चक्रधर स्वामींची पुण्यतिथी; ते महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक म्हणून ओळखले जातात

१२ व्या शतकात चक्रधर स्वामींनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मूल्ये जोपासणाऱ्या पुरोगामी व उदारमतवादी विचारांचे मांडून अंधश्रद्धा, कर्मकांडावर आघात केला. तसेच  वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री-पुरुष समानता असावी असा समतावादही रुजवला. 

महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक म्हणून ओळखले जाणाऱ्या चक्रधर स्वामी यांची आज जयंती.   

बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथमधील भडोच येथे चक्रधर स्वामी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव  याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळईसा होते. चक्रधरांचे मूळ नाव  हरपाळदेव असे होते. 

मोठे झाल्यावर हरपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. 

याच काळा त्यांनी युद्धात सहभाग घेतला होता. परत आल्यानंत हरपाळदेव आजारी लोकांची सेवा करायला लागले होते. त्यांना हे काम आवडू लागले होते. यामुळे हरपाळदेव राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले. 

एकदा त्यांची तब्बेत अचानक बिघडली व हरपाळदेव यांचा मृत्यू झाला. पण त्यांना जेव्हा सरणावर ठेवण्यात आले जिवंत असल्याचे कळाले. महानुभाव पंथ मानणाऱ्यानुसार यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला. 

त्याचे कारण म्हणजे महानुभावीयांच्या पंच अवतारातील तिसरा अवतार चांगदेव यांचा याच दरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याचा आत्मा चक्रधर स्वामी यांच्या शरीरात शिरल्याचा एक मतप्रवाह महानुभाव पंथ मानणाऱ्या मध्ये आहे. महत्वाचे म्हणजे यानंतर हरपाळदेव यांनी पूर्वीप्रमाणे आपला संसार सुरु ठेवला. काही दिवसात त्यांना पुत्रही झाला. 

या सगळ्यात काळात त्यांनी आपले सामाजिक कामात खंड पडू दिला नाही. तर दुसरीकडे त्यांचे मन संसारातून विरक्त होत चालले होते. संसारात त्यांना कुठलाही आनंद मिळत नव्हता.  

संसार-सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय हरपाळदेव यांनी घेतला 

आपण घरसोडतांना कुठले कारण सांगावे हे त्यांनी अगोदरच ठरविले होते. त्यानुसार हरपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जात आहे असे सांगितले आणि गृहत्याग केला.  पण हरपाळदे हे रामटेक येथे जाता सिद्धपूर येथे गेले. सगळ्या गोष्टींचा त्याग करून करून भ्रमण ते करत होते. तिथे त्यांना वैरागी बाबा भेटले. त्यांना गोविंदप्रभू म्हटले जातं होते. 

गोविंदप्रभूंपासून हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्याचे सांगितलं जातं. 

गोविंदप्रभूंनी त्यांना चक्रधर असे नाव दिले. गोविंद प्रभुंचा शिष्य झालेल्या चक्रधरांनी सालबर्डीच्या डोंगरावर बारा वर्षे तप केले. त्या तपातून त्यांना ज्ञान मिळाले की; सत्य, अहिंसा, समता या तीन तत्त्वांचे आचरण केले; तरच मानवजातीचे कल्याण होईल. 

गोविंद प्रभुंचा शिष्य झालेल्या चक्रधरांनी सालबर्डीच्या डोंगरावर बारा वर्षे तप केले. त्या तपातून त्यांना ज्ञान मिळाले की; सत्य, अहिंसा, समता या तीन तत्त्वांचे आचरण केले; तरच मानवजातीचे कल्याण होईल. ह्या तीन तत्त्वांच्या प्रचारासाठी त्यांनी आपले उर्वरित आयुष्य वेचायचे असे ठरवले. 

हमदनगर जिल्यातील पाथर्डीपासून जवळ असलेल्या येळी या गावात चक्रधरस्वामी काही काळ तिथे राहिले. येळी येथे महानुभाव पंथीय मंदीर आहे. त्यानंतर चक्रधरस्वामींनी महाराष्ट्रभर एकट्यानेच प्रवास केला. पुढे चक्रधर पैठण येथे आले आणि तिथे त्यांनी संन्यास स्वीकारला आणि जीवनोद्धाराच्या कार्याला प्रारंभ केला. पुढे आंध्र प्रदेशाच्या काही भागातही ते फिरले. या काळात चक्रधरांना काही शिष्य लाभले. त्यापैकी वडनेरचे रामदेव दादोस हे प्रमुख होते. त्यांच्यामार्फतच पुढे चक्रधरांना नागदेव, आबाइसा, महादाइसा, उमाइसा असा शिष्यपरिवार मिळाला.  

चक्रधर स्वामींना उच्चनीच हा भेद मान्य नव्हता.

सोवळ्या-ओवळ्याच्या कल्पनेवरही त्यांचा विश्वास नव्हता. उपासतापास, व्रते इत्यादी गोष्टींनी देव मिळत नाही असे ते अनेकवेळा सांगत. अहिंसक वृत्तीने वागावे, सर्वाविषयी प्रेम बाळगावे; असा उपदेश ते करत असत. स्त्रियांच्या उद्धाराची वाट मोकळी केली आणि शूद्रांनाही ज्ञानाचा अधिकार आहे, असा उपदेश केला. त्यांनी संस्कृत भाषेला बाजूला सारून मराठी भाषेला प्राधान्य दिल्याने त्यांना अनेकवेळा विरोधाला सामोरे जावे लागले होते. 

तसेच त्यांच्या मृत्यू बद्दल सुद्धा दोन मत प्रवाह आहे. एक प्रवाह त्यांची हत्या घडवून आणली तर दुसरा मत प्रवाह ते उत्तरेत निघून घेल्याचे सांगितलं जात. 

महानुभव पंथ नेमका काय आहे 

‘महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः’ या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ, असे म्हटले जाते. १३ व्या शतकात चक्रधर स्वामींनी  महानुभाव पंथाची स्थापाना केली. महानुभव पंथ मूळ महाराष्ट्रात असले तरीही पंजाब, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दिल्ली आदी अर्ध्यापेक्षा जास्त भारतात पसरलेला आढळतो. उत्तरेकडे या संप्रदायाला जयकृष्णी पंथ म्हटले जाते.

महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये सूत्ररुपाने ‘दृष्टान्तपाठ’ या ग्रंथात सांगितली. महानुभाव पंथ मानणारे कृष्णभक्त असतात आणि कृष्णाचे पाच अवतार झाले असे मानतात. ते भक्तिमार्गी असून काही नियम पाळतात. त्यातील प्रमुख चार नियम म्हणजे शणागती, प्रसाद सेवा, मूर्तिध्यान वा मूर्तिज्ञान आणि नामस्मरण हे आहे. 

हे ही वाच भिडू

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.