रक्तरंजित क्रांती करणारा ‘चे गवेरा’ पहिल्याच भेटीत भारताच्या प्रेमात पडला होता.

दूर दक्षिण अमेरिका खंडात एक क्रांतिकारक होऊन गेला. त्याच आयुष्य म्हणजे एक धगधगत क्रांतीपर्व होतं. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही प्रस्थापितांच्या विरोधात कोणी बंड करणार असेल तर त्याला आदर्श मानतात. त्याचे फोटो टीशर्टवर क्रांतीचा सिम्बॉल म्हणून वापरले जातात. त्याला जाऊन पन्नास वर्ष झाली पण त्याची क्रेझ कमी झाली नाही उलट वाढतचं आहे.

त्याचे नाव “डॉ. अर्नेस्टो चे गवेरा”

त्याकाळात हे लॅटिन अमेरिकन नावाने ओळखले जाणारे देश गरिबीने पिचलेले होते. शेजारीचं असलेल्या अमेरिकेसारख्या मोठ्या भांडवलशाही महासत्तेच्च्या सावलीखाली या देशांच्या विकासाची गाडी एकाच जागी अडकून पडली होती. उलट अमेरिकेने त्या त्या देशातल्या भ्रष्टाचारी सरकारांना हाताशी धरून नववसाहतवाद जन्माला घातला होता.

लॅटिन अमेरिकन तरुणांनाच्यात यामुळे राग होता. क्युबामध्ये फिडेल कस्ट्रो, अर्जेन्टीनामध्ये जन्मलेला चे गवेरा अशा तरुण क्रांतिकारकांनी हुकुमशाही सरकार विरुद्ध सशस्त्र क्रांती सुरु केली. गनिमी काव्याने सुरु केलेली ही लढाई अनेक वर्ष चालली. त्यात त्यांना अनेकदा हार मिळाली, हजारो सहकारी मारले गेले. पण चिकाटी न सोडता त्यांनी लढा दिला. अखेर क्युबाला त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलेच.

१६ फेब्रुवारी १९५९ रोजी फिडेल कॅस्ट्रोच्या नेतृत्वाखाली समाजवादी मार्क्सवादी विचारांचे सरकार स्थापन झाले.

भयंकर रक्तपाताच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या या सरकारला जगाच्या पटलावर मान्यता मिळवून देणे ही महत्वाची गोष्ट होती. फिडेलने ही जबाबदारी शिक्षणाने डॉक्टर असलेल्या चे गवेरावर सोपवली. हातातली बंदुक ठेऊन देऊन चे गवेरा क्युबाचा राजदूत बनून जगभर फिरू लागला.

त्याचा पहिलाच दौरा होता आफ्रिका आणि आशिया खंड. त्यातही सगळ्यात महत्वाची भेट होती तिसऱ्या जगाच नेतृत्व करत असलेल्या नेहरूंचा भारत !!

che gu 20

पाच जणांनाच शिष्टमंडळ घेऊन चे गवेरा ३० जून १९५९ रोजी दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरला. तो क्युबन सरकारमध्ये अधिकृत पदावर नव्हता यामुळे त्याच्या स्वागताला मंत्रीमंडळातील कोणी जाण्याऐवजी डी.एस.खोसला या राजशिष्टाचार अधिकाऱ्याला पाठवण्यात आलं. त्याला चाणक्यपुरीमध्ये नुकताच बनवलेल्या अशोका हॉटेल मध्ये उतरवण्यात आलं.

भारताचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंशी चे गवेराची भेट दुसऱ्या दिवशी झाली. त्या दिवशी जेवणासाठी त्यांनी चे ला पंतप्रधान निवासात बोलावलं. नेहरू म्हणजे गांधीवादी अहिंसात्मक लढयाने स्वातंत्र्य मिळालेल्या भारताचे वृद्ध पंतप्रधान तर चे गवेरा म्हणजे रक्तरंजित साम्यवादी क्रांती करणारा तरुण लॅटीन अमेरिकन क्रांतिकारक. दोघे दोन ध्रुवावरील व्यक्तिमत्व. पण तरी चे ला नेहरूंनी भारावून टाकलं. तो आपल्या आठवणीत सांगतो की

