नवे CDS म्हणून मराठी माणसाची वर्णी लागण्याची शक्यता !

देशाचे पहिले सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचं अपघाती निधन झालंय. संपूर्ण भारतीय लष्कराची कमान ते सांभाळत होते. पण त्यांच्या निधनानं आता सीडीएसचं (CDS) पद रिकामं झालंय. सीडीएससारखं सर्वोच्च लष्करी पद हे फार काळ रिकामं नाही ठेवता येणार.

या पदासाठी आता बरीच नावं चर्चेत आहेत. त्यातलं एक नाव म्हणजे

सध्याचे लष्कर प्रमुख मनोज मुकूंद नरवणे

त्यांचं नाव चर्चेत का आहे हे बघण्याआधी हे पद निर्माण करण्यामागे काही कारण आहेत ते पाहू. आणि नंतर कोणती नाव चर्चेत आहेत हे पाहू.

तर १९९९ मध्ये कारगिल युद्धापासूनच या पदाची निर्मिती करण्याची मागणी रखडली होती. कारगिल युद्धानंतरच्या के. सुब्रह्मण्यम समिती आणि त्यानंतरच्या शेकटकर समितीने याविषयीची शिफारस केली होती.

२००१ मध्ये तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाने त्याचा आढावा घेतला असता, तीन सेवांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले. तिन्ही सैन्यात योग्य समन्वय असेल तर देशाच्या सुरक्षिततेला कमी हानी होऊ शकते तसेच या पदाच्या जबाबदारीमुळे देशाच्या सुरक्षेला फायदाच होईल या विचाराने हा ठराव मांडला होता.

परंतु राजकीय इच्छाशक्ती वा सहमती नसल्यामुळे हे पद निर्माण होऊ शकलं नाही, असं म्हटलं जातं.

पुढे २०१२ मध्ये नरेश चंद्र टास्क फोर्सने चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव देण्यात आला. त्याचा उद्देश असा होता कि, जगात चालणारे युद्ध आणि आपल्या देशांवर येऊ शकणारी सुरक्षेची आव्हाने काळानुसार गंभीर होत चालली आहेत. या पदाची निर्मिती केली गेली तेंव्हा अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये तणाव चालू होता. त्याची झळ भारताला हि बसत होती. जर युद्धाची परिस्थिती निर्माण झालीच तर आपण प्रत्येक अनुषंगाने तयार राहावं.

त्यातच भारत हा आमचा एकमेव शत्रू आहे, असा पाकिस्तानचं गाऱ्हाण आणि त्याला चीन सारख्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या देशाचा पाठींबा. या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताला सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज राहावं म्हणून अशा पदाची आवश्यकता होती.

त्यामुळे ७३ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून घोषणा केली कि, देशाच्या तिन्ही संरक्षण दलांचे एकत्रित नेतृत्व चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ सीडीएस या पदाची निर्मिती केली जाईल.

या पदाची भूमिका आणि जबाबदारी काय असते ?

भारताच्या लष्करांमधील तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी आणि यातील समन्वय अधिक सुधारण्यासाठीची जबाबदारी या CDS पदावर असते. तसेच लष्करी कामकाज विभागाचे CDS हे प्रमुख असतात. भलेही ती व्यक्ती या तिन्ही दलप्रमुखांप्रमाणेच चार स्टार जनरल असेल तरीही सीडीएस हे पद लष्कर, नौदल आणि हवाई दलप्रमुखांच्या वरचं असेल.

या पदाची आणखी एक भूमिका म्हणजे, चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या स्थायी अध्यक्षपद. CDS ची भूमिका सशस्त्र दलाच्या ऑपरेशन्ससाठी आर्थिक समन्वय आणि व्यवस्थापन असेल. सीडीएस हे तिन्ही दलांशी संबंधित मुद्द्यांवर संरक्षण मंत्र्यांचे प्रमुख लष्करी सल्लागार देखील असतील.

लष्कराच्या तिन्ही विभागांच्या प्रमुखांना चार-स्टार असतात तसेच सीडीएस यांना देखील चार स्टार असतात, तसेच प्रोटोकॉलनुसार या तिन्ही दलाच्या प्रमुखांच्या वरच्या लेव्हलचं हे पद असते. त्यामुळेच जनरल रावत यांच्या निधनानंतर आता नवे सीडीएस कोण होणार याची चर्चा सुरु झालीय. आणि त्यासाठी एकमेव आणि आघाडीवरचं नाव आहे सध्याचे लष्कर प्रमुख मनोज मुकूंद नरवणे.

काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सीसीएसची मिटींग झाली. या कमिटीत देशाच्या लष्करासंबंधीच्या सर्व निर्णयाची चर्चा होते त्यासंबंधी निर्णय घेतले जातात. जनरल रावत यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर सीसीएसची (CCS) बैठक झाली. या बैठकीतल्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार,

सध्यस्थितीत जनरल एमएम नरवणे हेच देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी आहेत. त्यातही जनरल रावत यांनी गेल्या काही काळात सीडीएस म्हणून जे काही प्रोजेक्ट सुरु केलेत, काम हाती घेतलेत, त्याची माहिती आणि अनुभव हा सर्वाधिक जनरल नरवणेंनाच आहे.

सध्याचे वायूदल प्रमुख व्ही.आर.चौधरी हे सुद्धा मराठीच आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण नांदेडमध्ये झालेलं आहे. त्यांनी अलिकडेच इंडियन एअरफोर्सची जबाबदारी हाती घेतलीय. तर नेव्ही प्रमुख असलेल्या आर हरीकुमार यांनीही ३० नोव्हेंबरला सूत्रे हाती घेतलीयत. त्यामुळेच सीडीएसच्या पदासाठी जनरल नरवणेंची जी पात्रता अनुभव आहे ती इतरांकडे नाही. त्यामुळेच जनरल नरवणेंचं नाव आघाडीवर आहे.

त्यात आणि जनरल नरवणे हे पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये निवृत्त होणार आहेत. लष्करी नियमानुसार सीडीएसला 65 वर्ष वयापर्यंत त्या पदावर रहाता येतं. तर इतर तीनही सैन्यदल प्रमुखांना वयाच्या 62 वर्षापर्यंत त्या पदावर रहाता येतं. किंवा तीनच वर्षे त्या पदावर रहाण्याची अट आहे. त्यानंतर मात्र ते निवृत्त होतात.

जनरल नरवणे निवृत्त झाल्यानंतर सीडीएस पदावर रहाण्यासाठी सर्व पात्रता पूर्ण करतात. त्यामुळेच सीडीएसचे फ्रंट रनर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय.

भारत देशाव्यतिरिक्त २२ देशांमध्ये सर्व दलांचा प्रमुख असे पद आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या देशांमध्ये देखील हे पद आहे.

 

English Summary:

The present Chief of Air Staff VR Chaudhary is also a Marathi. He completed his primary education in Nanded. He recently took charge of the Indian Air Force. Navy Chief R Harikumar also took over the reins on November 30. That is why others do not have the qualifying experience of General Narwane for the post of CDS. That is why General Narvane’s name is at the forefront.

 

WebTitle: CDS Update : Army chief Manoj Mukund Narawane is likely to be the new CDS Genaral

 

Leave A Reply

Your email address will not be published.