एका नेत्याचं एन्काऊंटर झालं तर मुख्यमंत्र्यावर जीवघेणा हल्ला, मेघालयात चाललंय काय ?

मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्यावर रविवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्ब ने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आलीय. संगमा यांच्या घरावर काही अज्ञात लोकांनी पेट्रोल बॉम्ब फेकला आणि पळून गेले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर हल्ला होणे हि काय साधी सुधी घटना नाही. हा हल्ला होण्याला मेघालयातील सद्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती कारणीभूत ठरतेय.

त्याचं झालं असं कि, मेघालयाचे माजी विद्रोही नेते चेरिशस्टरफिल्ड थांगख्यू यांचे एन्काऊंटर करण्यात आले होते. या घटनेनंतर मेघालयात सद्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत.

थोडक्यात चेरिशस्टरफिल्ड थांगख्यू यांच्या मृत्यूचे पडसाद म्हणजे ह्या घडामोडी आहेत. मेघालयात हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. त्यात राजकीय उलाथापालथी घडत आहेत. परिस्थिती चिघळत असल्यामुळे राज्याचे गृहमंत्री लखन रिंबुई यांनी सरकारकडे, “कायद्याच्या विरोधात जाऊन चेस्टरफिल्ड यांना मारण्यात आलं”, म्हणत राजीनामा सोपवला आहे.

थांगख्यू याचं एन्काऊंटर बेकायदेशीर पद्धतीनं करण्यात आलं आता गृहमंत्र्यानेच केल्यामुळे राजकीय गदारोळ माजणार हे तर नक्की होतं. पण या निमित्ताने आता प्रश्न पडतो म्हणजे इतक्या मोठ्या हिंसाचाराला कारणीभूत ठरलेला थांगख्यू हे नेमके कोण आहेत ?

चेरिशस्टरफिल्ड थांगख्यू कोण आहे ?

चेरिशस्टरफिल्ड थांगख्यू हा एकेकाळचा उग्रवादी आणि जहालमतवादी नेता आहे. 

५४ वर्षीय चेरिशस्टरफिल्ड थांगख्यू हा ‘हाइनिवट्रेप नॅशनल लिबरेशन काउंसिल’ या संघटनेचा माजी  महासचिव होता. त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. पण २०१८ मध्ये जहालमतवादी थांगख्यूने उपमुख्यमंत्री प्रेस्टोन त्यसोंग यांच्या आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. मात्र मेघालायाम्ध्ये झालेल्या आयईडी स्फोटाचा मुख्य सूत्रधार थांगख्यू असल्याचं पोलिसांनी दावा केला आणि तसा पुरावा देखील त्यांना मिळाला होता.

एन्काऊंटर कि हत्या ?

राज्यात नुकत्याच झालेल्या आयईडी हल्ल्यांच्या संदर्भात शिलाँग पोलिसांच्या पथकाने थांगख्यूच्या  किन्टन मसार निवासस्थानावर छापा टाकला. या स्फोट प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली होती. यातील दोन जणांनी थांगख्यू हाच या स्फोटांचा मास्टरमाईंड असल्याचं सांगितलं होतं. याच दरम्यान थांगख्यू यांचं एन्काऊन्टर करण्यात आले अशी माहिती समोर आली.

पोलिसांच्या सांगण्यानुसार,थांगख्यू याने कारवाई दरम्यान पोलिसांच्या टीमवर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. आणि याच गोळीबारात थांगख्यू याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याला हॉस्पिटल ला नेण्यात आले, पण तोपर्यंतचा त्याचा मृत्यू झाला.

पण काही नेत्त्यांच्या म्हणण्यानुसार थांगख्यू यांची हत्या केल्याचा आरोप होत आहे.  त्यामुळेच राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झालीय.

‘हाइनिवट्रेप नॅशनल लिबरेशन काउंसिल नेमकी काय आहे’ ?

मेघालयमधील पहिली जहालमतवादी आदिवासी संघटना म्हणून ओळखली जाते ते ‘हाइनीट्रॅप अचिक लिबरेशन काऊंसिल’ (HALC) या संघटनेला. पण कालांतराने या संघटनेचं विभाजन झालं. आणि त्यातून ‘हाइनिवट्रेप नॅशनल लिबरेशन काउंसिल’ ही संघटना नावारुपाला आली.

या संघटनेची स्थापना १९८७ मध्ये झाली होती असं म्हणलं जातं. हि जहालमतवादी संघटना ‘खासी जैंतिया’ नावाच्या आदिवासी जमातींच्या न्याय व हक्कांसाठी लढते असा दावा केला जातो. तसेच इतर राज्यांतून आलेल्या लोकांच्या विरोधात या संघटनेची भुमिक असते.

या नव्याने समोर आलेल्या संघटनेचे नागालँडच्या नक्षलवादी संघटना ‘नॅशनल सोशलिस्ट काऊंसिल ऑफ नागालँड’ आणि त्रिपुरातील संघटना ‘नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा’ या संघटनेशी संपर्क होते.

थांगख्यू हा या संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैंकीच एक होता. त्याच्या व्यतिरिक्त इतर संस्थापक असलेले ज्युलियस डोरफँग, कमांडर इन चीफ बॉबी मरवीन हे अत्यंत धोकादायक नक्षलवादी समजले जात होते. परंतु ज्युलियस डोरफँग याने २००७ मध्ये तर थांगख्यूनं २०१८ मध्ये सरेंडर केलेलं होतं.

मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या निवासस्थानावर हल्ला झाला त्यामुळे आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून जिकडेतिकडे तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून शिलाँगमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर तेथील जवळच्या चार जिल्ह्यांत मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.