या पगडीने ब्रिटनमध्ये इतिहास निर्माण केलाय..

 

काल एका पगडीने महाराष्ट्रात चर्चेचा पूर आलां. नेमकी कोणती पगडी वापरायची याबद्दल चर्चा झडू लागल्या. त्याचं कारण देखील तसच तगडं आहे. शरद पवारांनी पुणेरी पगडीला नकार देवून फुले पगडी वापरली जावी अस सांगितलं. योग्य की अयोग्य याचं उत्तर पुणेकर दूपारी २ ते ५ हि वेळ सोडून देतीलच. महाराष्ट्रातले विचारवंत कधीही देतील पण या सर्व गोंधळात थेट सातासमुद्रावरुन एक आश्चर्यचकित करणारी बातमी आली आहे. 

विषय काय आहे ? 

बातमी अशी की काही दिवसांमागे ब्रिटनच्या राणीचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी ब्रिटनच्या राणीला मानवंदना देण्याची पद्धत आहे. हि मानवंदना ब्रिटनचे सैनिक देत असतात. पारंपारिक पद्धतीने देण्यात येणाऱ्या या मानवंदनेत भारतीय वंशाचा शिख व्यक्ती चरनप्रित लाल देखील सहभागी झाला होता. विशेष म्हणजे चरनलाल ब्रिटनच्या पारंपारिक वेशभुषेत नाही तर आपल्या धर्माच्या पगडीत सहभागी झाला होता. 

प्रथा, परंपरा आणि प्रतिष्ठा.

राणीच्या वाढदिवसाला मानवंदना देण्याची प्रथा ब्रिटनमध्ये गेल्या २५० वर्षांपासून आहे. या सोहळ्यात ब्रिटनचे सुरक्षारक्षक सहभागी होत असतात. हे सुरक्षारक्षक ब्रिटनच्या सैन्यासाठी असणारा पारंपारिक पोशाख घालून सहभागी होतात. लाल रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट आणि त्यावरती अस्वलाच्या केसांपासून बनलेली फरची टोपी असा एकंदरीत पोशाख असतो. आजतागायत या पोशाखमध्ये फक्त एका सैनिकासाठी बदलण्याचा प्रकार ब्रिटनच्या प्रशासनाकडून कधीच झाला नव्हता. 

चरनलाल या शिख सैन्यासाठी प्रशासनाने त्याला पगडी घालून येण्याची परवागनी दिली. हिच पगडी घालून तो या सोहळ्यासाठी उपस्थित राहीला होता. 

याबद्दल २२ वर्ष वय असणारा चरनलाल सांगतो की, या सोहळ्यासाठी मला माझ्या धर्माच्या पोशाखात उपस्थित राहिलेल पाहून इतर धर्माचे लोकं देखील ब्रिटनच्या सैन्यात दाखल होण्यास प्रेरित होतील. इतिहासात होणारे या बदल नक्कीच आनंद देणारे ठरतील. 

Leave A Reply

Your email address will not be published.