चित्ता, बिबट्या ते वाघ, सिंह सेव्हन बिग कॅट्समध्ये मोठा फरक आहे

मागच्या वर्षी १७ सप्टेंबरला नरेंद्र मोदी यांनी आपला ७२वा वाढदिवस नेहमीप्रमाणे लक्षात राहील असा साजरा केला होता. या वाढदिवसाला मोदींनी आठ चित्यांना मध्यप्रदेशातील कुनो-पालनपूर अभयारण्यात सोडलं होतं.
आज आणखी १२ चित्ते हे साऊथ आफ्रिकेतून भारतात आणण्यात आलेत. मध्यप्रदेशातल्या कुनो इथेच हे चित्ते ठेवण्यात येणार आहेत.
पण आरे कॉलनीत पुन्हा बिबट्या दिसल्या, चंद्रपूरमध्ये नरभक्षक वाघाचा वावर, गुजरातमध्ये सिंहांच्या संख्येत पुन्हा वाढ अशा बातम्या ऐकायची आपल्याला सवय आहे. आता हे चित्ता, वाघ, बिबट्या, सिंह यांच्यातला नेमका फरक बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही.

त्यामुळे वाघ, सिंह, बिबट्या, जॅग्वार,स्नो लेपर्ड म्हणजेच हिम बिबट्या,प्युमा आणि चित्ता या बिग सेव्हन कॅटस् नेमका कोणता फरक आहे ते तर बघू.

तर पहिले गोष्ट म्हणजे हे सगळे प्राणी आहेत मार्जार कुळातील. मार्जार कूळ हे घरगुती मांजर व त्या सदृश दिसणाऱ्या प्राण्यांचे जैविक कुळ आहे. घरगुती मांजरापासून ते वाघ सिंहासारख्या मोठ्या शिकारी प्राण्यापर्यंत आपल्याला दिसण्यात, शिकार करण्यात अनेक समानता सापडतात.

या मार्जार कुळात दोन प्रमुख सबफॅमिली आहेत त्या म्हणजे पँथेरा आणि फेलिने. वाघ, सिंह, बिबट्या, जॅग्वार,स्नो लेपर्ड हे पँथेरा कॅटेगरीत येतात तर प्युमा आणि चित्ता हे फेलीन वर्गात. पँथेरा आणि फेलिने या दोन कॅटॅगरीतला प्रमुख फरक म्हणजे पँथेरा कॅटेगरीतली जनावरं डरकाळी फोडू शकतात तर फेलीन कॅटॅगरीतले प्राणी गुरगुरतात. भारतात चित्ते आल्यानंतर काही मीडिया कॅमेरे चित्याच्या डरकाळीची वाट बघत होते मात्र चित्ता मात्र हळूच थोडा गुरगुरला ते याच कारणामुळं.

आता एक एक करून या ७ बिग कॅट्सची माहिती बघू. सुरवात करू पँथेरा सबफॅमिलीपासून.

वाघ 

बिग कॅट्समधील सगळ्यात मोठा प्राणी आहे तो म्हणजे वाघ. एका पूर्ण वाढ झालेल्या सायबेरियन नराचे वजन ३०० किलोंपर्यंत असू शकतंय. मात्र सगळ्यात मोठी असलेली ही प्रजाती सर्वात धोक्यात असलेली प्रजाती देखील आहे.

640px Walking tiger female

WWF म्हणजेच वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडच्या मते आज जगात अंदाजे 3,900 जंगली वाघ शिल्लक आहेत.  

सायबेरियापासून सुमात्रापर्यंत पसरलेल्या वाघांची सगळ्यात जास्त संख्या भारतात आहे. भारतात २९६३ वाघ असल्याचं सांगितलं जातं. भारतातील वाघांची उपप्रजाती बंगाल वाघ म्हणून ओळखली जाते. देशभर पसरलेल्या ५३ टायगर रिझर्व्हमध्ये आपल्याला वाघ पाहता येतात. 

वाघाला ओळखण्याची सगळ्यात सोपी खून म्हणजे त्याच्या अंगावर असणाऱ्या काळ्या, तपकिरी पट्या.  काळ्या आणि तपकीरी पट्यांची वाघाला झाडं आणि गवतामध्ये लपून बसून शिकार करण्यास मदत होते. सिंहसारखं ग्रुपमधे किंवा चित्यासारखी वेगात शिकार करण्याची क्षमता नसलेला वाघ एकटा शिकार करतो. 

 सिंह 

पँथेरा सबफॅमिलीमधला अजून एक शक्तिशाली प्राणी म्हणजे सिंह. या सगळ्या बिग कट्समध्ये सर्वात सामाजिक प्राणी म्हणून सिंहाकडे पाहिलं जातं. कारण सिंह हे समूहात राहतात आणि समूहातच शिकार देखील करतात. 

