इंग्रजांना आपल्या प्रदेशाची आठवण करून देणाऱ्या चिखलदऱ्यात मोठं स्कायवॉक उभारलं जातंय

मित्र म्हणाला अरे आमचा पश्चिम महाराष्ट्र बघ, फिरायला कसल्या भारी जागा आहेत. त्यात लोणावळा, खंडाळा, माथेरान महाबळेश्वर, पाचगणी सारख्या लय जागा आहेत. मला म्हणाला १० मिनिटे घे आणि विचार करून सांग की, विदर्भात फिरायला जाण्यासाठीची एक तरी पश्चिम महाराष्ट्र्राच्या तोडीचं पर्यटन स्थळ आहे का ????

विचार केल्यावर आठवलं की, विदर्भातील चिखलदरा हे पर्यटन स्थळ या सगळ्यांच्या तोडीचं आहे. इथल्या वातावरणाची भुरळ इंग्रजांना सुद्धा पडली होती. त्याचा इतिहास पण तेवढाच भारी आहे. त्यापूर्वी एक ताजी बातमी सांगून जातो. 

इंग्रजांना आपल्या मातीची आठवण करून देणाऱ्या चिखलदऱ्यात जगातील सर्वात मोठे स्कायवॉक निर्माण होत आहे. 

अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथे जगातील सर्वात मोठा स्कायवॉक निर्माण होत आहे. चिखलदऱ्याच्या या स्कायवॉकचं बांधकाम सुरू असतानाच केंद्र सरकारच्या पातळीवर काही अडथळे आले होते. 

याबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी  बैठक घेऊन यावर चर्चा केली होती. आता का प्रकल्पाला केंद्र सरकारची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे स्कायवॉक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

स्वीझरलँड आणि चीन या ठिकाणी स्कायवॉक आहे. स्वीझरलँडचा स्कायवॉक ३९७ मीटर लांबीचा आहे. चीनचा स्कायवॉक ३६० मीटर लांबीचा आहे. चिखलदरा येथे तयार होणारा प्रस्तावित स्कायवॉक ४०७ मीटरचा आहे. याचा अर्थ हे जगातील सर्वात लांब स्कायवॉक असणार आहे.

अमरावतीचे पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “केंद्र सरकारच्या परवानगीने चिखलदरा येथील स्काय वॉकचे अडथळे दूर झाले आहेत.”

अमरावतीत स्कायवॉक निर्माण करणं या जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा पर्यटनाचा भाग आहे. चिखलदऱ्याचा हा स्कायवॉक पूर्ण झाल्यानंतर अनेक पर्यटकांची अमरावतीकडे वळतील असं दिसतंय. 

तर पाहुयात इंग्रजांना भुरळ घालणाऱ्या चिखलदऱ्याचा इतिहास

असं सांगण्यात येते की, सन १८२३  मध्ये हैदराबाद रेजिमेंटच्या कॅप्टन रॉबिन्सनने चिखलदराचा शोध लावला. इंग्रजांना ते विशेष आकर्षण वाटले कारण तेथील हिरव्या रंगाची छटा त्यांना आपल्या देशाची आठवण करून देते होता. जेव्हा सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये चिखलदऱ्यात पानझडी झाली होती तेव्हा कॅप्टन रॉबिन्सनला जास्तच भावले. तसेच त्याला हे पानझडी पाहून इंग्लंडमधील शरद ऋतूची आठवण येत असे. या जागेचा उपयोग ब्रिटीशांनी कॉफी गार्डन आणि आरोग्याशी संबंधित गोष्टी विकसित करण्यासाठी केला होता.  

चिखलदराचा ब्रिटीश कमांडर शेख मेहताब हा चिखलदराचा जमीनदार होता. आदिवासींना घरे बांधण्यासाठी त्यांनी विनामूल्य जमीन वाटप केली होती. ब्रिटीश कमांडर शेख मेहताब याने अनेक वर्ष चिखलदरावर राज्य केले होते.

पण हे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण असून येथे कॉफीची मळे देखील आहेत…इथे येणारे पर्यटक तर याची तुलना काश्मीर सोबत करत असतात. पावसाळयात पर्यटनासाठी इथे परराज्यातून येत असतात.

निसर्गरम्य ठिकाणे 

तसेच चिखलदऱ्याला पौराणिक महत्त्व असल्याचे सांगण्यात येत. द्वापार युगात पांडवांनी वनवासात काही काळ इथे घालवला असे म्हणतात. महाभारतातील कीचक नावाच्या पात्राने द्रौपदीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा संतप्त झालेल्या भीमाने तिची हत्या करून त्याला चिखलदऱ्याच्या घाटात फेकून दिले असल्याचा पौराणिक कथात उल्लेख आहे.

भीमकुंड व्यतिरिक्त येथे पंचबोल आणि देवी पॉईंटसुद्धा तुम्हाला दिसतो. पंचबोल पॉईंट डोंगराळ दृश्यांसाठी प्रसिध्द आहे. जिथे कॉफी लागवड करण्यात आली असून ते पाहायला खूप भारी वाटत. याशिवाय इथल्या पाच डोंगर आणि घसरत जाणारा धबधबा आपणासही दिसतो. जवळील देवी कुंड आपल्या पाण्याच्या सुंदर प्रवाहांसाठी परिचित आहे. जेथे स्थानिक लोकांच्या देवीचे मंदिर देखील आहे. पावसाळ्याच्या ठिकाणी या ठिकाणचे सौंदर्य पाहण्यासारखे आहेत. 

तर मग जाणार कि नाय चिखदऱ्याला ??? जा जा…. अन जगातल्या सगळ्यात मोठ्या स्कायवॉक वर वॉक करण्याचा अनुभव घ्या….अन आम्हालाही सांगा कस वाटलं ते…

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.