटत नसली तर चाणक्यनीती मधले हे पाच उपाय अवश्य करा !