Lion waiting in Namibia

सिंहाच्या प्रामुख्याने दोन प्रजाती आहेत एक म्हणजे आफ्रिकन आणि दुसरी एशियन. एशियन प्रजातीचे सिंह फक्त भारतातच सापडतात. भारतातही केवळ गुजरातमधील गिर अभयारण्यातच हे सिंह सापडतात.  

गुजरात राज्याच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये ६७४ असलेली सिंहांची संख्या २०२२ मध्ये ७५० पर्यंत गेली आहे.

या अभयारण्यात सिंहांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त असल्याने त्यांना इतर ठिकाणी हल्वावण्याची मागणी होत असते मात्र गुजरात सरकार सिंहांना राज्यबाहेर सिंह देण्यास फारसं उत्साही नसल्याचा आरोप वन्यजीव कार्यकर्ते करतात.

जॅग्वार 

आपल्यातल्या अनेकांना जॅग्वार म्हटल्यावर गाड्या आठवत असतील कारण जॅग्वार भारतात सापडत नसल्याने आपल्याकडे तेवढी या प्राण्याची चर्चा होत नाही. मात्र अमेरिका खंडात जॅग्वार हा मार्जार कुळातील सगळ्यात शक्तिशाली प्राणी आहे. जॅग्वारचं सर्वात महत्वाचं वैशिष्ठ म्हणजे त्याची जबड्यांची ताकद. 

Standing jaguar

वाघ आणि सिंहापेक्षाही शक्तिशाली चावा घेणारा जॅग्वार दातांनी जनावराची खोपडी फोडू शकतो. 

सध्या ५० टक्के जॅग्वार ब्राझीलमध्ये ऍमेझॉनच्या जंगलात सापडतात. पण जॅग्वार पाहल्यास तुम्ही बिबट्या असल्याची गफलत करू शकताय. तर बघितल्या बघितल्या दोघात फरक ओळखायचा असेल तर हे लक्षात ठेवायचं की जॅग्वार बिबट्यापेक्षा थोडा मोठा असतोय आणि त्याची शेपटी बिबट्यापेक्षा लहान असते. 

मात्र दोघांमधला सगळ्यात मोठा फरक म्हणजे अंगावर असलेला ठिपक्यांचा पॅटर्न ज्यांना रोझेट पॅटर्न देखील म्हणतात. जॅग्वारच्या अंगावरचे रोझेट्स हे तुलनेने मोठे असतात आणि त्याच्या रोझेट्सच्या आतमध्ये पुन्हा ठिपके असतात.

बिबटे

या बिग कॅट्समधील भारतात सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारा प्राणी म्हणजे बिबट्या. भारतात सुमारे १४ ते १५ हजार बिबट्या असल्याचं सांगण्यात येतं. कर्नाटक आणि मध्यप्रदेश महाराष्ट्रात सर्वाधिक बिबटे सापडतात आणि त्यांची संख्या ११००-१२०० च्या घरात असल्याचं कळतं.

012 Canadian PM Justin Trudeau visit AKshardham Gandhinagar 12

फॅमिलीतले इतर प्राणी झपाट्याने संपत असताना बिबट्यांचा तुलनेनं मोठ्या प्रमाणात सापडण्याचा कारण सांगितलं जातं ते म्हणजे बिबट्यांची परिस्तिथीशी जुळवून घेण्याची क्षमता.

त्यामुळे जंगलं, झाडं नष्ट होत असताना कधी उसाच्या फडात तर कधी वैरणीत देखील बिबट्या सापडल्याचं आपण बघतो.आफ्रिकेतल्या काही जमाती तर बिबट्याला सिंहापेक्षा देखील चांगला शिकारी असल्याचं मानतात. 

अजून एक गोष्ट अधून मधून जे भारतात ब्लॅक पॅन्थर सापडल्याच्या बातम्या येत असतात ते सुद्धा बिबट्याचा आहेत. अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या या केसमध्ये काही वेळा मेलॅनिन मेलॅनिन हे पिगमेंट जास्त झाल्यामुळे काही बिबटे पूर्णपणे काळे दिसतात त्यांना ब्लॅक पॅन्थर म्हणण्यात येतं. भारतात कर्नाटकातील कबिनीच्या जंगलात ब्लॅक पँथर असल्याचे फगोटोग्राफ मध्यंतरी बाहेर आले होते.