“त्या दिवशी जेवणाच्या टेबलावर नेहरू, त्यांची मुलगी इंदिरा आणि दोन नातू राजीव संजय हे देखील होते. आमच्याशी नेहरू खूप आपुलकीने बोलले. त्यांच्या वागण्यातून एखाद्या आजोबाची माया जाणवून येत होती. त्यांना क्युबाच्या समर्पण आणि संघर्षाबद्दल आदर होता. आम्ही दाखवलेल्या साहस आणि त्यागाबद्दल त्यांच्या मनात कौतुकाचीच भावना होती.”

भारताला स्वातंत्र्य मिळवून काहीच वर्षे झाली होती. राष्ट्राला स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी अनेक कामे चाललेली होती. नेहरूंनी क्युबन शिष्टमंडळाला त्याकामांना भेट देण्याचा सल्ला दिला. पुढच्या दिवशी चे गवेरा आणि त्याचे साथीदार यांनी कॉटेज इंडस्ट्रीज एम्पोरियम आणि ओखला इंडस्ट्रियल एरियाला भेट दिली. तिथे त्यांनी पहिल्यांदा लेथ मशीन पाहिली.

त्यांनी संरक्षण मंत्री व्हीके कृष्ण मेनन, वरिष्ठ संरक्षण अधिकारी आणि नियोजन आयोगाच्या सदस्यांना भेटले. चे ग्वेरा यांनी कृषी संशोधन संस्था आणि नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी येथे शास्त्रज्ञांशी संवाद साधला, तेथे त्यांनी प्रथमच मेटल डिटेक्टर पाहिला.

नेहरूंच्या सल्ल्याचे शब्द महत्त्वपूर्ण होते कबूल करताना चे ग्वेरा यांनी त्यांच्या अहवालात असे लिहिले की भारत दौऱ्यामध्ये त्यांनी त्यांना शिकवले की वास्तविक प्रगती आर्थिक प्रगती आणि तांत्रिक प्रगतीसह येऊ शकते. त्यांनी असेही म्हटले की तांत्रिक आणि आर्थिक प्रगतीसाठी औषधे, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि कृषी क्षेत्रात संशोधन करणे ही अत्यंत आवश्यक आहे.

TH22 OPED CHENEHRU
आपल्या भेटीत नेहरुंना खास क्युबन सिगारचा बॉक्स भेट देताना चे गवेरा

त्यानंतर चे गवेराचे शिष्टमंडळ कोलकात्याला गेले.

तिथे गेल्यावर चे ची भेट कृष्णा नामक व्यक्तीशी झाली. या कृष्णाने त्यांच्यावर बराच प्रभाव पाडला. त्याच्या मते कृष्णाकडे परमाणु शस्त्रांकडून जगाच्या अस्तित्वासाठी असलेल्या धोक्याचे उत्तर होते. हा कृष्णा म्हणजे नेमका कोण याबद्दल अजूनही वाद आहेत. काही जण म्हणतात चे ची भेट जेष्ठ विचारवंत जे.कृष्णमूर्तीशी झाली असावी. पण याबद्दल निश्चित खात्रीलायक माहिती मिळत नाही.

क्युबाला परत जाण्यापूर्वी चे गवेरानी सतरा देशांना भेट दिली. परत गेल्यावर त्यांनी भारताच्या भेटीविषयी सविस्तर अहवाल लिहिला. त्यात तिथल्या प्रगती विषयी परखड विवेचन केले. भारताच्या प्रचंड मोठा इतिहास असलेल्या विविधतेने नटलेल्या देशामध्ये क्रांती सहजासहजी होणार नाही, तिथे गांधीजींच्या विचारानेचं पुढे जावे लागणार हे ही त्याने मान्य केले होते.

चे गवेराने त्यांनतर झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये देखील परत कृष्णा यांची अनेक वाक्ये ऐकवली. एकंदरीत भारत दौऱ्याने त्याच्यावर खूप मोठा प्रभाव टाकला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.