या गावात लहान पोरांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे कुंगफू चॅम्पियन आहेत.

चीनचं नाव घेतल्यावर सगळ्यात अगोदर आपल्याला आठवतं ते म्हणजे करोना , यावरून आपण त्यांना जगभरच्या शिव्या घातल्या पण फक्त करोनाचं नाही तर चीनची अजून एक ओळख म्हणजे चीन हा शब्द जरी उच्चारला तरी कुंग फु कराटे आपल्या डोळ्यासमोर येतात. मार्शल आर्ट,कराटे यांशिवाय सध्याच्या फिल्म्स या अपूर्ण वाटतात. जेव्हा जेव्हा आपण चायनीज सिनेमे बघतो तेव्हा एक प्रश्न डोक्यात नक्कीच येतो तो म्हणजे तिथले सगळेच लोकं कराटे चॅम्पियन आहेत की काय ?

पूर्ण चीनला कुंग फु कराटे येवो किंवा न येवो पण सेंट्रल चीनच्या तिहानझुच्या टेकड्यांमध्ये एक स्थित असलेल्या एका गावांमध्ये प्रत्येक व्यक्तीला कराटे, कुंग फु येतात. त्या गावाचं नाव म्हणजे गांक्सि डोंग. स्वयंप्रेरणेने चालणारं आणि आत्मनिर्भर असलेलं हे गाव डोंग लोकांचं आहे. चीनमधल्या 56 अल्पसंख्याक जमातींचं हे गाव आहे. या गावातल्या बारक्या लेकरांपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे कुंग फु मास्टर आहेत. याच कारणामुळे हे गाव जगभर प्रसिद्ध आहे. लोकं या गावाला कुंग फु व्हिलेज म्हणून ओळखतात.

गावमधले लोकं शेती, घरदारापासून ते मंदिरात सुद्धा कुंग फु शिकतात आणि त्याचा अभ्यास करतात.इथं वेगवेगळ्या शैलीच्या कुंग फु ची प्रॅक्टिस केली जाते. आपल्या खेळामध्ये सुधारणा करण्यासाठी गावातले लोकं एकमेकांसोबत भांडण सुद्धा करतात. या गावाला कुंग फु चा इतिहास हा फार जुना आहे. खरंतर हा कला प्रकार इथं कसा रुजला याचं उत्तर कुणाकडेच मिळत नाही.

इथले लोकं हातापायांसोबतच काठी आणि तलवारींचादेखील वापर करतात. त्यांचे कराटे मुव्ह्ज हे साप,चित्ता, वाघ अशा प्राण्यांपासून प्रेरित असतात. हे लोकं एकमेकांना यातले बारकावे शिकवत शिकवत मोठे होतात.या गावाचा नियमच आहे की इथल्या प्रत्येकाने कुंग फु शिकलंच पाहिजे. याला मुलीसुद्धा अपवाद नाहीत त्यांच्याकडूनही अशीच अपेक्षा असते की त्यांनीही कुंग फु शिकावं.

कुंग फु मध्ये अनेक शैली आहेत व सुरवातीला कोणाच्याच मनिध्यानी नसतं की कुठली शैली शिकायची. पण बेसिक सुरवात करून त्यातली शैली पूढे आत्मसात करावी लागते. प्रत्येक शैलीबाबत इथं थेरीज आहेत. काही लोकांचा विश्वास आहे की सुरवातीच्या काळात जंगली जनावरांपासून वाचण्यासाठी या आर्टचा उपयोग होऊ लागला. सुरवातीला 6 कुटुंबानी कुंग फु शिकलं आणि नंतर ते पसरत राहिलं.गावात दरोडेखोरांच्या जाचापासून वाचण्यासाठी सुद्धा कुंग फु चा शोध लागला अशी थेरी आहे.

या गावात शेतीनंतर सगळ्यात जास्त महत्त्व इथले लोकं कुंग फु ला देतात. पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आणि गावाला लाभलेली ही एक समृद्ध परंपरा असल्याचं मानलं जातं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.