चिदंबरम यांनी मोदींना हरवण्यासाठी प्लॅन बनवलाय. ” वन टू वन विरोधी उमेदवार “
गेल्या शुक्रवारी म्हणजे २० ऑगस्टला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली १९ विरोधी पक्षांची व्हर्च्युअल बैठक झाली. त्याला ज्येष्ठ विरोधी पक्षनेते उपस्थित होते. या बैठकीत पेगासस, शेतकरी आंदोलन यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा झाली. दरम्यान बैठकीत सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे ‘अँटी-बीजेपी”.
या बैठकीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष भाजपविरोधात एकत्र निवडणूक लढण्यावर असल्याचं म्हंटल जातंय.
तसं पाहायचं झालं, तर याआधीही विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकी झाल्यात. या बैठकीत भाजप विरोधी अजेंड्यावर चर्चा झाल्या. ज्यात मोजक्याच पक्षांचे नेतेमंडळी होते. पण, त्यांनतर हालचाली फार कमी दिसून आल्या. म्हणजे नुसती चर्चा झाली दोन दिवस गवगवा झाला आणि तिसऱ्या दिवशी परीस्थिती जशीच्या तशीच…
मात्र, यांनतर काँग्रेस अध्यक्षांच्या बऱ्याच विरोधी पक्षांच्या नेत्यांशी वैयक्तिक बैठकीचं सत्र सुरु झालं. ज्यात त्या राज्यानं संबंधीच्या, तिथल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. दरम्यान एकमधून एक होणाऱ्या या बैठकांच्या साखळीनंतरच भाजप विरोधात डाळ शिजत असल्याचा बातम्या माध्यमांत झळकायला लागल्या.
त्यात, गेल्या शुक्रवारी सोनिया गांधी यांनी घेतल्या बैठकीत विरोधी पक्षांचे नेते आणि विरोधी पक्षाचे राज्य असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री होते. ज्यात कांग्रेस, टीएमसी, द्रमुक, एनसीपी, शिवसेना, झारखंड मुक्ति मोर्चा, माकपा, भाकपा, नेशनल कांफ्रेंस, राजद, एआईयूडीएफ, विदुथलाई चिरुथाईगल कताची, लोकतांत्रिक जनता दल, जेडीएस, आरएलडी, आरएसपी, केरल कांग्रेस एम, पीडीपी आणि आईयूएमएल या पक्षांचा सहभाग होता.
दरम्यान या बैठकीत संयुक्त निवेदनात २० ते ३० सप्टेंबर दरम्यान विविध मागण्यांसाठी देशभरात निदर्शने करण्याची घोषणा करण्यात आलीये.
या बैठकीत सगळे विरोधी पक्ष मेन मुद्द्यावर आले, तो म्हणजे भाजप विरोधी सरकार. ज्यानंतर विरोधी पक्षांची २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचा गाजावाजा सुरु आहे. आता या चर्चेला माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दुजोरा दिलाय.
एक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पी. चिदंबरम यांनी सांगितलं कि,
“जर विरोधी पक्षांची एकजूट कायम राहिली, तर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कमीतकमी ४०० जागांवर भाजपविरोधात एक संयुक्त विरोधी उमेदवार उभा केला जाऊ शकतो.
चिदंबरम म्हणाले की, “विरोधी पक्षाचे सर्व मोठे नेते देशाची परिस्थिती, हिसकावून घेणाऱ्या जाणाऱ्या स्वातंत्र्यामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधकांकडून एकत्रितपणे ४०० जागा लढवल्या जातील याची शक्यता आहे. उर्वरित जागांवर TRS, BJD सारखे पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत पण ते भाजपाच्या विरोधात लढतील.”
चिदंबरम म्हंटले कि, विरोधक पक्ष एकत्र निवडणूक लढवत नाहीत असे म्हणणे चुकीचे ठरेल. येत्या २० सप्टेंबर रोजी देशव्यापी निदर्शने होतील, यात तुम्हाला विरोधीही पक्षाची एकजूट पाहायला मिळेलच. तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळला गेला तर याची मोठी चर्चा तर आहेच. पण खरी मोहीम पाच राज्यांच्या निवडणुकांच्या वेळी सुरू होईल. निवडणुकीच्या वेळी, मुद्द्यांवर खूप वादविवाद होतात आणि सरकारला उत्तर द्यावे लागेल.”
चिदंबरम म्हणाले, “विरोधी एकजूट प्रत्येक जागेवर भाजपच्या विरोधात एका उमेदवारामध्ये बदलावी लागेल, येत्या राज्याच्या निवडणुकीत विरोधी पक्षाने संयुक्त उमेदवार उभे केल्यास परिणाम मनोरंजक असतील.”
पी. चिदंबरम यांच्यासोबत काँग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील म्हंटल की, यात शंका नाही कि आम्ही भविष्यातील निवडणुका एकत्र लढू.
खर्गे म्हणाले कि, ‘आमचा अजेंडा मुद्दे मांडणे होता. केवळ काँग्रेस पक्षच नाही, तर १५ विरोधी पक्षांनी मूलभूत हक्क, अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य वाचवण्यासाठी अधिवेशनाचे प्राधान्यक्रम ठरवले. संसदेत आम्ही सर्वांना बरोबर घेतले. सर्व पक्षांनी सहकार्य केले. आमचा पक्ष पुढे येईल यात काही शंका नाही आणि विरोधी पक्षांमध्ये ही एकता निर्माण करण्यासाठी काँग्रेसचा नक्कीच पाठींबा असेल. राहुल गांधी पुढे येत आहेत आणि नेत्यांशी वैयक्तिकरित्या बोलत आहेत. आम्ही एकजूट राहू आणि भविष्यातील निवडणुका इतर पक्षांसोबत एकत्र लढू यात शंका नाही.’
आता चिदंबरम आणि खर्गे यांचं म्हणणं विचारात घेतलं तर गेल्या निवडणुकीत बऱ्याच जागांवर तिरंगी लढत पाहायला मिळाली. ज्यामुळे मतांचं विभाजन झालं होत. आता जर चिदंबरम यांच्या म्हणण्यानुसार विरोधी पक्षांनी संगनमताने मिळून निवडणूक लढवल्या तर नक्कीच वेगळा निकाल पहायला मिळू शकत असं बोललं जातंय.
हे ही वाचं भिडू :
- बी टीम म्हणून हेटाळणी केली आणि आता काँग्रेस वंचितला हात पुढे करतेय. कसा झाला हा बदल?
- बी टीम वगैरे सोडा. एमआयएमला बिहारचं राजकारण जमलं शिवसेनेला जमल नाही इतकचं..
- विलासराव देशमुखांनी १० आमदारांची भेट दिली म्हणूनच युतीचं सरकार स्थापन झालं होतं ?