बायको सुंदर वाटत नसली तर “चाणक्यनीती” मधले हे पाच उपाय अवश्य करा ! 

हालेलुयीया. 

काय विषय घेतलाय भिडू… कसा सुचला सांग की ? 

ते जावू दे ना. संध्याकाळच्या वेळी एकटा बसलेलो आणि सुचला हा विषय. पण विषय तर महत्वाचा आहे न. कसय या जगात खूप गोष्टी आहेत ज्यामुळ सकाळ संध्याकाळ माणूस नावाचा प्राणी डिप्रेशनमध्ये असतो. कामाला लागेल म्हणून त्याचे आईवडिल त्याचं लग्न लावून देतात. नव्याची नवलाई झाली कि आजूबाजूच्या मित्रांची लग्न होतात. मग याला वाटतं कि अरे त्याला तर चांगली मिळाली की, मीच काय शेण खाल्लेलं. हळुहळु बाहेरख्याली नजरा वाढू लागते. घरकी मुर्गी दाल बराबर  म्हणू लागतो.  घरचं जेवण कडू लागतं. काही केल्या स्वत:ची  बायको सुंदर वाटत नाही. मग त्या नजरांचा शोध घेतला जातो. 

कधीकधी वाटतं डिप्रेशनमध्ये असणाऱ्या लोकांची संघटना बांधावी. पण कसय डिप्रेशनमध्ये जाण्याची गरज नाही. त्याच कारण चाणक्यला माहित होतं भविष्यात आपल्या पिढीबरोबर असच होणाराय म्हणूव चाणक्यने खूप विचार करु रात्रभर कष्ट करु हे पाच उपाय लिहून ठेवले.  चार दिवस उपाशी राहून महाप्रसादावर तुटून पडाल तस तुटून पडा आणि वाचून घ्या. 

बायको सुंदर वाटत नसली तर काय करावं. 

 

1) स्वत:चा चेहरा उठल्या उठल्या आरशात बघायला सुरवात करा. 

Screen Shot 2018 10 04 at 5.01.40 PM

हा एक उत्तम प्रयोग आहे. याला सिंहावलोकन देखील म्हणू शकता. मुळात दूसऱ्याच सौंदर्य ठरवत असताना आपण काय दिसतो हे समजून घेण महत्वाच आहे. म्हणूनच चाणक्य अस सांगतो की, स्वत: अगोदर आरश्यात पहायला शिका. आपला चेहरा पाहून आपण काय आहोत याचा दिवसभर डोक्यात विचार राहीला पाहीजे.

हे ही वाचा – 

2) तुमचा बल्या केलेल्या मुलींबद्दल दिवसातून तीन वेळा विचार करणे. 

ती दिसायला छान होती, पण तीने फसवलं. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी रंभा अप्सरा येवून गेलेली असते. जी बायकोपेक्षा खूपच छान होती पण तीने तुमचा व्यवस्थित गेम केला.रोज तीन टाईम सकाळ, संध्याकाळ, दूपार तिच्याबद्दल विचार करा. लक्षात येईल की तुमचा बल्या कसा झाला. आजवर ज्या बायकोने तुम्हाला किंम्मत दिली तिची किंम्मत रोज वाढत जाईल.

3) बायकोने तुमचे किती किडे मारले याची नोंद ठेवा. 

वाईट गोष्टी करणं हा आपला स्वभावच असतो. लहानपणी आपल्या चुकांवर आई पांघरुन घालते तर मोठ्ठेपणी बायको घालते. थोडक्यात अंगात असणारी मस्तीमुळे तुम्ही रोज कुठलं ना कुठलं संकट ओढवून घेत असता. अशा वेळी आपल्या बायकोनं काय केलं याचा विचार करा. शंभर टक्के रिझल्ट पॉझिटिव्ह येणार शब्दय आपला.

4) कठिण समय येता कोण कामासी येतो. 

तुमच्या आज गाडी आहे बंगला आहे. आत्ता विचार करायचा की हे नसलं तर सोबत कोण असेल. भले ऐश्वर्या राय संभाळायला बच्चन आडनाव लागत भाऊ. मुमताज संभाळायला पण मुघल लागतं भाऊ. उगीच पतंग उडवायची काम करायची नाहीत. तुमच्याकडे यातलं काहीच नसेल तर तुमची बायको तुमच्या सोबत येईल का विचार करा, रोज तीन टाईम हाच विचार करा. कुठल्या कुठं सुंदर कांतीवाली विसरुन बायको भारी वाटायला सुरवात होईल.

5) वेब पोर्टलवरील लव्ह स्टोऱ्या वाचणं बंद करणे.

कसय बऱ्याचदा कंटेटला अश्व लावून काहीही सांगण्यासाठी अनेकजण टिप्स देत राहतात. फेअर अॅण्ड लव्हली पासून तेलापर्यन्त अनेक प्रयोग अशी लोकं करत असतात. त्याचा माल खपतो पण आपल्याकडे न्युनगंड येतो. लक्षात ठेवा तुमचा संसार चालवायला आम्ही येणार नसतो. तो तुम्हीच चालवायचा असतो. तिथे कुठलीच चाणक्यनिती कामाला येत नाही. सो जस्ट चील भिडू. उत्तम संसार करा. मार्केटच्या नादात नको त्या गोष्टी टाळत जा. फरक पडेलं.

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.