मोबाईल बॅटरी शोधणाऱ्यांच चार्जिंग अजून उतरलेलं नाही.

हजारो वर्षापूर्वी अश्मयुगीन माणसाला आग पेटवण्याचा शोध लागला. त्याला माहित नव्हत की हा शोध पुढ काय काय आग पेटवणार आहे. येणाऱ्या लाखो पिढ्यांवर त्याने उपकार करून ठेवले. कालचं तीन जणांना केमेस्ट्रीचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. त्यांच्या शोधाचे आपल्यावर एवढे उपकार आहेत की त्याची तुलना आधुनिक काळातल्या आगीच्या शोधाशी करता येईल.

या शोधाच नाव आहे लिथियम आयन बॅटरी !!

जॉन गुडइनफ, स्टॅनले विटींगहॅम आणि आकिरा योशिनो या तिघांना या शोधाचे पालकत्व जाते. तुम्ही म्हणालं साधी बॅटरीच की मग या शोधलातुम्ही म्हणाल की साधी बॅटरी तर आहे. पण भिडू साधी म्हणण्याची चूक करू नका.

एकेकाळी ट्रिंग ट्रिंग वाजणाऱ्या डब्बा फोनला यांच्याच शोधामुळे मोबाईल बनवलं. कम्प्युटरला लॅपटॉप बनवण्याच श्रेय सुद्धा याचं बॅटरीला जाते. आता रस्त्यात दिसू लागलेल्या इलेक्ट्रिक कार पासून ते अंतराळवीरांचा आसरा असणाऱ्या स्पेस स्टेशन पर्यंत प्रत्येक गोष्टीचा जीव याच लिथियम आयन बॅटरीमध्ये आहे. खर सांगायचं झालं तर एकविसाव्या शतकातील नव्वद टक्के जनता याच लिथियम बॅटरीच्या जोरावर धावत आहे.

कसा लागला या बॅटरीचा शोध?

जगातल्या पहिल्या रिचार्जेबल बॅटरीचा शोध १८५९ साली लागला. लीड अॅसिडपासून बनलेल्या या बॅटरीज आजही आपल्या पेट्रोल डीझेल वाल्या गाड्यांमध्ये दिसतात. एवढी वर्ष चालली म्हणजे याबॅटरी भारीच होत्या यात शंका नाही. पण त्या खूप मोठ्या आणि बल्की होत्या. त्याच्या वापराला मर्यादा होत्या. पुढे पन्नास वर्षात निकेल कॅडमियम बॅटरीचा शोध लागला. त्या बॅटरीज छोट्या होत्या पण कार्यक्षम नव्हत्या. 

मग त्यानंतर बरीच वर्ष एक शिथिलता आली होती. बॅटरीमध्ये काही नवीन शोध लागत नव्हते. मग १९७३ साली झाली अरब देशातली तेलक्रांती. तिथल्या देशांनी आपल्या तेल विकण्यावरच्या पाश्चात्य देशांच्या मोनोपोली घरचा रस्ता दाखवला. पेट्रोलच्या किंमती वाढू लागल्या.

अमेरिकेच्या लक्षात आलं की हा पेट्रोलचा कारभार आपल्या जास्त वर्ष पुरणारा नाही. याला पर्याय शोधला पाहिजे. आपल्या सगळ्या संशोधकांना कामाला लावल.

कमीतकमी जागेत जास्तीत जास्त एनर्जी स्टोअर करता यावी आणि त्यावर गाड्यासुद्धा पळवता याव्या यासाठी प्रयत्न सुरु झाले. विटींगहॅम यांना पहिल्यांदा जाणवल की अनोड म्हणून लिथियम वापरल तर ते जास्त प्रभावी ठरेल. कारण लिथियम इलेक्ट्रॉन सहज प्रसारित करतो शिवाय तो अतिशय हलका धातू आहे. मग त्यांनी त्यावर संशोधन करून एक बॅटरी बनवली.

पण ही बॅटरी काही परिपूर्ण नव्हती. ती जास्त वेळ चार्जिंग केल्यावर जळायची. कधी कधी तिचा स्फोटदेखील व्हायचा. मग तेव्हा ऑक्सफर्डमध्ये शिकवत असलेल्या डॉ.गुडइनफ यांनी त्याला पर्याय सुचवला की या बॅटरीमध्ये लिथियमबरोबर जर कॅथोड म्हणून टायटॅनियम डायसल्फाईडच्या ऐवजी कोबाल्ट डायसल्फाईड वापरल तर हा प्रॉब्लेम येणार नाही.

मग आले जपानचे आकिरा योशिनो  त्यांनी हा सगळा रिसर्च एकत्र केला, त्याचे प्रकटीकल इम्प्लीमेंटेशन केलं आणि पहिली वर्किंग लिथियम आयन बॅटरी बनवली. वर्ष होतं १९८५.

पुढे काहीच वर्षांनी जपानच्याच सोनी कंपनीने या बॅटरी विकायला बाजारात आणल्या. तिथून क्रांती झाली. या बॅटरीवर वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये त्याचा वापर सुरु झाला. वर सांगितल्या प्रमाणे मोबाईलपासून ते स्पेसशिप पर्यंत हीच बॅटरी आहे.

त्यांनी जेव्हा या बॅटरीचा शोध लावला तेव्हा त्यांना स्वप्नात देखील मोबाईल माहिती नव्हता. आज चाळीस वर्षे झाली याच टेक्नोलॉजीवर जग चालल आहे.

आज ही लिथियम आयनबॅटरी आपला श्वास बनली आहे. तीच चार्जिंग नसेल तर आपला श्वास अडकतो. माणूस सैरभैर होतो.

असं नाही की या बॅटरीला कधी प्रोब्लेम आले नाही. सॅमसंगच्या गलक्सी नोट ७मोबाईलच्या बटरीचे स्फोट झाले. हे फोन परत मागवून घेण्यात आले. तेव्हा लिथियम आयनला पर्याय शोधा अशी मागणी जोर धरली.  पण आजही लिथियम आयन बॅटरीचा दरारा कमी झालेला नाही. आणि भविष्यातही पर्यावरण टिकवायचं असेल तर जास्तीतजास्त या बटरीचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही.

हा शोध लावणारे तिघेही संशोधक आता जख्ख म्हातारे झालेत. जॉन गुडइनफ तर चक्क ९७ वर्षाचे आहेत. त्यांना नोबेल मिळवणाऱ्या सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचा मान मिळालाय. पण त्यांची बटरी अजूनही उतरली नाही. आजही टेक्सास विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत बॅटरीवर नवनवीन प्रयोग करत असलेले दिसतात. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.