चिखलकाल्याची झिंग पाहीजे असेल, तर गोव्याची गाडी पकडा !

गोव्यातला पाऊस आणि पावसातला गोवा आणि तेथील सण, या गोष्टीमधील खरं सौंदर्य सतत फिरतीवर असणाऱ्या हौशी माणसालाच कळतं. कारण पावसाळ्यात गोव्यात साजरे केल्या जाणाऱ्या सणांची मजा आणि ते एन्जॉय करण्याची गोवेकरांची दिलखुलास स्टाईलही जरा हटकेच असते. 

एरव्ही भात-माशांवर ताव मारून फेनीचा पेग रिचवून दुपारची शांत झोप घेणे पसंत करणारे सुशेगाद गोवेकर चिखलकाला सणाला मात्र सर्व विसरून बेभानपणे चिखलात लोळतात, खेळतात, उड्या मारतात आणि विठ्ठलनामाचा गजर करतात.

दरवर्षी पावसाळ्यात आषाढी एकादशीनंतर पणजीपासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या माशेल नावाच्या गावात हा सण साजरा होतो. श्रीकृष्ण सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जे खेळ खेळायचा ते खेळ यादिवशी माशेलमधील देवकिकृष्ण मंदिराच्या पटांगणावर चक्क चिखलात खेळले जातात.

FEST2
lokaso.in

सुमारे चारशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा या खेळाला आहे. 

आषाढी एकादशीदिनी देवकिकृष्ण मंदिरातील भजनी सप्ताहाची सांगता चिखलकाला खेळून केली जाते. भजन संपल्यानन्तर चिखलात खेळण्यापूर्वी आसपासचे लोक खेळणाऱ्यांना तेल लावतात, ‘गोपाळ गडी या रे’ असे म्हणत सर्व लोक एकत्र येऊन विठ्ठलाचा गजर करीत मंदिराला प्रदक्षिणा घालतात. 

पुजाऱ्याने उपस्थितांच्या अंगावर तिर्थ शिंपडलेकी सर्वजण मैदानात उतरतात आणि मग खरी चिखलकाल्याची झिंग चढू लागते. गोव्यातील इतर गावात राहणारे हौशी लोक या सणाच्या निमित्ताने आवर्जून माशेल गाठतात.

गोव्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या अनेक पावसाळी सणांपैकी हा गोवेकरांचा अधिक आवडता सण. 

या सणाशी माशेलमध्ये राहणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या आठवणी आहेत. काही वयस्कर जोडपी तर या सणादिवशी प्रेमात पडल्याच्या आठवणी आजही भरभरून सांगतात. वरून जोरदार पाऊस पडत असेल तर माहौल मातीमय आणि लालेलाल होऊन जातो. चिखलात उड्या मारत नाचणे, चेंडू फेक, चिखलातील चक्र, जमिनीवर बसून दोन गटात रंगणारी आरोप प्रत्यारोपाची मजा, दहीहंडी, एकमेकांना चिखल लावणे, चिखलात लोळणे, यासारखे प्रकार बेभानपणे एन्जॉय केले जातात. 

मान्सूनच्या स्वागतासाठी गोवेकरांचा भन्नाट सण सांजाव.

तर भारताला गोव्यावरचा आपला अधिकार कायमचा गमवावा लागला असता.

FEST3
lokaso.in

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जातीभेद विसरून सर्व धर्मीय लोक या सणात सहभागी होतात. अगदी चालायला लागलेल्या बाळापासून ते वयस्कर लोकही येथे वय विसरून समोर दिसेल त्याला गळाभेट देत चिखल लावताना दिसतो.

वरून राजाची कृपा झाली तर ‘सोनेपे सुहागा’ पण एखाद्या वर्षी तो रागावला तर गोवेकर टँकरने पाणी आणून चिखल करतात पण सण साजरा करतातच करतात. 

हे सगळं वाचून तुम्हालाही चिखलात खेळायची इच्छा होत असेल तर जराही वेळ न घालवता आणि महत्वाचं म्हणजे आपलं वय चिखलात खेळायचं हाय काय???असा विचार न करता गोवा गाठा.

येत्या 24 जुलै रोजी म्हणजेच मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून विठ्ठलनामाचा गजर ऐकू येऊ लागलाकी काही तासात हातात चिखल घ्यायला लागतोयच.

  • इब्तिदा 
Leave A Reply

Your email address will not be published.