दारू पिण्यापुर्वी चिअर्स म्हणण्यामागे खूप मोठ्ठा इतिहास आहे.

ह्या दारूड्यांच्या लय प्रथा आणि परंपरा असतात. बर या प्रथा जन्म का घेत असाव्यात असा डिपमध्ये जावून विचार केल्यावर उत्तर मिळतं ते म्हणजे,

काय नाय दारू चढली की कोणतर शास्त्र असतं ते म्हणून पुडी सोडतो मग ऐकाकडून दूसरा आणि दुसऱ्याकडून तिसरा हि प्रथा अत्यंत भक्तीभावाने पुढे घेवून जातो.

मग हाच आपला नियम म्हणून तळीराम पंथाकडून प्रत्येक प्रकरण कंटिन्यू केलं जातं. उदाहरण द्यायच झालं तर गोल्डन पेग. आत्ता हा काय मॅटर असतो तर बाटलीतली दारू संपली की, बाटली उलटी करुन ठेवायची. मग शेवटचे दोन चार थेंब टोपणात गोळा होतात. अत्यंत भक्तिभावाने चार थेंब दोघाचौंघात वाटून पिले जातात. मग तत्पुर्वी दोन चार क्वार्टर का पिलेल्या असतो पण हे शेवटचे चार थेंब वाटून घेतले तरच दोस्ती पक्की होते म्हणे. तर असच काय काय चालू असतं. 

झालं अस की शनिवारची रात्र बघून, त्यात मान्सुनपुर्व पावसाचा अंदाज घेवून आज बऱ्यापैकी निम्याजणांना हुक्की आली असणार. मग दारूबद्दलचा विषय आमच्या एका भिडूने काढला. बोलता बोलता एकजण म्हणला पण हे चिअर्स का म्हणत असतील. आत्ता बोलभिडूचं झालय अस की कुठलापण विषय निघाला की डिप थिंकींग करायचं. मग शोधाशोध सुरू केली. चिअर्सच्या पाठीमागं कायतर कारण पाहीजेच. झी टिव्हीवरची अस्मिता म्हणायची शोधलं की सापडतच. आम्हाला पण अस्मिताचा अनुभव आला.आम्ही शोधलं आणि चिअर्स पाठीमागच कारण घावलं. 

जे घावलं ते अत्यंत भक्तिभावाने तुमच्या समोर सादर करत आहोत. गर्दी न करतात, रांगेत य़ेवून हा लेख वाचून काढा, कारण चिअर्सच्या पाठिमागचं कारण चार क्वाटर झाल्या तरी विचार करायला लावणार आहे. 

अलेक्सण्डेर दुमास या लेखकाच्या कादंबरीत एका प्राचीन प्रथेचा उल्लेख आहे, 

पूर्वीच्या काळात यूरोपातुन जगभरातून आलेले खलाशी एकत्र प्यायला बसायचे मात्र यांना एकमेकांवर काडीभर पण विश्वास नसायचा मातीपासून किंवा लाकडापासून बनलेले ग्लास ते एकमेकांवर जोरात आदळायचे असे की आपल्या ग्लास मधील थोडी मदिरा समोरचे च्या ग्लास मध्ये पडेल आणि समजा दगा फटका करण्याच्या उद्देशाने विष  मिसळले असेल तर दोघंही मरतील. जो होगा वो सबका होगा म्हणून चिअर्स करायचे. 

जगभरात, मद्यपान करताना टोस्ट करण ही अशी काहीतरी गोष्ट आहे. 

याला नेदरलँडमध्ये ‘प्रोओस्ट’ म्हणतात, चेक लोक ‘ना झड्रावी’ म्हणतात, फ्रान्समध्ये हे नाव ‘सांटे’ आहे, इटालियन  ‘सिने सिने’ म्हणतात. तिथेच इंग्रजी ‘चीअर’ – याचा अर्थ असा आहे की ‘चांगला आनंद घ्या’  असे म्हटले आहे.

पण लोक याला टोस्ट म्हणत असतील बर? तिथं  ब्रेड नाही. आणि त्याला भाजायच टोस्टर नाही.

टोस्ट हा एक विधी आहे ज्यामध्ये पेय सद्भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून घेतल जात. टोस्ट हा शब्द त्या व्यक्तीला सन्मानित करण्यासाठी केला जातो अशाप्रकारे, एखादी व्यक्ती “संध्याकाळचा टोस्ट” असू शकते.

येथे वर्णन केलेल्या टोस्टचे मूळ पश्चिमी संस्कृतीत आहे, परंतु जगभरात  लोकांच्या त्यांच्या संस्कृतींमध्ये अशा अनेक परंपरा आहेत ज्यामध्ये दारू पिण्याची गोष्ट उत्सव आणि सन्मानाने जोडलेली आहे.

टोस्ट ची मौखिक परंपरा सुद्धा खूप मोठी आहे त्यातली एक गोष्ट अशी की,

एलिझाबेथच्या काळात वाइनची गुणवत्ता इतकी खराब होती की, वाईन चवदार करण्यासाठी त्यामध्ये थोडासा टोस्ट टाकत असत.

मेंटल फ्लोस्स च्या मते, टोस्टिंगची परंपरा प्राचीन ग्रीक आणि रोमन लोकांपासून झाली होती ज्यांनी औपचारिक भोजनाच्या वेळी देवतांना पूर्वजांना दारू चढवली जात असे आणि तेथे उपस्थित लोक मृतांची आठवण काढत आणि चांगल्या आरोग्याबद्दल प्रार्थना करत. 

थोडक्यात काय तर एकत्रित या आनंद साजरा करा. आपण जस जेवतापुर्वी वदनीकवलघेता म्हणतो. तसचहे चिअर्स असतय. हा करा सुरवात इतकाच त्याचा अर्थ. पण सुरू करण्यापाठीमागे ठिकठिकाणी वेगवेगळे लॉजीक आहेत. असो आपलं काय जातय. काम आवरली असतील तर गाठा अड्डा लय लोड घेवू नका. 

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.