ही आहेत छत्रपती शिवरायांची १५ दुर्मिळ चित्रे, जी जगभरातल्या वस्तुसंग्रहालयात जतन केली आहेत.

छत्रपती शिवरायांचे खरे चित्र कोणते? ते कसे दिसत होते? कोणत्या पद्धतीचे कपडे परिधान करत होते? अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. जगभरातल्या वेगवेगळ्या वस्तुसंग्रहलायत असणाऱ्या शिवरायांच्या चित्रांचा संदर्भ देवून आपणाला वेगवेगळी चित्रे दाखवली जातात बऱ्याचदा हे चित्र आणि माहिती चुकीची असण्याची शक्यता असते. बोलभि़डू वाचकांनी आम्हाला छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे आणि माहिती देत आहोत.

आपणाला अधिक संदर्भ माहित असल्यास आपण अवश्य ती माहिती कमेंटमध्ये लिहावी. अधिकची माहिती व संदर्भ आम्ही मुळ लेखासोबत जोडून घेवू. 

1) छत्रपती शिवरायांचे हे चित्र फ्रांस्वा वॅंलेंटिन या डच अधिकाऱ्याच्या संग्रहात असल्याची माहिती मिळते. इस १७८२ मध्ये हे चित्र प्रसिद्ध करण्यात आले असले तरी ते यापुर्वीचे म्हणजेच १७१२ च्या पुर्वी रेखाटण्यात आल्याचे सांगण्यात येते. या चित्रावर den heer seva Gi असे लिहण्यात आले आहे. den heer याचा अर्थ सैन्य असा होतो. तर त्यापुढे शिवाजी असा उल्लेख आहे.

twitter


 

2) हे चित्र लंडन येथील बॉनहॅन्स कलेक्शन येथे आहे. चित्रातील शैली किशनगड येथील चित्रशाळेतील आहे. किशनगडचे महाराज सावंतसिंग यांच्या दरबारातील चित्रकार निहालचंद यांनी हे चित्र काढल्याचा अंदाज लावण्यात येतो. या चित्रात महाराजांनी एका हातात दख्खनी धोप तलवार तर दूसऱ्या हातात पट्टा घेतलेला दाखवण्यात आला आहे.

 Screenshot 2020 02 01 at 11.30.16 AM


 

3) सध्या छत्रपती शिवरायांचे हे चित्र बंडोदा संस्थानच्या संग्रहालयात आहे. राजपूत-मुघल शैलीत हे चित्र असल्याचे अभ्यासक सांगतात. १८ व्या शतकात हे चित्र काढण्यात आले असून यामध्ये महाराजांच्या एका हातात फुल तर दूसऱ्या हातात पट्टा आहे.

Screenshot 2020 02 01 at 11.36.17 AM


 

4) १७८२ साली प्रसिद्ध झालेल्या रॉबर्ट आर्म ह्यांच्या ‘historical fragments’ ह्या पुस्तकात शिवरायांच हे चित्र छापण्यात आले होते.

Screenshot 2020 02 01 at 11.54.47 AM


 

5) १६७५ नंतरच्या काळात हे चित्र गोवळकोंडा येथे काढण्यात आल्याचे संदर्भ मिळतात. सध्या हे चित्र मुंबईच्या छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयात असून प्रवेशद्वारावर या चित्राची मोठ्ठी प्रतिकृती लावण्यात आलेली आहे. वास्तविक मुळ चित्र आकाराने प्रवेशद्वारावर असणाऱ्या प्रतिमेहून लहान आहे.

Screenshot 2020 02 01 at 11.57.21 AM


 

6) हॉलंड येथील रिक्स म्युझियम येथील संग्रहालयात शिवाजी महाराजांचे हे चित्र आहे. इसवी सन १६८० मध्ये हे चित्र रेखाटल्याची नोंद इथे करण्यात आली आहे. या चित्राच्या खाली Sivagi असे लिहण्यात आले आहे.

 Screenshot 2020 02 01 at 12.01.41 PM


 

7) स्मिथ लेसोफ कलेक्शन या फ्रान्सच्या संग्रहालयात हे चित्र असून हे सतराव्या शतकात काढल्याची नोंद आहे.

 Screenshot 2020 02 01 at 12.10.26 PM


 

8) जर्मनी येथील बर्लिन स्टेट लायब्ररी मध्ये हे चित्र ठेवलेले आहे. ‘Siuwagie gewerzere maratise vorst’   असे या चित्रावर लिहिलेले असून ह्याचा अर्थ ‘मराठ्यांचा राजा’ असा होतो. हे चित्र १७ व्या शतकाच्या दरम्यान काढलेले असून, ते भारतातून हॉलंड नंतर जर्मनी मध्ये नेण्यात आल्याचं सांगण्यात येत.

Screenshot 2020 02 01 at 12.13.50 PM


 

9) हे चित्र देखील हॉलंडच्या रिक्स म्युझियमध्ये आहे. १६७५-१६८५ असा ह्या चित्राचा कालखंड मानला जातो. ह्या चित्रावर ‘Siwagii prince in decam’ असे लिहलेले आहे.

Screenshot 2020 02 01 at 12.20.08 PM


 

१०) छत्रपती शिवरायांचा संपुर्ण चेहरा दिसणारे हे चित्र फ्रान्समधील गिने संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. फ्रान्समधील पॅरिसच्या गिमे संग्रहालयात हे चित्र आपणास पहायला मिळू शकते.

Screenshot 2020 02 01 at 12.25.10 PM


 

११) छत्रपती शिवरायांचे हे चित्र आपण बऱ्याचदा पाहीले असेल. सध्या हे चित्र लंडनच्या ‘Potraits of Indian princes’ ह्या चित्रसंग्रहात ठेवण्यात आले आहे. हे चित्र गोवळकोंडा येथे काढलेले असून त्याचा काळ १६८०-१६८७ असा नोंदवला आहे.

Screenshot 2020 02 01 at 12.29.03 PM


 

१२) जयपूरच्या पोथीखान्यात हे चित्र असून ते १८ व्या शतकातील आहे. अंबर घराण्याचा व्ययक्तिक दप्तर म्हणून जयपूरचा पोथीखाना ओळखला जातो. इतर चित्रांच्या तुलनेत हे चित्र वेगळ्या धाटणीचे आहे.

 Screenshot 2020 02 01 at 12.33.56 PM


 

१३) ऑटोनं झेनेटी यांनी निकोलस मनुची यांच्यासाठी हे चित्र काढण्यात आल्याचं सांगितलं जात. मूळ चित्र copper engraved असून त्यावर रंगकाम केलेले आहे.

Screenshot 2020 02 01 at 12.40.05 PM


 

१४) मीर महमंद याने १६७२ मध्ये हे चित्र काढले. पुरंदर तहाच्या वेळी मनूची आणि शिवरायांची भेट झाल्याची नोंद आहे. मीर महमंद याने निकोलस मनुची यांच्या सांगण्यावरून हे चित्र काढले होते. हे चित्र सध्या पॅरिसच्या संग्रहालयात आहे.

Screenshot 2020 02 01 at 12.44.40 PM


 

१५) तंजावरचे महाराज सरफोजीराजे भोसले यांच्या संग्रहात हे चित्र असून त्यांनी हे चित्र काढून घेतल्याचे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे बंधु संभाजी महाराज बसलेले असून त्यांच्या समोर शहाजी महाराज बसलेले असल्याचे हे चित्र आहे.

Screenshot 2020 02 01 at 12.50.21 PM

Leave A Reply

Your email address will not be published.