एका खोट्या बातमीपायी इराक आणि इराण तब्बल आठ वर्ष युद्ध करीत राहिले.

तारीख १६ जुलै १९७९ अमेरिकेच्या  ‘द वाशिंगटन पोस्ट’ मध्ये एक बातमी छापून आली.

अशी बातमी जी दोन देशांमध्ये वाद सुरु झाले, मतभेद झाले शेवटी ह्या मतभेदाचे रुपांतर युद्धात झाले.

होय ..बरोबर वाचलं तुम्ही, अमेरिकेच्या वृत्तपत्रात छापून आलेल्या एका बातमी मुळे इराण आणि इराक मध्ये एक युद्ध झालं जे सलग ८ वर्ष चालू होतं.

आठ वर्षे चाललेले हे युद्ध २० व्या शतकातील दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात रक्तरंजित युद्ध मानले जाते. या युद्धात दोन्ही देशांच्या लाखो नागरिकांचे प्राण गेले. शेवटी युद्ध थांबलं परंतू मात्र शेवट काही ठरला नाहीच. 

सद्दाम हुसेन १९७९  मध्ये इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आणि पदसिद्ध झाले. इराकमध्ये सुमारे ६० ते ४० टक्के शिया आणि सुन्नी समुदाय आहे आणि सद्दाम हुसेन हे सुन्नी समुदायाचे होते.

हा काळ तेंव्हाचा होता जेव्हा इराणमध्ये इस्लामीक क्रांती सुरू होती. अयातुल्ला खोमेनी हा इराणचा सर्वात शक्तिशाली नेता म्हणून नेमकाच उदयास आला होता. तेव्हा त्याच्या एका विधानाची लाट आली होती, “सर्व इस्लामी देशांनी इराणसारखी क्रांती घडवून आणली पाहिजे”.

त्याने हे वक्तव्य सद्दाम हुसेन यांना उद्देशून केले की, इराणमधील राष्ट्राध्यक्षाचा पदभार एका शिया समुदायाने स्वीकारणे महत्त्वाचे होते. कारण त्यांना इराकमध्ये क्रांती आणायची होती.

या लाटेमुळे सद्दाम हुसेन देखील घाबरून असायचा.

शिया समाजाच्या विरोधामुळे त्यांची सत्ता जाते कि काय, अशीच भीती त्यांना होती. आणि त्याच दरम्यान एक बातमी आली ती अशी होती कि,

अमेरिकेच्या अंतराळातील उपग्रहांच्या सोर्स ने माहिती दिली कि, ईराण -इराकच्या बॉर्डरवर एक अशी जागा ज्याचं नाव ‘शत अल अरब’. तर या स्थानी तेलाचे भांडार आहे, ज्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा दोन्ही देशांनाही होऊ शकतो.

मग व्हायचे तेच झाले , इराक आणि इराणला ही बातमी खरी असल्याचा विश्वास पटला आणि मग दोन्ही देशांनी या ठिकाणावर हक्क दाखविणे चालू केले. दोन्ही देशांमधील परस्पर संवादावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे हे प्रकरण शेवटी संयुक्त राष्ट्रांपर्यंत गेलं परंतु त्यांनीही याकडे लक्ष दिले नाही तेव्हा हे प्रकरण अधिकच बिघडले. दोन्ही देशांमधील वादाचे रूपांतर युद्धात झाले.

आणि मग आता सद्दाम हुसेन यांना अयातुल्ला खोमेनी यांच्या वक्तृत्वाला उत्तर देण्याची संधी मिळाली. त्यांनी तेथील क्रांतीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी कब्जा करण्याची रणनीती आखली. सद्दामने इराणमधील खुजस्तानच्या लोकांना चिथावणी देण्यास सुरुवात केली की अरब नागरिकांचे येथे मोठे निवासस्थान आहे.

हा प्रदेश जिथे तेलाचे भांडार आहे तो प्रदेश  इराणचा नव्हे तर सौदी अरेबियाचा असावा परंतु या रणनीती चा काही एक फायदा सद्दाम ला झाला नाही.

आणि मग २२ डिसेंबर १९८० रोजी इराण ने इराकवर पहिला हवाई हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. इराणी क्रांतीच्या काळात त्याचे सैन्य जवळजवळ विस्कळीत झाले होते आणि तेवढ्यात इराकी   सैन्याने इराणमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांची अनेक ठिकाणांवर ताबा देखील मिळवला होता. इराणी क्रांतीमुळे युद्धाची दोन वर्षे इराकला खूप फायदा झाला होता.

आणि आता अयातुल्ला खोमेनी यांनी आता खेळी खेळली. सद्दाम हुसेनचा पराभव करण्यासाठी त्यांनी  इराणच्या जनतेचा विश्वास जिंकयला सुरुवात केली. खोमेनी याने मोठ्या प्रमाणात युवकांना सैन्यात भरती होण्यास प्रवृत्त केले आणि एक मोठी इराणी फौज तयार केली. 

शेवटी १९८२ मध्ये सद्दाम हुसेन ने युद्धबंदी ची मागणी केली, आणि युद्धात ताब्यात घेतलेली इराण मधील सर्व ठिकाणे वापस करण्याचा शब्द दिला.

