कुराणचा दाखला देऊन शेकडो मुलांना दहशतवादापासून दूर ठेवणारे ‘ऑपरेशन माँ’चे जनक

महात्मा गांधींचं एक फेमस वाक्य आहे  ‘an eye for an eye makes the world blind’. यात गांधींचं साधं लॉजिक होतं, हिंसेला हिंसेने उत्तर दिलं तर एकदिवस जगच संपून जाईल. पण आता तुम्ही म्हणणार काश्मिरात अतिरेक्यांकडून गोळ्या पडायला लागतील तेंव्हा लाव तुझी अहिंसेची अगरबत्ती…

त्यामुळं गरज पडेल तिथं हिंसेला त्याच भाषेत उत्तर, नाहीतर अहिंसा झिंदाबाद हे प्रॅक्टिकल तत्व वापरात आणणं तसं अवघड. मात्र लेफ्टिनेंट जनरल केजेएस ढिल्लाँ यांनं हे तत्व बरोबर जपलं.

गेल्या काही काळापासून काश्मीरमध्ये स्थानिक लोक दहशतवादाचा मार्ग अवलंबत असल्याच्या बातम्या येत आहेत. आणि अशा परिस्थितीत लष्कराच्या एका जनरलने काश्मीरच्या जनतेला आपली परंपरा ओळखून, पाकिस्तानच्या नादानं आपली ओळख खराब न करण्याचा सल्ला देऊन अनेकांना दहशतवाद स्वीकरण्यापासून प्रवृत्त केलंय ते अधिकारी आहेत राजपुताना रायफल्सचे लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लाँ.

३९ वर्षांच्या कारकिर्दीत भारतीय सैन्यात विविध पोस्टिंगवर सेवा दिल्यानंतर, लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लाँ सोमवारी निवृत्त झाले.

डिसेंबर १९८३ मध्ये सैन्यात भरती झालेल्या, ‘टायनी ढिल्लाँ’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या प्रतिष्ठित अधिकाऱ्याने काश्मीर स्थित XV कॉर्प्सचे प्रमुख म्हणून आपल्या कार्यकाळात ‘ऑपरेशन माँ’ सुरू केल्याबद्दल मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळवली.

ऑपरेशन माँ ते दहशतवाद्यांच्या नादाला लागून भरकटलेल्या तरुणांच्या मातांशी संपर्क साधत त्यांनी त्यांच्या मुलांना पुन्हा मुख्य प्रवाहात परत आणण्याची विनंती केली. आणि त्यांची ही स्ट्रॅटेजि चांगली चालली होती. आईची आर्त हाक ऐकून अनेक अतिरेक्यांनी सरेंडर पण केलं होतं.

ज्या कुराणचा दाखल देऊन अतिरेकी तरुणांची माथी भडकवत त्याच पवित्र कुराणचा खरा रथ सांगून त्यांनी अनेक तरुणांना शस्त्र ठेवण्यास भाग पाडलं होतं. ”चांगले करा आणि आईची सेवा करा, वडिलांनाही विसरू नका, पवित्र कुराणात आईचे हेच महत्त्व आहे” लेफ्टनंट जनरल ढिल्लाँ यांचा हाच संदेश अनेक तरुणांना हिंसेचा मार्ग स्वीकारण्यापासून परावृत्त करत होता. 

मात्र गरज पडेल तेव्हा बंदुकीच्या भाषेत पण उत्तर द्याची धमकाही अनेकदा लेफ्टनंट जनरल ढिल्लाँ यांनी दाखवून दिली होती. 

लेफ्टनंट जनरल ढिल्लाँ हे मोक्याच्या ठिकाणी असलेल्या XV कॉर्प्सचे कॉर्प्स कमांडर म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रकाशझोतात आले होते. तेंव्हा सुरक्षा दलांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे CRPF जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड कामरान ऊर्फ ‘गाझी’चा खात्मा केला ज्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते.

“कितने गाझी आये और कितने गये, हम यहाँ हैं देख लेंगे सबको “

त्यांनी ‘गाझीला’ ढगात पाठवल्यानंतर केलेले हे विधान YouTube आणि Twitter वर तुफान व्हायरल झाले होते. लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लाँ आणि यांच्यासारख्या असंख्य सैनिकांमुळं इंडियन आर्मीचं नाव जरी वाचलं तरी अभिमानानं छाती भरून येते. थँक यु जनरल!

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.