चीननं बॉर्डरवर अख्ख गाव वसवलंय पण ड्रॅगनचं खरं टार्गेट तर भारताची ‘चिकन नेक’ आहे

जगातील सर्वांत महत्त्वाकांक्षी देश कोणता असा जर प्रश्न विचारला तर साहजिकच उत्तर येतं चीन, आणि या चीनच्या महत्वाकांक्षा काही लपून राहिलेल्या नाहीत. आजूबाजूच्या देशांच्या जमिनीवर आणि पाण्यावर चीनने सततच बेकायदेशीर हक्क सांगितलाय. तिबेट गिळंकृत केलाय आणि येत्या काळात तैवान आणि हाँगकाँगचा नंबर आहे हे आपल्याला माहीत आहेच. अशीच काहीशी चीनची इच्छा भारत संदर्भात सुद्धा आहे.

 चीनचा डोळा भारतीय भूमीवर देखील आहेच. 

काश्मीरपासून अरुणाचलपर्यंत चीन भारताशी सीमावाद उकरून काढत असतं. त्यातलाच एक डोकलामचा. डोकलाम तसा भूतानचा भाग आहे. मात्र स्ट्रॅटेजिकदृष्ट्या तो अतिशय महत्वाचा आहे. चीन, भारत आणि भूतान या तीन देशांच्या सीमा जिथं मिळतात त्या ट्रायजंक्शनवर आहे. २०१७ मध्ये डोकलाम ट्राय जंक्शन येथे ७३ दिवस एकमेकांपुढे उभे होते. 

आता तर डोकलाममध्ये चीननं अख्ख गावंच बसवलंय. 

एवढंच नाही तर जे फोटो बाहेर आले आहेत त्यानुसार या गावात आता लोकं राहू लागले आहेत आणि जवळपास प्रत्येक घरच्या पुढे गाडी आहे. 

हे यासाठी सांगावं लागतंय की २०२० मधेच चीननं भूतानच्या या भूभागावर गाव बसवण्यास सुरवात केली होती. डोकलं यासाठी देखील महत्वाचं आहे कि इथून भारताच्या चिकन नेकवर चीनच्या अगदी दृष्टीक्षेपात येइल. जी भारतासाठी मोठी धोक्याची घटना असणार आहे. 

तर एकदा आज आपण पाहूया हे चिकन्स नेक नेमकं काय आहे?  त्या भागाचं महत्व सुद्धा.

तुम्ही नकाशावर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ईशान्य राज्यांसोबत उर्वरित भारत फारच छोट्या भू भागाद्वारे जोडला गेलेला आहे. हाच भाग भारत बांग्लादेश, भारत-भुतान, भारत-नेपाळ या भागाला जोडतो आणि याच भागाला चिकन्स नेक असं म्हणतात. यालाच सिलीगुढी कॉरिडॉर सुद्धा म्हणतात.

WhatsApp Image 2022 07 21 at 8.55.36 PM
source- social media

या भागाचं भौगोलिक दृष्ट्या स्थान आर्थिक महत्व शिवाय आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्व मोठं आहे. सामरिकदृष्ट्या हा भाग फार महत्वाचा आहे आणि त्यातल्या त्यात २०१७ च्या डोकलामनंतर तर त्याचं अजूनच महत्व वाढलय. 

आता तुम्ही म्हणाल की याला चिकन्स नेक किंवा कोंबडीच्या मानेसारखा भाग असं का म्हणतात?

तर त्याचं कारण म्हणजे या भागाची लांबी ६० किलोमीटर आणि रुंदी २० किलोमीटर आहे. ईशान्य आणि उर्वरित भारत याला जोडण्या सोबत आणि दक्षिण पूर्व आशिया सोबत भारताला जोडणारा महत्वाचा व्यापारी मार्ग. चीनने ताब्यात घेतलेल्या तिबेटमधील चुंबी व्हॅली ही इथून फक्त १३० किलोमीटर अंतरावर आहे. 

या भागात  नेपाळी आणि बंगाली माणसे मोठ्या येतात. याच भागातून ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यांना जोडणारा एकमेव रेल्वे मार्ग आहे. दार्जिलिंगचा चहा आणि लाकूड यामुळे तर या भागाचं महत्व अजून वाढतं. या भागामुळेच भारताचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट अॅक्ट ईस्ट पॉलिसी शक्य होतोय.

हा भाग घुसखोरांना रोखण्यासाठी दहशतवादाला रोखण्यासोबतच ड्रग ट्रॅफिकिंग रोखण्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे.

म्यानमार, थायलंड, यांसारख्या देशांतून भारतातील त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या भागात होणारंड्रग ट्रॅफिकिंग हा एक सीरियस इश्यू आहे. चिकन नेक द्वारेच या भागावर नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं. तसंच तिबेटच्या जवळ असल्याने चीनच्या कुरपतींवर लक्ष सुद्धा ठेवता येतं.

अजून एक म्हणजे जर का कधी युद्ध झालच तर याच भागातून लष्कर आणि शस्त्रास्त्रे सहजपणे नेता येतील. 

हा एकदम प्लेन भाग आहे, कोणतेही अडथळे नाहीत त्यामुळे याचं संरक्षण करणं हे खरं आवाहन आहे आणि त्यामुळेच हाच भाग प्राइम आणि पहिलं टार्गेट असणार. यामुळेच कोणत्याही किमतीवर हा वाचवणं हे सुद्धा आव्हान आहे.

मध्यंतरी चायना आणि इंडिया यांच्यातल्या करारानुसार चीनने सिक्कीम वरचा हक्क सोडला आणि भारताने तिबेटवरच्या चीनच्या हक्काला मान्यता दिली. परंतू तरीही चीन सतत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतोय. सीमेपल्याड चीन ने रोड, हवाई धावपट्टी अशी जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे जो चिंतेचा विषय आहे.

यामुळेच या कॉरिडॉर वाढवणं आणि मजबूत करणं महत्वाचं आहे. 

यासाठी सर्वप्रथम बांग्लादेश सोबत करार करावा लागेल ज्यात फक्त लष्कर नाही तर सामान्य नागरिक वर्दळ वाढवावी लागेल, व्यापारी मार्ग वाढवावा लागेल आणि यासंदर्भात बांग्लादेश सहकार्य करेल असं त्यांनी २०१० आणि २०१६ मध्ये सांगितलं आहे.

शिवाय अन्डरग्राउंड टनल्स हा सुद्धा एक ऑप्शन आहे.शेवटी काय तर भारत इंचभर जमीन सुद्धा जोडणार नाही. सरकार कोणतंही असो आणि जर इतका महत्वाचा भाग असेल तर विषयच नाही.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.