एकदा युपी पोलिसांनी चक्क पंतप्रधानांकडूनच लाच घेतली होती..

भारतात सुरवातीच्या काळात अनेक पंतप्रधान होऊन गेले जे प्रामुख्याने गाजले ते म्हणजे त्यांच्या साधेपणासाठी आणि थेट लोकांमध्ये त्यांच्या साधेपणाची असलेली क्रेझ यामुळे. अटलबिहारी वाजपेयी, चौधरी चरण सिंह, लाल बहादूर शास्त्री आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे असे पंतप्रधान होते कि त्यांच्या साध्या राहणीमानामुळे ते प्रचंड गाजले. यामध्ये चौधरी चरण सिंह यांचा उल्लेख आवर्जून करावा वाटतो कारण त्यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ हा फक्त ६ महिन्यांचा होता. पण या सहा महिन्यात त्यांनी असा काही बॉम्ब फोडला होता कि सगळा देश हादरवला होता. 

भारताच्या राजकारणात चौधरी चरण सिंह हे मोठं नाव. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले चौधरी चरण सिंह हे सामान्य लोकांचे नेते म्हणून सुद्धा ओळखले जायचे. शेतकऱ्यांचे नेते म्हणून जेव्हा ते पंतप्रधानपदी विराजमान झाले तेव्हा ते विना कसलाही तामझाम करता लोकांमध्ये जायचे आणि त्यांची हि साधेपणाची स्टाईल लोकांना चांगलीच आवडायची. 

तर मेन घटनेकडे वळूया. साल होतं १९७९ चं चौधरी चरण सिंह हे देशाचे पंतप्रधान झाले होते. 

पंतप्रधान बनून अगदी काहीच दिवस झाले होते की उत्तर प्रदेशमधल्या अनेक जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांच्या तक्रारी त्यांच्याकडे येऊ लागल्या. शेतकऱ्यांचा आरोप होता कि पोलीस आणि ठेकेदार हे लाच घेऊन शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. आता यावर उपाय म्हणून आणि आपण शेतकऱ्यांचे नेते म्हणून यावर काहीतरी रामबाण इलाज काढायला पाहिजे अशी खूणगाठ चौधरी चरण सिंह यांनी मनाशी बांधली. 

ऑगस्ट १९७९. एका संध्याकाळी ६ वाजता उत्तर प्रदेशाच्या इटावा जिल्ह्यात एक म्हातारा आला, एकदम मळकट धोतर आणि कुर्ता त्याने घातलेला होता. त्या म्हतार्याने बैल चोरीला गेल्याची तक्रार द्यायची म्हणून आला होता. या दरम्यान तिथल्या स्थानिक पोलिसाने आपले रेग्युलर धास्ती बसेल असे प्रश्न  त्या म्हाताऱ्याला विचारले. तक्रार न नोंदवताच त्या म्हाताऱ्याला जायला सांगितलं.

जेव्हा तो म्हातारा पोलीस स्टेशनमधून जाऊ लागला तेव्हा पाठीमागून अचानक आवाज आला कि बाबा थोडंफार चहापाण्याची सोय करा लगेच तक्रार लिहून घेतो. 

शेतकऱ्याने सही करणार सांगितलं आणि लगेचच त्याच्यापुढे मुन्शीने पेन सरकवला. 

म्हाताऱ्या शेतकऱ्याने पेन तर घेतलाच शिवाय अंगठा लावण्याचा पॅड सुद्धा उचलला. मुन्शी चक्रावला कि सही म्हणाला आणि अंगठ्याचा पॅड का उचललाय. तेव्हा शेतकऱ्याने त्या कागदावर सही केली आणि आपल्या मळलेल्या कुर्त्यातून एक ठसा काढला तो शाईच्या पॅडमध्ये बुडवला आणि त्या कागदावर तो ठसा उमटवला.

तो मळलेल्या कपड्यांमधला म्हातारा होता भारताचे पंतप्रधान चौधरी चरण सिंह. 

त्यांनी लागलीच ऍक्शन घेतली आणि सगळ्या पोलीस स्टेशनला सस्पेंड केलं. चौधरी चरण सिंह यांना शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या तक्रारींनी अस्वस्थ केलेलं होतं. यावर स्वतःच काहीतरी उपाय काढावा म्हणून त्यांनी उसराहार पोलीस स्टेशनच नीट निरीक्षण करायला आलेले होते. 

या दौऱ्याच्या वेळी त्यांनी आपली गाडी हि काही अंतरावर लावली. आपला सगळा लवाजमा त्यांनी काही अंतरावरच थांबवला होता. आपल्या कपड्यांवर माती टाकून ते कपडे त्यांनी मळवले आणि तक्रार दाखल करायला गेले. हे प्रकरण तेव्हा भरपूर गाजलं होतं आणि पुन्हा एकदा चौधरी चरण सिंह यांच्याप्रती लोकांच्या मनात जागा पुन्हा वाढली होती.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.