या जमातीत वधू वरांची कम्पॅटीबिलिटी चेक करण्यासाठी प्री-मॅरेज सेक्सची प्रथा आहे
भारतात महिलांना एका बाजूला देवी म्हणून पूजल जातं तर दुसऱ्या बाजूला त्याच महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. थोड्याफार फरकानं भारतात सगळ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे.
पण भारतात खूप घनदाट जंगलात असं पण एक गाव आहे, जे आपल्याला भारताच्या विरुद्ध अशी परिस्थिती दाखवत. तिथला समाज इतका प्रोग्रेसिव्ह आहे की तिथल्या महिलांना त्यांच्या समाजाचे नियमच सुरक्षित ठेवतात.
आणि ही गोष्ट आहे छत्तीसगड मधल्या शृंग माडिया जमातीची. तसे तर गोंड जातीची उपजमातच आहे. या जातीत एक ही सेक्स क्राईम घडत नाही. त्यांना विचारलं की असं कसं ? तेव्हा ते सांगतात आमच्या जमातीच्या प्रथांमुळेच अस घडत नाही.
बस्तर हा तसा आदिवासी बहुल जिल्हा. हा जिल्हा भारताचं ट्राईब हार्टलॅन्ड म्हणून ओळखलं जातं. भारतीय आदिवासी कला आणि संस्कृतीच हे केंद्र आहे. जगातलं सगळ्यात जुन आदिवासी कल्चर या जिल्हयाला लाभलंय. आणि शृंग माडिया जमातीच्या लोकांचं हे घर आहे.
या शृंग माडिया जमातीत एक प्रथा आहे, त्याच नाव आहे घोटूल. ही प्रथा त्या जमातीला त्यांचं युनिक ट्रॅडिशन जपायला मदत करते. यात सेक्सविषयीच एज्युकेशन, फिजिकल एज्युकेशन, सेक्स विषयी अवेरनेस अशा गोष्टींचा समावेश आहे.
आता काय प्रथा आहे जी या जमातीला प्रोग्रेसिव्ह बनवते ?
तर ज्या जमातीत एक सेक्स कस्टम आहे. म्हणजे प्रथा ज्यात लग्नाआधीच सेक्स केलं जातं.
माडियांत विवाहासाठी आपला जोडीदार निवडायचा असेल तर युवागृहांचा उपयोग होतो. त्याच युवागृहास घोटुल म्हणतात. बस्तरच्या या गोंडामध्ये युवागृहात अविवाहित मुले व मुली जोडीने सारी रात्र एकत्र घालवीतात. जेणेकरून मुलं मुली एकमेकांसोबत कम्फर्टेबल होतील. इथं रात्र घालवणाऱ्या मुलीस मोतीआरी व मुलास चेलिक म्हणतात. घोटुलच्या प्रमुखास सरदार म्हणतात.
या समाजात विवाहपूर्व प्रेमसंबंध समाजमान्य आहेत.
एकदा का तुमचा विवाह झाला की त्या घोटुलचे सदस्यत्व संपत. म्हणजे या प्रथेचा तुम्हाला लाभ घेता येत नाही. आता लग्नाआधी सेक्स केलं तर लिंगो पेन देवतेमुळे मोतीआरीस गर्भ राहत नाही, असा त्या जमातीचा समज आहे.
या घोटुलमध्ये मुलांना लैंगिक शिक्षणाशिवाय जमातीच्या आर्थिक, सामाजिक व धार्मिक अंगांचेही शिक्षण दिल जात. घोटुलचे तरुण सदस्य जमातीची सर्व काम एकजुटीने करतात. नवीन शिक्षणपद्धती घोटुलच्या माध्यमातून या जमातीवर बिंबविल्यास ती लवकर आत्मसात केली जाईल, असा एक दृष्टिकोन आहे. चंद्रपूरच्या माडियांत अजूनही रोज सायंकाळी मुले व मुली एकत्र नृत्य करतात. ढोलाच्या तालावर सणावारी किंवा अतिथीसमोर नृत्य करतात. घोटुलचा उपयोग अतिथिगृह म्हणूनही करण्यात येतो.
या जमातीत स्त्रियांना समानतेची वागणूक मिळते.
या जमातीची कुटुंब पितृसत्ताक आहेत. आते-मामे-भावंड-विवाहांस प्राधान्य दिले जात. बहुपत्नीविवाह संमती इथं आहे. परंतु वधूमूल्य द्यावे लागते. विनिमय-विवाह, सेवा-विवाह व सहपलायन-विवाह समाजमान्य आहेत. विधवाविवाह, देवरविवाह व घटस्फोट यांसही या समाजात मान्यता आहे.
म्हणजे थोडक्यात इथं वधू वरांची कम्पॅटीबिलिटी चेक करूनच दोघांच्या संमतीने विवाहास मान्यता मिळते.
गोटूल म्हणजे गावातील न्यायनिवाड़ा करण्याचा मुख्य गोड़ी माड़िया लोकांचा मुख्य कार्यालयच म्हणा ना, गावातील प्रमुख न्यायनिवादयाच काम करतो तय न्यायच पालन सर्व गवकारी करतात ,सुगिच पहिल्या हंगामत 8 ते 15 दिवस व हंगाम संपे पर्यन्त एक प्रकारचा नाच केला जातो त्याला रेला म्हणतात ह्या रेला त गावातील तरुण मुले मूली सहभगी होतात, ह्या दरम्यान एखाद्या मुलाल एखादी मूलगी आवडली व मुलीला मुलगा आवडले तर ते एकमेकना पसंद करुण मुलीच्या घरी मुलगा मुलीच्या घरी घऱ धगल्या म्हणुन जातो मुलीच्या घरातील सर्व काम शेत कामा पासून ते घर काम पर्यन्त मुलीच्या घरची कामें करावी लागतात ,हयात उद्देश्य एकच असतो की मुलीच्या सामभाल करण्याचा योग्य आहे की नाही,एकदा मुलीच्या घरच्यान खात्री पटली की आपल्या मुलीच्या नवरा होण्यास योग्य आहे तर गोंड व माड़िया रीति नुसार त्याच लग्न करुण देतात पन शेवटचा निर्णय है मुलीचच असते,