अमेरिका कोरोनाची चौकशी करायला लागल्यावर चीन न्युक्लीयर हल्ल्याची धमकी द्यायला लागलंय

चीन आणि अमेरिकेचा वाद काही नवीन नाही. दोन्ही देश एकमेकांच्या कमीपणा दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. मग तो त्यांचा अंतर्गत  मुद्दा असला काय किवा जागतिक असला काय.

जेव्हा चीनमधून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला. तेव्हा ट्रम्प तात्यांच्या अमेरिकन सरकारने चीनवर हल्लाबोल करायला सुरुवात केली. तात्या एवढा खडूस माणूस की त्यांनी सतत मुद्दा उकरून काढत आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोनाच्या फैलावासाठी चीनला दोषी ठरवण्याचे एकही चान्स सोडला नाही.

ट्रम्प तात्या जाऊन ज्यो बायडन नाना आले. सरकारे बदलली पण अमेरिका गप्प बसली नाही. त्यांनी देखील हा व्हायरस कसा पसरला ? याची तपासणी करण्यासाठी WHO च्या संशोधकांनी तिथं जाऊन तपासणी करावी,  अशी मागणी अमेरिकेन लावून धरली. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधकांची एक टीम चीनच्या वूहान लॅबमध्ये जाऊन पोहोचली.

जगातील आरोग्य संघटनेनं यावर चीनच्या बाजूने निकालही दिला, पण त्यांच्या निकालाने अमेरिकेला काय शांती मिळाली नाही. त्यामुळ अमेरिकेच्या बायडन सरकारनं स्वतः या कोरोना व्हायरसच्या ओरिजिनचा तपास करण्याची घोषणा केली. बायडन सरकारनं आपल्या अधिकाऱ्यांना  केवळ ९० दिवसात तपास  पूर्ण करणार असल्याचेही म्हंटल. 

अमेरिकेच्या घोषणेवर भडकलं चीन ..

आता पाणी गळ्याशी आल्यानं  चीननं  अमेरिकेला डायरेक्ट न्युक्लीयर हल्याची धमकी दिलीये. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने ट्वीट करत म्हंटल कि,

“त्यावेळी आमची न्युक्लीयर मिसाईलं इतक्या असल्या पाहिजे कि, ज्याचा हल्ल्याच्या  विचार केल्यावरचं  अमेरिकेचा थरकाप उडेल.”

चीनच्या माऊथपीस या सरकारी वृत्तपत्रात अमेरिकेवर हल्ल्याविषयी सांगितल गेलंय. त्यानुसार देशाच्या सामरिक निवारणासाठी अमेरिकेविरूद्ध  मोठ्या संख्येने न्युक्लीयर बॉम्ब तयार करण्याविषयी भर देण्यात आलाय.

या वृत्तपत्राचे संपादक Hu Xijian, यांनी म्हंटल कि,

अमेरिका आणि चीनमधला वाढता वाद पाहता, आम्ही आधीच तयारी करतोय. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे DF-४१ या न्युक्लीयर हत्याराची संख्या वाढवणे.  कारण चीनविरुद्ध अमेरिकेचा राग वनव्या सारखा आहे. आणि त्यामुळे आपण यासाठी आधीच आपली शक्ती वापरली  पाहिजे.

ग्लोबल टाईम्सच्या संपादकाकडून ही धमकी सुद्द्धा अमेरिकेच्या जो बायडन यांच्या  व्हायरसच्या तपासाच्या आदेशानंतरचं आली.

दरम्यान, याधीही अनेकदा चीन आणि अमेरिकेची  बाचाबाची सर्वान समोर आलीये. पण ही पहिली वेळ आहे जेव्हा चीनन अमेरिकेला खुलेआम धमकी दिलीये. चीनच्या या रागावरून हे तरी दिसतेय कि,

चीनच्या वूहान लॅब थेअरीत  नक्कीच काही दम आहे. आणि चीनला भीती आहे कि, या तपासणीतून कोरोना व्हायरसच्या मागचे त्याचे कारनामे जगासमोर येतील.

चीनची प्लॅन २०३५ ची  तयारी आतापासूनच तयार झालीये.असं म्हंटल जातंय  कि,  प्लॅन २०३५ पूर्ण करण्यासाठी  या दरम्यान चीनला आपली न्युक्लीयर पॉवर इतकी मजबूत करायचीये कि, तो अमेरिकेवर हुकुम करेल.

आता हि साधी धमकी म्हणायची का कोरोना नंतर येणाऱ्या अणुयुद्धाची नांदी म्हणायची हे टेन्शन जगावर वाढलयं हे नक्की.

हे ही वाच भिडू .

 

Leave A Reply

Your email address will not be published.