छत्तीसगडच्या बारक्याने गायलेले ‘बचपन का प्यार’ जगात फेमस झालंय…पण हे गाणं आलं कुठून ?
‘जाने मेरी जानेमन, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे,जस्सा मेरा प्यार है, प्यार मैने किया है , काय मग भिडू हे गाणं ऐकून तुलाही ‘बचपन का प्यार’ आठवलं असेलच …
एक बारकासा पोरगा एक गाणं काय म्हणतो आणि अख्या मोठ-मोठाल्या सिंगर्स पासून ते सामान्य सोशल मिडिया युजर्सपर्यंत सर्वांनाच त्यांच्या बालपणीच्या प्रेमाची आठवण करून देत वेड लावतोय. बॉलिवूड स्टार्सपासून ते सोशल मिडिया युजर्सपर्यंत सर्वच जन या गाण्यावर रील्सचे व्हिडिओ बनवत आहेत. कदाचित तुम्ही देखील यावर रील बनवलं असणारे..
आता सहदेव नावाच्या मुलाबद्दल बोलूया ज्याच्या व्हिडिओ मुळे हे गाणे देशभरात फेमस झाले.
बारक्या पोराने ज्याने हे गाणं गायलं अन अक्ख्या सोशल मीडियावर गोंधळ घातला आहे, त्याचं नाव आहे सहदेव !
सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे गाणं ज्या सहदेव ने गायलं आहे, तो सहदेव आपल्या छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील छिंदगड गावातला आहे. सहदेव च्या घरी मोबाइल किंवा टीव्ही नाहीये. वडील गुड्डे राम दिरदो हे साधारण शेतकरी आहेत. सहदेवाला ४ बहिणी आणि २ भाऊ आहेत.
सहदेवच्या आईचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले.
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये सहदेव पाचवीत शिकत असताना त्याच्या मॅडमने त्याला गाणे गाण्यास सांगितले. जेव्हा सहदेवने गाणे सुरू केले, तेव्हा मॅडमने ते गाणे रेकॉर्ड केले आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून दिला.
वाऱ्यासारखे हे गाणे सगळीकडे फेमस झाले त्यात त्यानंतर रॅपर बादशहाने या गाण्यावर इंस्टाग्रामवर एक रील बनवलं आणि मग सगळेच या गाण्यावर रील्स बनवायला लागले. बादशहाने सहदेवचा शोध घेतला आणि त्याच्याशी व्हिडिओ कॉल केला.
बादशहाने सहदेवला ‘माझ्याबरोबर एक गाणे गा’ म्हणून ऑफर दिली यावर सहदेव इतका खुश झाला कि त्याने लग्गेच हि ऑफर स्वीकारली. बादशहाने सहदेव ला चंदीगडला बोलावले आहे. सहदेव लवकरच आपल्या कुटुंबासोबत चंदीगडला पोचणार आहे. लवकरच सहदेव आणि बादशाह यांचे गाणे आपल्याला दिसेल
सहदेवचा तो व्हिडिओ इतका लोकप्रिय झाला आहे की राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सहदेवची भेट घेतलीये. त्यांनी त्याचे गाणे ऐकले आणि त्याचं खूप कौतुक हि केलं.
पण तुम्हाला माहित आहे का हे ‘जाने मेरी जानमन’ हे गाणं आलं कुठून ?
सहदेव ने गायलेलं गाणं कालपरवाचं नाही तर दोन वर्षांपूर्वीचं आहे. हे ओरीजनल गाणं आहे गुजरात मधल्या एका कमलेश बरोट नावाच्या गायकाचं.
२०१८ मध्ये गुजरातमधील आदिवासी लोकगायक कमलेश बरोट यांनी ‘जाने मेरी जानेमन’ या गाण्याची रचना केली होती. कमलेश या गाण्याचे एकमेव गायक आहेत. हे गाणं लिहिलंय पी.पी. बारी यांनी तर संगीत मयूर नादिया यांनी.
हे गाणे लोकप्रिय झाले आणि बरीच पत्रकार मंडळी कमलेशला भेटण्यासाठी आणि त्याला बोलण्यासाठी गुजरातला पोहोचली तेंव्हा कळलं कि,
२०१८ मध्येच हे गाणे तयार केले होते आणि २०१९ मध्ये त्याच्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केले. आतापर्यंतह्या गाण्यामुळे युट्यूबवर ४.४ मिलियन पेक्षा जास्त व्हीव्स मिळवले आहेत.
अनेक सिंगर आणि रॅपर्स या गाण्याचा वापर करून युट्युब वर लाखो व्हीव्स मिळवत आहेत तर याबाबतीत त्म्हला तुम्हाला काहीच अडचण नाही का विचारल्यावर त्यांनी सांगितलं कि, अहमदाबाद येथील मेशवा फिल्म्स नावाच्या कंपनीने त्यांच्याकडून या गाण्याचे सर्व हक्क विकत घेतले होते.
हे हि वाच भिडू :
- चार्ली आणि हॅरीचा हा व्हायरल व्हिडीओ साडे पाच कोटींना विकला गेलाय
- चौथीच्या मुलाने वडिलांच्या पश्चात वडिलांवर लिहलेला निंबध व्हायरल झालाय कारण..
- आमच्या मित्रांनी असाच एक व्हिडीओ व्हायरल केलेला, उमेदवार पडला पण त्यांना अजून लाज वाटते.