यानंतर इराणने ही आपली ताकद दाखवायला सुरुवात केली..

मात्र खोमेनी यांनी युद्धबंदीची मागणी फेटाळून लावली. शेवटी सद्दामला इराणमधून आपल्या सैन्याला वापस बोलवून घ्यावे लागले होते.  इराकच्या सैन्यांनी ताबा मिळवलेले सर्व ठिकाणे युद्ध करून वापस मिळवले आणि इराकचे मुख्य ठिकाण असलेले बशरा वर हल्ला केला.

तेच एकमेव बशरा ठिकाण जिथून इराकआपले तेल इतर देशांना निर्यात करायचा.

म्हणूनच खोमेनीने इराकमधील हीच जागा हल्ल्यासाठी निवडली जेणेकरून इराकचा तेलाचे व्यवहार  पूर्णपणे संपुष्टात येतील.

याला उत्तर म्हणून इराकने रासायनिक वायूचा वापर करून इराणी सैन्यावर हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात इराणला खूप त्रास सहन करावा लागला, तरीसुद्धा अयातुल्ला खोमेनी यांनी हार मानली नाही. आता त्यांना सद्दामची सत्ता उलथवून टाकायची होती.

एकूणच या दोन्ही देशांमधील युद्धात आणि पहिल्या महायुद्धात एक मोठे साम्य दिसून आले ते असे कि,

इराणआपल्या सैन्याला इराकी सैन्यासमोर झुंडीने एकत्र उभे करायचा, जेणेकरून गोळीबार झाला तरी त्यात समोर असलेले १०० सैन्य मरतील आणि मागे वाचलेले सैनिक पुढे चाल करून त्या-त्या स्थानावर सहजरीत्या ताबा मिळवतील. परंतु इराकी सैनिकांनी जमिनीत खोल खड्डे खोदून तळ ठोकला होते  यामुळे त्यांना इराणी सैन्याला रोखता आले होते.

इराकी सैन्याचा बळी ठरलेला कुर्द चे सैन्य हि इराणला मिळाले होते त्यामुळे अशा परिस्थितीत इराण अधिक शक्तिशाली होत चालला होता.

दोघांच्या भांडणाचा त्रास बाकी देशांना होऊ लागला, कारण इथून होणारा तेलपुरवठाच बंद झाला होता.

१९८४ मध्ये इराकने इराणच्या तेलवाहू जहाजांवर बॉम्बहल्ला करण्यास सुरुवात केली. त्याला उत्तर  म्हणून इराणला इराकप्रमाणे बॉम्बफेक करता आली नाही, परंतु इराणने होर्मुझच्या पर्शियन आखाती सामुद्रधुनीचे सर्व मार्ग रोखून धरले, ही अशी जागा आहे जिथून जगभरात जवळपास ४० टक्के तेलनिर्यात केली जाते.

यामुळे इराकच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा ताण येणार होता कारण इराणने तेलाचे सर्व टँकर थांबवले होते. यामुळे इतर काही देशांचेही खूप नुकसान होत होते. त्यामुळे आता दोन्ही देशांमधील अनेक वर्षे चाललेले युद्ध आंतरराष्ट्रीय युद्ध बनले होते. आणि मग सर्व देशांनी इराणवर दबाव आणला. अशा परिस्थितीत इराणने इतर देशांतील टँकर्सना इराकचे तेलाचे टँकर सोडण्याची परवानगी दिली.

शिवाय, दीर्घकाळ चाललेल्या युद्धात इराकने इराणची आर्थिक परिस्थिती बरीच कमकुवत केली होती.

ही सर्व परिस्थिती लक्षात घेता अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी आता हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली.

युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांवर खूप दबाव आणला गेला आणि शेवटी जुलै १९८८ मध्ये हे युद्ध फायनली थांबलं.  या युद्धात जवळपास २० लाख लोकं मारली गेली होती, त्यात लष्करासह मोठ्या संख्येने नागरिकही होते. लाखो लोक जखमी झाले होते. इतिहासातील एक भयानक युद्ध म्हणून या युद्धाची नोंद ठेवली जाते.

 

विशेष म्हणजे, वॉशिंग्टन वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेली बातमी पूर्णपणे खोटी ठरली, तिथे तेलसाठा नव्हताच.

ज्या ठिकाणी त्यांनी तेलाचा साठा असल्याचा दावा केला होताआणि त्यामुळेच युद्ध झाले होते. तिथे शोध घेतल्यानंतर अशी माहिती समोर आली कि तिथं कसल्याच प्रकारचा तेलसाठा नाहीये.   

त्यामुळे इराकने वॉशिंग्टन वृत्तपत्रावर खटला भरला, परंतु वृत्तपत्राने माफी मागितल्या वर त्यांच्यावर कसलीही कारवाई केली नाही असे म्हटले जाते.

परंतु या युद्धानंतर दोन्ही देशांची मैत्री पूर्णपणे तुटली होती. या युद्धात दोन्ही देशांनी नुकसानीशिवाय काहीही साध्य केले नव्हते. हे युद्ध एखाद्या क्रिकेट मॅच सारखं होतं, ना हार न जीत .. टाय अप !

हे ही वाचा भिडू.

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.