बाकीचे देश बॉयकॉट चायना म्हणतायत मात्र चीननं या देशावर बहिष्कार घातलाय

‘चायनीज वस्तूंवर बहिष्कार’ असं तुम्ही अनेकवेळा ऐकलं असेल. अगदी अमेरिकेपासून लोकं चायनीज वस्तूंवर बहिष्कार घालायची मागणी करतात. अनेक वेळा अशा वस्तूंवर बंदी घालण्यात आली पण आहे . मात्र आता युरोपमधल्या एका छोट्या देशानं चीनला असं काय डिवचलंय की चीन या देशावर बहिष्कार करू लागलाय.

नोव्हेंबर २०२१ मध्ये तैवानचं दूतावास लिथुआनियामध्ये उघडण्यात आली आहे. 

पहिल्यांदाच तैवानला यूरोपमध्ये दूतावास उघडण्याची परवानगी मिळाली आहे. आणि यामुळंच चीन चिडला आहे. चीन तैवानला आपल्याच देशाचा भाग मानतं. यालाच ‘वन चायना पॉलिसी’ म्हणतात. त्यामुळं चीननं त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कारही टाकला आहे. लिथुआनियामधून डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली येणाऱ्या वस्तू चीन बॅन करतंय. तैवान, यूएस आणि EU या देशांनी मात्र आपला पाठिंबा लिथुआनियाला दिला आहे. 

लिथुआनियामध्ये जे नवीन सरकार आलं आहे ते चीन विरोधात सरळ स्टॅन्ड घेत आहे. 

त्याचबरोबर रशिया- नाटो संघर्ष, पूर्व यूरोपातील रशियाचा वाढत हस्तक्षेप याचीही किनार या वादाला आहे. चीन आणि रशिया यांची जी भागीदारी वाढत आहे त्यामुळं चीनची देशात जास्त गुंतवणूक धोक्याची आहे असं इथल्या सरकारचं म्हणणं आहे. 

त्यातूनच या देशानं चीनच्या वस्तूंवर बंदीही घालायला सुरवात केली आहे. 

आपल्या नागरिकांनी मेड-इन –चायना स्मार्टफोन घेणं टाळावं असं इथलं सरकार सांगतंय.

 तसेच देशात जी 5G ची सिस्टिम उभारण्यात येत आहे त्यातही चायनावरून येणाऱ्या वस्तूंचा उपयोग नसावा असं परिपत्रक लिथुआनिया सरकारनं काढलंय. 

तसेच फ्रिडम आणि लोकशाही या मुद्द्यांवरूनही हा छोटा देश चीनला घेरत असतो. चीन जे उगेर मुस्लिमानवर अत्याचार करतं त्याविरोधात ही लिथुआनियानाणे आवाज उठवला आहे. तसेच तैवानच्या मागे ही हा पूर्व यूरोपीय देश खंबीरपणे उभा राहतो. जागतिक आरोग्य संघटनेत तैवानला एंट्री देण्याचंही या देशानं जोरदार समर्थन केलं होतं. 

चीन या सर्व कारणांमुळेच चिडला आहे. याआधीही लिथुआनियाला चीननं तंबी दिली होती मात्र तरीही हा देश मागे हटायला तयार नाहीए. 

अमेरिका आणि युरोपियन देश या देशाला पुढं कारण डाव साधत असल्याचा आरोप आता चीन करतंय.

 तसेच या देशाला दम भरून अँटी-चायना स्टॅन्ड घेणाऱ्या बाकीच्या देशांना धडा देण्याचा चीनचा प्रयत्न आहे. मात्र हा देश अजूनतरी चीनला भीक घालत नाहीए.

चीनला न घाबरण्याचं या देशाचं अजून एक कारण म्हणजे लिथुआनियाचा चीनशी फक्त १% आयात-निर्यात आहे. त्यामुळं चीननं जरी या देशावर बंधन घातली तरी या देशाला काही फरक पडणार नाही आहे. मात्र युरोपियन युनिअन चीनवर खूप निर्भर आहे आणि लिथुआनिया युरोपियन युनिअनवर. त्यामुळं ज्या कंपन्या  लिथुआनियाबरोबर व्यवहार करतात अशा कंपन्यांकरवी चीन लिथुआनियाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. 

सध्या तरी बाकीचे देश लिथुआनियाला पाठिंबा देत आहेत.

 युरोपियन युनिअननं चीन विरोधात जागतिक व्यापार संघटनेकडे दाद मागणार असल्याचं म्हटलंय. बाकी चीनशी भिडून लिथुआनिया आंतरराष्ट्रीय राजकरणात हवा करतोय एव्हडं नक्की.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.