म्हणून शिकागो रेडिओ हा भारताच्या इतिहासातला माईलस्टोन आहे…

रेडिओ हा जुन्या पिढीच्या लोकांच्या मूलभूत गरजांपैकी एक होता. जगात दररोज काय घडतंय याची घरबसल्या इत्यंभूत माहिती रेडिओ पुरवत असे. म्हणजे आजही रेडिओ आपल्याला बरच काही सांगु पाहत असतो पण इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर काही ॲप आपल्याला रेडिओ काय ऐकू देत नाही.

तसं पाहिलं तर रेडियोला आज भयानक व्यावसायिक स्वरूप आलेलं आहे पूर्वी थोड्क्यात सगळा कार्यक्रम आटोपला जायचा. मीलवर असणाऱ्या कामगार लोकांना बर वाटावं म्हणून लागणारी लोकगीते, रात्री बिनाका गीतमाला, सकाळी भक्तिगीते असा सगळा माहोल असायचा. स्वातंत्र्य मिळवायच्या काळात रेडिओने महत्वाची भूमिका बजावली होती.

जर कधी तूम्ही जुने महात्मा गांधीजींच्या किंवा त्याकाळातील कुठल्याही मोठ्या नेत्यांची भाषणे पहा त्यांच्या समोर असलेल्या माईकला शिकागो रेडिओचा लोगो तुम्हाला दिसला असेल पण जर डीप मध्ये हा रेडिओ ईतिहास पाहिला तर हा शिकागो रेडिओ माईलस्टोन म्हणून ओळखला जातो. पण तो रेडिओ नावाने जरी असला तो एक मायक्रोफोनचा प्रकार होता आणि हा माईक पूढे बराच काळ गाजला. 

महात्मा गांधी स्वातंत्र्य मिळवायच्या काळात विविध ठिकाणी भाषणे द्यायचे आणि त्यांचं भाषण ऐकायला त्यांना पाहायला दुरून दुरून लोकं यायचे. आता इतकी गर्दी व्हायची की बापूंचा आवाज लोकांना ऐकूच जायचा नाही. त्यावेळी महात्मा गांधीजींच्या सोबत एक कार्यकर्ते होते नानिक मोटवानी त्यांना काय हा प्रकार सहन व्हायचा नाही. मोटवानी यांचं मत होतं की,

लोकांनी बापूंना कान देऊन ऐकावं, एकवेळ बापू दिसले नाही तरी चालतील पण त्यांच्या भाषणामुळे लोकं पेटून उठतील आणि ब्रिटिशांना देश सोडावा लागेल. आधीच गांधीजींचा आवाज बारीक म्हणून काहीतरी यावर तोडगा काढण्याच मोटवानी यांनी ठरवलं.

1929 साली कराचीमध्ये काँग्रेसच अधिवेशन होतं तेव्हा तिथे मोटवानी हे साऊंड सिस्टीम सोबत तयारीने आले होते. अजुनही एका फोटोत नाणिक मोटवानी हे बापूंना आपल्या मायक्रोफोन ब्रँडचं नाव शिकागो रेडिओ दाखवत आहेत. पुढें हाच शिकागो रेडिओ भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाचा दुवा ठरला जो महत्वाच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवत होता.

जिथं जिथं मोठ्या नेत्यांची सभा असायची तिथं तिथं नानिक् मोटवानी यांची शिकागो रेडिओची मांदियाळी असायची. या रेडिओला तेव्हा व्हॉईस ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जायचं आणि आजही त्याच मानाने या रेडियोकडे पाहिलं जातं.

ज्यावेळी मोटवानी परिवार मुंबईत आला तेव्हा आपल्या ब्रँडच नाव विदेशी ठेवून त्यांनी कहर केला होता. पण शिकागो रेडिओ हे एका परदेशी ब्रांडच नाव होतं आणि तो ब्रॅण्ड काही दिवसात बंद होणार होता म्हणून नानीक मोटवानी यांनी त्या ब्रँडच्या मालकाची परवानगी घेऊन ते नाव विकत घेतलं आणि नविन सुरवात केली.

तेव्हा मोटवानी जरा अपडेटेड विचारांचे होते कारण जर इंग्लिश ब्रँडच नाव ठेवलं तर लोकं जास्त आकर्षित होतात म्हणून त्यांनी तेव्हाच याला सुरवात केली होती. अगोदर नानीक मोटवानी हे अँप्लीफायर, लाऊड स्पीकर आणि मायक्रोफोनचे व्यापारी होते.

ब्रिटन आणि अमेरिकेतून ह्या मालांची आयात व्हायची त्यातूनच हे नाव नानीक मोटवानी यांना सुचलं. जिथं जिथं सभा असेल तिथं तिथं मोटवानी यांची माईक सिस्टीम दिमतीला हजर असायची. एक दिवस अगोदरच मोटवानी ही सगळी तयारी करायचे. एका वेळी दहा हजार लोकांपर्यंत आवाज शिकागो रेडिओ पोहोचवायचा. पोलिसांकडून आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून फुल प्रोटेक्शन या साऊंड सिस्टीमला मिळायचं. रॅली, सभा अशा हजार गोष्टींमुळे शिकागो रेडिओचे देशभरात शंभर लाऊड स्पीकर होते.

मोटवानी यांनी आणलेल्या शिकागो रेडिओ सिस्टीमचे पंडित नेहरू सुद्धा फॅन होते. वेळोवेळी त्यांनी खर्चसुद्धा उचलला होता. शिकागो रेडिओने स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचं योगदान दिलेलं आहे याबद्दल काय वादच नाही कारण जुन्या फोटोत सगळीकडे भाषणात फक्तं आणि फक्तं शीकागो रेडिओच दिसून येतो. 

काही काळानंतर जेव्हा इंदिरा गांधींनी शिकागो रेडिओ हे परदेशी नाव चेंज करायला सांगितल तेव्हा मोटवानी यांनी उत्तर दिलं होतं की, आम्ही मोटवानी आडनाव एका बाजुला लावतो आणि शिकागो रेडिओ एका बाजूला लावतो. त्यात बदल होऊ शकत नाही. 

आजच्या काळात हा रेडिओ म्युट झाला असला तरी एके काळी शिकागो रेडिओचा एकट्याचा भारत भरात बोलबाला होता हेही तितकंच खरं…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.