१७, १९ आणि २१ तोफांची सलामी देण्यामागचा प्रोटोकॉल काय असतो

तामिळनाडूच्या कुन्नूर इथं झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्यासह आणखी १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसलाय. या अपघातात मृत्यू पावलेल्या सर्वांना आज सन्मानाने अंतिम निरोप देण्यात आला. प्रोटोकॉलनुसार बिपीन रावत यांना १७ तोफांची सलामी देण्यात आल्याचं बोललं गेलं.

आता जेव्हा कधी कोणता अधिकारी किंवा मोठ्या नेतेमंडळी यांचं निधन होत. तेव्हा प्रोटोकॉलनुसार त्यांना देण्यात येणाऱ्या सलामीवरून नेहमी चर्चा होते. आतासुद्धा बिपीन रावत यांच्या १७ तोफांच्या सलामी वरून चर्चा रंगल्यात. कारण शक्यतो भारतात २१ तोफांची सलामी देण्याचा प्रोटोकॉल आहे. मग त्यांच्याबाबतीत हा प्रोटोकॉल का मोडला गेला ?

तर हि तोफांची सलामी देणं म्हणजे एक सन्मान देण्याची प्रक्रिया आहे. ज्याचा निर्णय पूर्णपणे सरकारच्या हातात असतो मी कोणाला द्यायचा आणि कोणाला नाही. राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, कला या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना शेवटचा निरोप देताना हा सन्मान देण्यात येतो.

सोबतच प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिनासह इतर अनेक विशेष प्रसंगी या तोफांची सलामी दिली जाते. विशेष प्रसंगी तोफांची सलामी देऊन सन्मान केला जातो. त्याच वेळी, ज्या सैनिकांनी शांतता किंवा युद्धाच्या काळात आपले विशेष योगदान दिले आहे अशा सैनिकांना भारतीय सैन्याचा लष्करी सन्मान दिला जातो.

आता या तोफांच्या सलामी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या असतात. म्हणजे १७, १९ आणि २१ अश्या संख्येत ही तोफांची सलामी देण्यात येते

ही तोफांची सलामी देण्याची प्रथा सुरु झाली १४ व्या शतकात. त्या काळात जेव्हा जेव्हा एखाद्या देशाचे सैन्य समुद्रमार्गे एखाद्या देशात जायचे तेव्हा समुद्रकिनाऱ्यावर ७ तोफा डागल्या जायच्या. याचा उद्देश हा संदेश पोहोचवणं होत कि, तो आपल्या देशावर हल्ला करण्यासाठी आला नाही.

त्यानंतर १७ व्या शतकात ब्रिटिश सैन्याने राजघराण्याच्या सन्मानार्थ २१ तोफांची सलामी देण्याची प्रथा सुरू केली. त्याच वेळी, अमेरिकेनेही १८ व्या शतकात हा ट्रेंड स्वीकारला.

तसेच, पराभूत सैन्याला दारुगोळा संपवायला सांगण्याचीही त्या काळात प्रथा होती. जेणेकरून ते सैन्य पुन्हा त्याचा वापर करू शकणार नाही. जहाजांवर ७ तोफा असायच्या. आता ७ हा आकडेच का तर सात हा अंक शुभ मानला जातो.

आता भारतात तोफांच्या सलामीची परंपरा ब्रिटिश राजवटीत सुरू झाली. त्या काळात ब्रिटीश सम्राटाला १०० तोफांची सलामी दिली जात होती. इतर राजांना ३१ किंवा २१ तोफांची सलामी देण्याची प्रथा होती.

अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान आणि कॅनडा यासह जगातील अनेक देशांमध्ये महत्त्वाच्या राष्ट्रीय दिवशी २१ तोफांची सलामी देण्याची परंपरा आहे. भारतात प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी दिली जाते.

तर १७ तोफांची सलामी उच्च दर्जाचे लष्करी अधिकारी, नौदल ऑपरेशन्स प्रमुख आणि लष्कर आणि हवाई दलाच्या प्रमुखांना दिली जाते. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद भारतात नवीन आहे. ही पोस्ट लष्कराशी संबंधित असल्याने बिपीन रावत यांनी २१ नव्हे तर १७ तोफांची सलामी दिली जाणार आहे. अनेक प्रसंगी, भारताचे राष्ट्रपती, लष्करी आणि वरिष्ठ नेत्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी २१  तोफांची सलामी दिली जाते.

आता अंत्यसंस्कार करताना सुद्धा प्रोटोकॉल पाळला जातो. सरकारी अंत्यसंस्काराच्या काही मुख्य वैशिष्ट्य असतात. ज्यात बंदुकीची सलामी आणि झेंडा स्तंभावर झेंडा अर्धा खाली उतरवण्यापासून, राज्य किंवा राष्ट्रीय शोक दिनाची घोषणा, सार्वजनिक सुट्टी आणि राष्ट्रध्वजाने ताबूत लपेटणे यांचा समावेश आहे.

अलीकडच्या काळात या नियमात बदल झालेले पाहायला मिळालेत. जेणेकरून राज्य सरकारे ठरवू शकतील की व्यक्तीचा दर्जा, स्थान आणि देशाची सेवा याच्या आधारावर कोणाला शासकीय इतमामात सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार दिले जावेत.

महत्वाचं म्हणजे जेव्हा एखादा परदेशी राष्ट्रप्रमुख देशाच्या दौऱ्यावर येतो तेव्हा राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत केले जाते आणि राष्ट्राध्यक्षांना सलामीही दिली जाते.

भारतात पहिल्यांदा महात्मा गांधी यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची घोषणा करण्यात आली. तोपर्यंत शासकीय इतमामात अंत्यसंस्कारासाठी प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली नव्हती.

हे ही वाच भिडू :

English Summary: India’s first Chief of Defense Staff (CDS) General Bipin Rawat, who lost his life in a helicopter crash in Kannur, Tamil Nadu, will be cremated today. According to the protocol, they will be given a salute of guns. Questions often arise in the mind regarding the salute of guns, what is the reason behind why this artillery salute is given. Why is the number of guns different on different occasions? Today we tell you what is the reason behind this?

Web Title : CDS General Bipin Rawat protocol behind 17,19 and 21 gun salute

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.