स्नो लेपर्ड म्हणजेच हिमबिबट्या 

नावावरूनच लक्षात येत की हिमबिबटे बर्फाळ प्रदेशात सापडणारे बिबटे आहेत. भारतात हिमालयाच्या उंच डोंगररांगात हे बिबटे सापडतात. अत्यंत लाजूळ प्राणी त्यात दुर्गम भागात वावर यामुळे हिमबिबटे फार कमी प्रमाणात नजरेस पडतात. भारतात हिमबिबट्यांची संख्या केवळ ३०० ते ४००च्या घरात असल्याचं कळतं.

 

shiv

३० ते ४० किलो पर्यंत वजन असणाऱ्या या बिबट्यांच्या अंगावर  राखाडी रंगाची दाट फार असते. यामुळे दोन गोष्टी होतात. एकतर त्यांना थंडीत शरीर गरम ठेवण्यास मदत होते आणि दुसरं म्हणजे राखाडी रंगामुळे बर्फच्छादित आणि खडकाळ डोंगर कड्यांवर कॅमॉफ्लज होण्यास म्हणजेच भोवतालच्या रंगांत लपून बसण्यास मदत मिळते.

आता वळूया फेलीन सब फॅमिलीकडे. ज्यामध्ये प्युमा आणि चित्ता हे प्राणी येतात. फेलीन सब फॅमिलीमध्ये सुद्धा दोन प्रमुख जिनस आहेत. त्यामध्ये असिनोनिक्स कॅटॅगरीमध्ये चित्ता येतो तर प्युमा जिनसमध्ये कुगर हा प्राणी  

चित्ता

या बिग कॅट्समध्ये भारतात सगळ्यात जास्त चर्चत आहे तो म्हणजे चित्ता. चित्याचं सर्वात मोठं वैशिष्ठ सांगितलं जातं ते म्हणजे त्याचं स्पीड. जमिनीवरील सर्वात वेगवान सस्तन प्राणी चित्ता ओळखला जातो तो त्याच्या 3 सेकंदात १०० किलोमीटर पर हावर जाण्याच्या कौशल्यामुळं: जे अजून कुठल्या स्पोर्ट्स कारला देखील जमत नाही.चित्याच्या सध्या आशियाई आणि आफ्रिकन या दोनच प्रजाती अस्तित्वात आहेत. 

आशियाई चित्ते इराणमधील डोंगराळ भागांपुरतेच मर्यादित राहिले आहेत. त्यांची संख्या १०० च्या आसपास असल्याचं सांगण्यात येतं.

chita

मात्र त्याचवेळी आफ्रिकन चित्यांची संख्या १०,००० च्या आसपास असल्याची माहिती दिली जाते. भारतात नामिबियातून आणलेला आठ चित्ते हे आफ्रिकन प्रजातीचेच आहेत.आफ्रिकन आणि एशियन चित्त्यांमधील प्रमुख फरक सांगायच्या झाल्यास आफ्रिकन चित्ते हे आकाराने आशियायी चित्यांपेक्षा मोठे आणि लांबट असतात. 

भारतात मोठ्या प्रमाणात सापडणाऱ्या बिबट्यांपेक्षा चित्ते बऱ्यापैकी वेगळे दिसतात. 

तरी फरक करायचा म्हटल्यास हे काही फरक लक्षात येतील. बिबट्याच्या शरीरावरचे ठिपके गोलाकार आकाराचे आणि एकत्र असतात  दिसायला थोडे पोकळ असतात पण एकसारखे नसतात. याउलट चित्त्याचे ठिपके हे काळे, स्पष्ट, गडद आणि इतर ठिपक्यांपासून जास्त दुर असतात.

बिबट्याची शेपटी नळीच्या आकारासारखी असते आणि झाडावर चढताना ती समतोल राखण्याच्या कामी येते. तर चित्याची शेपूट चपटी असते सुपरफास्ट पडण्यासाठी चित्याला या आकाराच्या शेपटीचा फायदा होतो. अजून एक म्हणजे बिबटे झाडा झुडपात राहणे पसंत करतात तर चित्यांचा वेग दिसतो तो गवताळ कुरणात.

प्युमा किंवा कुगर 

प्युमा हे जिनस म्हणजे एक वर्ग आणि त्यावर्गातील कुगर हा एक प्राणी असं शास्त्रीयदृष्टा क्लासिफिकेशन केलं जात असलं तरी प्युमा या नावानेच आपल्याला हा प्राणी लक्षात येतो. प्युमा प्रामुख्याने अमेरिका खंडात सापडतो. प्युमा बऱ्यापैकी डोंगराळ भागात राहतो त्यामुळे अमेरिकेत याला माऊंटेन लायन देखील म्हटलं जातं. प्युमाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या पाळीव मांजरांच्या ही सगळ्यात जवळची स्पेसीज आहे. आज वन्यावस्थेत जवळपास ५०,००० प्युमा असल्याचं सांगितलं जातं.

 

puma

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

  

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.